एकदम झक्कास माहिती दररोज फक्त तुमच्यासाठी!

देवमाणूसची निरोपाची तारीख ठरली! अशा होणार मालिकेचा शेवट..डॉक्टरला होणार..

गेल्या काही दिवसांपासून झी मराठी वाहिनी वरील ‘देवमाणूस’ या मालिकेची खूप चर्चा होत आहे. देवीसिंगला अटक झाल्यानंतर ही मालिका संपणार असे सर्वांना वाटत होते. मात्र या मालिकेत मध्यवर्ती भूमिका साकारणारा अभिनेता किरण गायकवाडने लाईव्ह येत मालिका इतक्यात संपणार नसल्याचे सांगितले.

मालिका संपायच्या बातम्या येत असतानाच मालिकेत दोन नव्या पात्रांनी एन्ट्री घेतल्याने मालिका नवीन वळण घेणार की संपणार याबद्दल प्रेक्षकांच्या मनात संभ्रम निर्माण झाला होता.

आता मात्र या मालिकेच्या शेवटाची घोषणा झाली आहे. ही मालिका लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. ‘देवमाणूस’ मालिका सोमवार ते शनिवार रात्री १०:३० वाजता प्रेक्षकांच्या भेटीला येत असते. मात्र आता झी मराठी वाहिनीवर पाच नवीन मालिका सुरू होत आहेत.

या मालिकांच्या प्रसारणाच्या तारखा आणि वेळा देखील झी मराठीच्या इंस्टाग्राम अकाऊंट वरून जाहीर करण्यात आल्या आहेत. त्यामुळे ‘देवमाणूस’ मालिका संपणार या गोष्टीवर शिक्कामोर्तब झालं आहे.

‘ती परत आलीये’ या मालिकेचा प्रोमो झी मराठी वाहिनीवर प्रसारीत करण्यात आला. ही मालिका १६ ऑगस्ट पासून सोमवार ते शनिवार रात्री १०:३० वाजता सुरू होणार आहे. त्यामुळे ‘देवमाणूस’ मालिका आता प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे.

रविवारी १५ ऑगस्ट ला या मालिकेचा दोन तासांचा विशेष भाग प्रसारीत होणार आहे. त्याच वेळी ही मालिका देखील संपणार आहे. विशेष म्हणजे गेल्या वर्षी १५ ऑगस्टलाच ही मालिका सुरू झाली होती.

‘देवमाणूस’ ही मालिका सत्य घटनेवर आधारीत आहे. मात्र देवीसिंग पुराव्यांअभावी सुटलेला बघून प्रेक्षकांना धक्का बसला. अलीकडेच या मालिकेत अजून दोन पात्रांची एन्ट्री झाली. त्यामुळे आता मालिका बरीच वाढत जाणार असा अंदाज सगळ्यांनी बांधला. त्यामुळे या विनाकारण वाढवत नेलेल्या कथानकाबद्दल प्रेक्षकांनी सोशल मीडियाद्वारे आपला रो’ष व्यक्त केला. आता मात्र ही मालिका आपल्या शेवटाकडे आली आहे.

झी मराठी वाहिनीवरील सर्वांत जास्त टीआरपी असणाऱ्या मालिकांमधील ‘देवमाणूस’ ही एक मालिका होती. या मालिकेच्या कथानकामुळे आणि यातल्या पात्रांमुळे ही मालिका लोकप्रिय झाली होती. यातला सस्पेन्स लोकांना आवडला होता.

मात्र आता ही मालिका संपणार असल्याने या मालिकेच्या चाहत्यांना दुःख होत आहे. त्याजागी लागणारी ‘ती परत आलीये’ ही मालिका प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेण्यात यशस्वी होईल का, हे आता मालिका प्रसारीत झाल्यावर कळेलच.

You might also like