एकदम झक्कास माहिती दररोज फक्त तुमच्यासाठी!

पुण्यात मद्यधुंद अवस्थेत तरुणीचा धिंगाणा! भर रस्त्यात झोपून गाडयांना अडवले…

बाई आणि बाटलीचा नाद वाईट, असं म्हणतात. पण या दोन्ही गोष्टी एकत्र झाल्या तर काय होईल? याचे उत्तम उदाहरण म्हणजे पुण्यातील एक तरुणी. ‘पुणे तिथे काय उणे’ म्हणतात. पुण्यात जशा चांगल्या गोष्टी आहेत, तशाच काही वाईट गोष्टीही वाढत चालल्या आहेत.

त्यामुळे आता इथे कोणत्याच गोष्टी उण्या राहिल्या नाहीयेत. एका तरुणीने दारू पिऊन धिंगाणा घालत हीच गोष्ट खरी करून दाखवली आहे. दारू पिणं वाईट, ती अति पिणं म्हणजे अति वाईट. पण ही गोष्ट लोकांना समजेल तर ना! या तरुणीलाही ही गोष्ट समजली नाही आणि पुढे हा सगळा प्रकार घडला.

स्वारगेटच्या दिशेने जाणाऱ्या टिळक रस्त्यावरील हिराबाग चौकात ही घटना घडली आहे. एक तरुणी रात्री साडेदहाच्या सुमारास रस्त्यावर आढळली. ही तरुणी दारूच्या नशेत होती. या नशेतच ती रस्त्यावर बराच गोंधळ घालत होती.

या तरुणीने आपल्या गोंधळाने येणाऱ्या-जाणाऱ्यांचे लक्ष वेधून घेतले. ही तरुणी रस्त्यातच आडवी झाली. ती येणाऱ्या-जाणाऱ्या वाहनांना हाताने अडवण्याचा प्रयत्न करत होती. त्यामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होत होता.

एका स्थानिकाने पोलीस नियंत्रण कक्षाला हा प्रकार कळवताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. पोलीस तिथे पोहोचताच त्यांनी तरुणीला रस्त्याच्या कडेला नेले. त्यामुळे पुढील अनर्थ टळला.

रस्त्यावरून येणाऱ्या-जाणाऱ्यांना या घटनेमुळे मात्र घटकाभराची करमणूक झाली. या तरुणीला पाहण्यासाठी रस्त्यावर बरीच गर्दी जमली होती. यातील एकाने या घटनेचा व्हिडिओ शूट केला आणि तो सोशल मीडिया वर अपलोड केला. आता हा व्हिडिओ वाऱ्यासारखा सोशल मीडिया वर व्हायरल होत आहे.

पोलिसांनी या तरुणीला रस्त्याच्या कडेला नेले, पण ही तरुणी कोणाचेही काहीही ऐकून घेण्याच्या मनस्थितीत नव्हती. पोलिसांनी तिला अधिक चौकशीसाठी पोलीस स्टेशनला नेले.

ही तरुणी उच्चशिक्षित असल्याची माहिती समोर येत आहे. पुण्यात आजकाल अशा अनेक घटना वाढत चालल्या आहेत. दारू पिऊन गोंधळ घातल्याच्या बातम्या आजकाल सारख्याच कानावर येत असतात. त्यामुळे पुण्यात खरंच काही ‘उणं’ नाही, याची जाणीव होऊ लागली आहे.

मोठ्या मोठ्या शहरांमध्ये सतत काही ना काही घडामोडी घडत राहतात. मात्र काही स्थानिकांच्या तत्परतेमुळे आणि पोलिसांच्या मदतीने या घडामोडींचा अनर्थ होणे टळते.

नागरिकांनी जबाबदारीने वागल्यास अशा घटना घडण्याचे प्रमाण कमी होईल. त्यामुळे आजूबाजूच्या लोकांना होणारा त्रासही कमी होईल. अर्थात सर्वच लोक बेजबाबदारपणे वागत नाहीत. जबाबदारीने वागणारे लोकही समाजात आहेत आणि त्यामुळेच समाजातील सुव्यवस्था टिकून आहे. काय मंडळी, तुम्हीही आहात ना जबाबदार नागरिक?

You might also like