एकदम झक्कास माहिती दररोज फक्त तुमच्यासाठी!

सर्वांच्या लाडक्या नंदिता वाहिनी आल्यात पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला! दिसणार अनोख्या भूमिकेत…

‘एक आटपाट नगर होतं. तिथं एक राजा होता…’ अशा आटपाट नगरातल्या अनेक कथा तुम्ही चातुर्मासात ऐकल्या असतील. लहानपणी कोणत्याही सणाला किंवा व्रताच्या दिवशी घरातील आई किंवा आजी अशा आटपाट नगरातल्या कथा सांगत त्या सणाचं, दिवसाचं किंवा व्रताचं महत्त्व कथारूपाने सांगत असत. ऐकणाऱ्याला त्या कथेमुळे कंटाळा येत नसे आणि चांगली शिकवण देखील मिळत असे. आता हेच काम झी मराठी वाहिनीने हाती घेतलं आहे.

झी मराठी वाहिनीने ‘घेतला वसा टाकू नको’ हा कार्यक्रम सुरू केला आहे. लोकांना या व्रतवैकल्यांमागचं कारण कळावं, सणांचं महत्त्व कळावं, म्हणून हा कार्यक्रम सुरू करण्यात आलं आहे. यात विविध सणांच्या, विशेष दिवसांच्या, व्रतांच्या गोष्टी कथारूपात दाखवल्या जातात. आता नवरात्री सुरू झाल्या आहेत. त्यानिमित्ताने या कार्यक्रमात ‘नवरात्र विशेष’ कथा दाखवण्यात येणार आहेत.

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Dhanashri Kadgaonkar (@kadgaonkar_dhanashri)

या कथांमधून अनके कलाकार देखील नव्या रूपात आपल्या भेटीला येत असतात. अशीच एक कलाकार आता बऱ्याच दिवसांनंतर प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ‘तुझ्यात जीव रंगला’ मालिकेत नंदिता वहिनी उर्फ वहिनीसाहेबांची भूमिका साकारणारी अभिनेत्री धनश्री काडगावकर बऱ्याच दिवसांनी पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. मध्यंतरी तिच्या गरोदरपणामुळे आणि नंतर बाळंतपणामुळे धनश्री मनोरंजनसृष्टीपासून काही काळ लांब गेली होती. मात्र आता ती परत आली आहे.

आपल्या या भूमिकेबद्दल बोलताना धनश्री म्हणाली, “माझ्या मुलाच्या जन्मानंतर खऱ्या आयुष्यात आईची भूमिका निभावताना माझा अभिनयापासून संपर्क तुटला. पुढे मोठा गॅप आल्यामुळे मला पुन्हा काम करता येईल की नाही, मी काही विसरले तर नाही ना, अशा शंका माझ्या मनात येत होत्या. पण मला माझ्या कुटुंबाकडून आणि मालिकेच्या नावातूनच खूप प्रोत्साहन मिळालं. ‘घेतला वसा टाकू नको’ असं मी माझ्या मनाशी पक्कं करून ही भूमिका स्वीकारली. या मालिकेमुळे दुर्गामातेची भूमिका माझ्या वाट्याला आली आहे. महिषासुराचा वध करणारी दुर्गामातेची अलौकिक भूमिका माझ्या वाट्याला आली, यासाठी मी स्वतःला खूप भाग्यवान समजते.”

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Dhanashri Kadgaonkar (@kadgaonkar_dhanashri)

धनश्री परत छोट्या पडद्यावर येणार, हे समजल्यापासून तिच्या चाहत्यांची उत्सुकता वाढली आहे. तिचा हा नवा लूक आणि नवी भूमिका दोन्हींसाठी प्रेक्षक उत्सुक आहेत. लवकरच हे भाग प्रसारीत होतील आणि धनश्रीच्या चाहत्यांना पुन्हा तिचा अभिनय पाहण्यास मिळेल. प्रेक्षक तिच्या या भूमिकेलाही तितकेच प्रेम देतील यात शंका नाही.

You might also like