एकदम झक्कास माहिती दररोज फक्त तुमच्यासाठी!

‘देवमाणूस’ मधील टोन्याची आई खऱ्या आयुष्यात दिसते इतकी सुंदर! पहा तिचे ग्लॅमरस फोटो..

काही मालिका तिच्या कथेमुळे प्रसिद्ध होतात, काही त्यातल्या पात्रांमुळे. काही मालिकांना त्यातले स्टार कलाकार मोठे करतात. तर काही मालिकांमुळे कलाकार स्टार होतात. झी मराठी वरील बऱ्याच मालिका अशा आहेत ज्यांनी त्यातल्या कलाकारांना मोठं केलं, घराघरांत पोचवलं.

सध्या बऱ्याच मालिकांमधून नवीन चेहरे लोकांच्या भेटीला येत आहेत. या नवीन चेहऱ्यांमध्ये काही अगदीच नवीन आहेत, काही चित्रपट आणि नाटकांमधून आधी भेटले आहेत, काही शॉर्ट फिल्म्समधून प्रेक्षकांना भेटून गेले आहेत. एक गोष्ट मात्र नक्की, कलाकार कोणीही असू दे, प्रेक्षकांना नेहमीच त्यांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल कुतूहल असते.

आता हेच पहा ना, ‘देवमाणूस’ मालिकेतल्या सस्पेन्स सारखी सर्व कलाकारांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल लोकांची उत्सुकता देखील दिवसेंदिवस वाढत असलेली दिसते. या मालिकेतलं टोन्याचं पात्र आणि ती भूमिका करणारा बालकलाकार विरल जेवढे लोकप्रिय आहेत, तेवढीच लोकप्रिय आहे टोन्याची आई मंगल. मित्रांनो, ही भूमिका निभावली आहे अंजली जोगळेकर या गुणी अभिनेत्रीने. कलाप्रेमी प्रेक्षकांना अंजली जोगळेकर हे नाव नवीन नाही.

अंजली यांनी ‘देवमाणूस’ मालिकेत डिंपल आणि टोन्याच्या आईची व्यक्तिरेखा साकारली आहे. यामध्ये त्यांची भूमिका ही अत्यंत साध्या स्त्रीची आहे. भूमिका अत्यंत साधी वाटत असली तरी या अभिनेत्रीने यात जान ओतली आहे.

लोकांना त्यामुळेच ही व्यक्तिरेखा अगदी आपलीशी वाटते. पण मित्रांनो, त्यांच्या या साध्या भोळ्या व्यक्तिरेखेवर जाऊ नका बरं का! खऱ्या आयुष्यातले अंजली जोगळेकर यांचे फोटो बघितले तर तुम्हाला अगदी आश्चर्याचा धक्काच बसेल.

‘देवमाणूस’ हा काही अंजली जोगळेकर यांचा अभिनयातला पहिला प्रयत्न नाही. शॉर्ट फिल्म्स च्या प्रेक्षकांना तर हा चेहरा अगदीच ओळखीचा आहे. अंजली यांनी बऱ्याच शॉर्ट फिल्म्स मध्ये काम केलं आहे. ‘काव काव’ या शॉर्ट फिल्म मधली त्यांची भूमिका प्रचंड गाजली होती. वंदना, सावित्री, दिवली नाही विझता कामा, फिंगरप्रिंट, सिलवट या त्यांच्या काही गाजलेल्या कलाकृती. ‘सिलवट’ या शॉर्ट फिल्मला तर अनेक नामांकने आणि पुरस्कार मिळाले आहेत.

त्रिज्या, गॅट मॅट यांसारख्या चित्रपटांमध्ये देखील अंजली यांनी काम केले आहे. सध्या त्या ‘देवमाणूस’ च्या चित्रीकरणात व्यस्त आहेत. अधून मधून पडद्यामागे चालणाऱ्या गमती जमती त्या सोशल मीडिया वर शेअर करत असतात. तसेच सहकलाकारांच्या गंमतींमध्येही सहभागी होत असतात.

तर मंडळी, मालिकेत साध्या दिसणाऱ्या अंजली जोगळेकर खऱ्या आयुष्यात मात्र खूपच ग्लॅमरस आहेत बरं का. त्यांचे सोशल मीडिया वरील फोटो पाहिले तर हे तुमच्या सहज लक्षात येईल.

You might also like