एकदम झक्कास माहिती दररोज फक्त तुमच्यासाठी!

दिलीप कुमार यांच्याबाबतची एका ज्योतिषाची भविष्यवाणी खरी ठरली! सांगितलं होतं हे भविष्यवाणीत..

नुकतंच अभिनेते दिलीप कुमार यांचं ७ जुलै २०२१ रोजी नि’धन झालं. चित्रपटसृष्टीतलं एक मोठं व्यक्तिमत्व हरवलं. अनेक चित्रपटातल्या त्यांनी साकारलेल्या भूमिका हा अभ्यासाचा विषय होता. त्याकाळी सिनेसृष्टीत पदार्पण करू पाहणाऱ्या होतकरू तरुणांना दिलीप कुमार यांचे चित्रपट पाहण्याचा सल्ला दिला जायचा. त्यांची चित्रपटसृष्टीतली कारकीर्द एखाद्या शाळेपेक्षा कमी नव्हती. त्यांच्याकडून खूप काही शिकण्यासारखं होतं.

त्यांच्या अभिनयाची बरोबरी कुणीच करू शकणार नाही. दिलीप कुमार यांना चित्रपट आणि संगीताची जेवढी आवड होती, तेवढेच ते साहित्य आणि शायरीत देखील रमायचे. फिल्म इंडस्ट्री मधले लोक त्यांना खूप मानत असत. एका ज्योतिषाने त्यांच्याबाबत एक भविष्यवाणी केली, जी ऐकून भल्याभल्याना आश्चर्याचा ध’क्का बसला. काय होती ही भविष्यवाणी?

या भविष्यवाणीचा एक वेगळाच किस्सा आहे. दिलीप कुमार यांच्यावर लिहिल्या गेलेल्या एका पुस्तकात या प्रसंगाचा उल्लेख आहे. त्यावेळी १९५५ ला झालेल्या ‘आझाद’ चित्रपटाचे शूटींग सुरू होते. हे शूटींग तामिळनाडू मधील कोइंबतूर या शहरात सुरू होते. या शूटींग च्या वेळी दिलीप कुमार यांच्या एका मित्राने त्यांची ओळख एका ज्योतिषाशी करून दिली. या ज्योतिषाने केलेली भविष्यवाणी कधीच खोटी ठरत नाही, असा त्यांचा लौकीक होता.

ज्योतिषाने दिलीप कुमार यांचा हात हातात घेतला आणि ते त्यांच्या हातावरच्या रेषा वाचू लागले. दिलीप कुमार त्यांचे बोलणे लक्षपूर्वक ऐकत होते. ज्योतिषाने दिलीप कुमार यांच्याबद्दल जे जे सांगितले, ते ते सगळे खरे होते. त्यावेळी त्या ज्योतिषाने त्यांना एक भविष्यवाणी सांगितली ज्यावर स्वतः दिलीप कुमार यांचाही विश्वास बसला नाही. ही भविष्यवाणी होती दिलीप कुमार यांच्या वैवाहिक जीवनाविषयीची.

त्या ज्योतिषाने सांगितले, की दिलीप कुमार यांना चंद्रासारखी अतिशय सुंदर पत्नी मिळेल. त्यांनी पुढे हे देखील सांगितले, की दिलीप कुमार यांचे लग्न अशा मुलीशी होईल जी फिल्मी दुनियेत काम करत असेल. यावर दिलीप कुमार यांनी “असे तर होऊच शकत नाही” असे म्हणत ती गोष्ट हसण्यावारी नेली होती. त्या ज्योतिषाने पुढे सांगितले, की तिचे तुमच्यावर खूप प्रेम असेल आणि ती शेवटपर्यंत तुमची काळजी घेईल.

ऑक्टोबर १९६६ मध्ये दिलीप कुमार यांचा विवाह सायरा बानू या अभिनेत्रीशी झाला. आपल्या सगळ्यांनाच माहीत आहे की सायरा बानू या दिलीप कुमार यांची किती काळजी घेत असत. दोघांमध्ये बावीस वर्षांचे अंतर असूनही शेवटपर्यंत सायरा यांनी दिलीप कुमार यांना साथ दिली. काय मग मंडळी, कशी वाटली ही भविष्यवाणीची कथा? आम्हाला कमेंट्स यामध्ये सांगायला विसरू नका.

You might also like