एकदम झक्कास माहिती दररोज फक्त तुमच्यासाठी!

दुधाने आंघोळ, चांदीची चप्पल, सोन्याचे घड्याळ! नक्की कोण आहे ही अभिनेत्री?

चंदेरी दुनिया अनेक गोष्टींनी भरली आहे. या गोष्टी सामान्य माणसाला माहीत नसतात त्यामुळे त्यांना त्याचे जास्त कुतूहल असते. कलाकारांचे मानधन, त्यांची जीवनशैली या गोष्टीत सामान्य माणसाला फारच रस असतो. अर्थात कलाकारांना मिळणारा पैसा आणि प्रसिद्धी ही त्यांच्या कामाची पोचपावती असते. पण तरीही हे सगळे सामान्य माणसाच्या आवाक्याबाहेरचे असते.

सिनेसृष्टीत लोक आपल्या कामामुळे पैसा आणि प्रसिद्धी मिळवतात. काही कलाकार मात्र असे आहेत जे जन्मतःच तोंडात सोन्याचा चमचा घेऊन जन्माला येतात. दिगांगना सूर्यवंशी ही त्यापैकीच एक अभिनेत्री.

१५ ऑक्टोबर १९९७ ला जन्माला आलेली ही अभिनेत्री आपल्या आईवडिलांचे एकुलते एक अपत्य आहे. खूप नवस बोलल्यानंतर तिचा जन्म झाला. त्यामुळे तिच्या तोंडातून शब्द पडला रे पडला की तिचा हट्ट लगेच पुरवला जातो. आपल्या आईवडिलांची अत्यंत लाडकी असलेली दिगांगना राजेशाही घराण्यातून आहे.

दिगांगनाच्या वाढदिवसादिवशी तिला सर्वांत आधी दुधाने आंघोळ घातली जाते. मग तिला पारंपारिक आभूषणांनी सजवण्यात येते. तेव्हा पायात चांदीची चप्पल, हातात सोन्याचे घड्याळ, डोक्यावर सोन्याचा मुकूट असा तिचा राजेशाही थाट असतो. तिच्या वडिलांनी तिला हे सोन्याचे घड्याळ ती १० वर्षांची असताना भेट दिले होते. तेव्हापासून आपल्या प्रत्येक वाढदिवसाला दिगांगना हे सोन्याचे घड्याळ न विसरता घालते. तिच्या चांदीच्या चपला कोलकत्याच्या एका डिझायनरकडून डिझाईन करून घेतल्या जातात.

दिगांगनाच्या कामाविषयी बोलायचे झाले तर तिने वयाच्या ७ व्या वर्षी सोनी टीव्ही वरील ‘क्या हादसा क्या हकीकत’ (२००२) या मालिकेतून बालकलाकार म्हणून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले. त्यानंतर तिने कृष्णा अर्जुन (२००२), शकुंतला (२००९), रुक जाना नहीं (२०११) आणि कबूल है (२०१२) या मालिकांमधून सहाय्यक व्यक्तिरेखा निभावल्या.

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Digangana Suryavanshi (@diganganasuryavanshi)

२०१२ मध्ये स्टार प्लस वाहिनी वरील ‘एक वीर की अरदास… वीरा’ या मालिकेत तिला प्रमुख नायिकेची भूमिका मिळाली. या मालिकेने तिला प्रचंड प्रसिद्धी मिळवून दिली.

२०१५ मध्ये म्हणजेच वयाच्या १७ व्या वर्षी तिला ‘बिग बॉस’ या कार्यक्रमात सहभागी होण्याची संधी मिळाली. जलेबी (२०१८) आणि फ्रायडे (२०१८) हे तिच्या पदार्पणातले चित्रपट. सध्या दिगांगना बॉलिवूड चित्रपटांमध्ये कमी दिसते. सध्या ती अनेक तेलगू चित्रपटांमध्ये मात्र दिसून येते. तिने काही तमिळ चित्रपटांमध्येही काम केले आहे. तिचे काही तेलगू चित्रपट सध्या प्रदर्शनाच्या मार्गावर आहेत.

You might also like