एकदम झक्कास माहिती दररोज फक्त तुमच्यासाठी!

आता महेंद्रसिंग धोनी हि झाला पुणेकर, पुण्याचा या भागामध्ये विकत घेतले सुंदर घर, पाहा त्याच्या घराची काही खास छायाचित्रे..

आता महेंद्रसिंग धोनी हि झाला पुणेकर

भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी आता क्रिकेटमधून जरी निवृत्त झाला असेल, परंतु तो बर्‍याचदा आपल्या वैयक्तिक आयुष्याविषयी चर्चेत असतो. आजच्या काळात एमएस धोनी आपल्या उत्कृष्ट कामगिरीमुळे यशस्वी आणि लोकप्रिय व्यक्ती आहे. आज धोनीचे चाहते केवळ देशातच नव्हे तर संपूर्ण जगात आपणास पाहायला मिळतील.

आम्हला मिळालेल्या माहितीनुसार धोनी नुकताच पुणे मध्ये खरेदी केलेल्या घरावरून चर्चेमध्ये आहे. धोनीने त्याचे नवीन घर पिंपरी चिंचवड भागामध्ये विकत घेतले आहे. धोनीचे हे नवीन घर खूपच सुंदर आणि आलिशान दिसून येत आहे, परंतु धोनीने अजून या घराच्या किमतीबद्दल कोणता हि खुला’सा केला नाही.

गेल्या वर्षी धोनीने मुंबईमध्ये नवीन घर विकत घेतले होते, त्यातील काही छायाचित्रे धोनीची पत्नी साक्षीने सोशल मीडियावर पोस्ट केली होती आणि आता धोनीने पुण्यात आणखी एक नवीन घर विकत घेतले आहे.

धोनीची पत्नी साक्षी सोशल मीडियावर बरीच अ‍ॅक्टिव असते. बर्‍याचदा साक्षी स्वत: चे आणि तिच्या कुटूंबाची सुंदर छायाचित्रे पोस्ट करत असते. गेल्या वर्षी साक्षी धोनीने आपल्या मुंबईतील नवीन घराचे काही फोटो शेअर केले होते.

पुणे मधील धोनीचे हे नवीन घर अंडरकंस्ट्रक्शन आहे आणि लवकरच हे घर तयार होईल. या व्यतिरिक्त अलीकडेच साक्षीने तिचा नवीन पाळीव कुत्रा आणि तिचा घोडा चाहत्यांसमोरही आणला आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Sakshi Singh Dhoni (@sakshisingh_r)

आजच्या काळात जिथे महेंद्रसिंग धोनी ४ विलासी घरे आणि फार्महाऊसचे मालक बनले आहेत, त्याने आपले बालपण मॅकन कॉलनीतील २ खोल्यांच्या घरात घालवले आहे.

परिश्रम, समर्पण आणि क्षमतेच्या जोरावरती धोनी आज एक यशस्वी व्यक्ती बनला आहे. क्रिकेट मधून त्याने एक वेगळीच ओळख निर्माण केली आहे.

जेव्हा धोनीने आपल्या करिअरची सुरूवात केली तेव्हा त्याने २००९ मध्ये तीन मजली घर विकत घेतले होते, ज्याचे नाव शौर्य असून तो या घरामध्ये ८ वर्ष राहिला होता.

आजकाल धोनी आपल्या संपूर्ण कुटुंबासमवेत त्याच्या रांचीच्या फार्महाऊसवर वेळ घालवत आहे आणि धोनीच्या या फार्म हाऊसचे नाव ‘कैलाशपती’ आहे आणि त्याचे फार्महाऊस संपूर्ण सात एकरात पसरलेले आहे आणि धोनीचे हे फार्महाऊस आतून खूपच सुंदर आणि विलासी दिसत आहे.

नमस्कार वाचक मित्रांनो, आमचा हा लेख तुम्हला कसा वाटला आम्हला कंमेंट करून नक्की कळवा. मनोरंजन क्षेत्रामधील असेच अधिक लेख आम्ही तुमच्यासाठी घेऊन येत असतो. लेख आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका कारण यामुळे आम्हाला आणखी लेख लिहायला प्रोत्साहन मिळते.

 

You might also like