एकदम झक्कास माहिती दररोज फक्त तुमच्यासाठी!

‘देवमाणूस’ मधील चंदाचा ग्लॅमरस लूक! माधुरीच्या अदांनी चाहते घायाळ..

पैशासाठी हपापलेल्या आणि प्रसंगी त्यासाठी लोकांचे खू’न करणाऱ्या डॉ. अजितकुमार उर्फ देवीसिंग ची कथा ‘देवमाणूस’ या मालिकेतून सांगण्यात आली आहे. एरवी कोणालाही न घाबरणारा, लोकांना गं’डा घालून त्यांचे पैसे हडपणारा, त्यानंतर त्यांचे खू’न करणारा आणि अ’टक झाल्यानंतरही आपल्या हुशारीने या सगळ्या आरोपांतून निर्दोष मुक्तता करवून घेणारा देवीसिंग एका व्यक्तीला मात्र जाम घाबरतो. ती व्यक्ती म्हणजे मालिकेत नव्याने एन्ट्री झालेली चंदा.

या बेधडक असलेल्या आणि प्रसंगी देवीसिंगला भोवळ आणणाऱ्या चंदाचे पात्र साकारले आहे अभिनेत्री माधुरी पवारने. माधुरी सोशल मीडिया वर बरीच सक्रीय असते.

मालिकेत गावरान चंदाचे पात्र साकारणारी माधुरी खऱ्या आयुष्यात मात्र बरीच ग्लॅमरस आहे. तिचे हे ग्लॅमरस फोटो आपल्याला तिच्या सोशल मीडिया अकाऊंट वर पाहायला मिळू शकतात. या फोटोंनी माधुरीचे चाहते मात्र भलतेच घायाळ झालेले दिसतात.

माधुरीला आपण या आधी ‘तुझ्यात जीव रंगला’ मालिकेत पाहिले आहे. धनश्री काडगावकर या मालिकेत आधी नंदिताची म्हणजेच वहिनीसाहेबांची भूमिका करत होती. पण तिने मालिकेला रामराम ठोकल्यावर ही भूमिका माधुरी पवारच्या पदरात पडली. मालिकेत दमदार एन्ट्री करत या भूमिकेचे अर्थातच माधुरीने सोने केले.

तिने हे वहिनीसाहेबांचे पात्र खूपच जीव ओतून साकारले. आता आपल्या ‘चंदा’ च्या धडाकेबाज भूमिकेतून ती प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेत आहे. ‘देवमाणूस’ मालिकेतल्या या नव्या चेहऱ्याने सगळ्यांनाच आपल्याकडे आकर्षून घेतले आहे.

अभिनेत्री असण्याबरोबरच माधुरी एक चांगली नृत्यांगणा देखील आहे. तिने ‘अप्सरा आली’ हा डान्स रिऍलिटी शो देखील जिंकला आहे. तिला नृत्याची प्रचंड आवड असून तिचे टिकटॉक व्हिडिओ प्रचंड व्हायरल झाले आहेत. इंस्टाग्राम वर देखील तिचे फॅन फॉलोविंग जबरदस्त आहे.

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by 𝐦𝐚𝐝𝐡𝐮𝐫𝐢 𝐩𝐚𝐰𝐚𝐫 (@madhuripawarofficial)

तिचे इंस्टाग्राम अकाऊंट पाहिले असता लक्षात येईल की माधुरीने खूप वेगवेगळ्या स्टाईल मध्ये आपले फोटोशूट करून घेतले आहे. या सगळ्याच फोटोंमध्ये ती खूपच सुंदर आणि ग्लॅमरस दिसते. काय मग मित्रहो, कशी वाटली माधुरी पवारची ही देखणी अदा? तुम्हीही घायाळ झालात ना?

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by 𝐦𝐚𝐝𝐡𝐮𝐫𝐢 𝐩𝐚𝐰𝐚𝐫 (@madhuripawarofficial)

तुमच्या आवडत्या कलाकारांचे असेच काही अपडेट्स घेऊन आम्ही येत असतो. त्यासाठी आमचे लेख नक्की वाचत चला. तुम्हाला आवडलेल्या लेखाला लाईक करायला विसरू नका. तसेच इतरांनाही असे चांगले लेख वाचायला मिळावेत यासाठी तुम्हाला आवडलेले लेख शेअर करत राहा.

You might also like