एकदम झक्कास माहिती दररोज फक्त तुमच्यासाठी!

‘देवमाणूस’ चा मुखवटा उतरणार! स्वातंत्र्यदिनादिवशी मिळणार गु’न्हेगाराला शिक्षा…

झी मराठी वाहिनी वरील ‘देवमाणूस’ ही मालिका अखेर प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. मालिकेचे शेवटचे मोजकेच दिवस उरल्याने मालिकेचे कथानक वेगाने पुढे जात आहे. रात्री साडेदहाच्या स्लॉट मध्ये टीआरपीच्या बाबतीत ‘देवमाणूस’ ने कायमच आपले स्थान अव्वल राखले आहे.

ही मालिका आपल्या रहस्यमयी कथानकामुळे प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली आहे. मात्र सर्वांच्या आवडीची ही मालिका १५ ऑगस्ट नंतर प्रेक्षकांना पाहता येणार नाही.

चुकीला माफी नाही!
होय, रविवारी १५ ऑगस्ट रोजी ‘देवमाणूस’ या मालिकेचा शेवटचा भाग प्रसारीत होणार आहे. हा विशेष भाग असणार आहे. या भागाचा प्रोमो नुकताच रिलीज करण्यात आला. यामध्ये डॉ. अजितकुमार उर्फ देवीसिंग आपल्या गु’न्ह्यांची कबुली देताना दिसत आहे.

या आधी डॉ. अजितकुमार पुराव्यांअभावी कायद्याच्या कचाट्यातून सुटला होता. मात्र आता असे काय घडणार आहे ज्यामुळे देवीसिंग पुन्हा पोलिसांच्या कचाट्यात सापडणार आहे? मालिका असे कोणते वळण घेणार आहे ज्यामुळे देवीसिंग स्वतःच स्वतःच्या गु’न्ह्यांची कबुली द्यायला तयार झाला आहे?

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by देवमाणूस (@devmanus_official)

‘देवमाणूस’ मध्ये सध्या काय चाललंय?
डॉ. अजितकुमारची तब्बल अकरा खु’नांच्या गु’न्ह्यातून निर्दोष मुक्तता झाल्याचे दाखवण्यात आले आहे. पुराव्यांअभावी ही सुटका झाली आहे. डिंपल आणि अजितकुमारच्या लग्नाची तयारी देखील चालू झाली आहे.

मात्र अजितकुमार उर्फ देवीसिंग पुन्हा पोलिसांच्या जाळ्यात पुन्हा कसा अडकणार हे येणाऱ्या भागांमध्ये दाखवले जाणार आहे. भल्याभल्यांना मृ’त्यू’च्या’ दाढेत ढकलणारा देवीसिंग स्वतःला मात्र पोलिसांच्या तावडीतून वाचवू शकणार नाहीये.

देवीसिंगचा धंदा बंद करणार चंदा!
देवीसिंगच्या गु’न्ह्यां’ना आळा घालण्यासाठी या मालिकेत नव्याने एन्ट्री झालेले चंदा हे पात्र मदत करताना दिसेल. लग्नाच्या आमिषाने चंदाला लुबाडणाऱ्या देवीसिंगचा माग काढत चंदा आता त्याच्यापर्यंत पोचली आहे. देवीसिंगने तिला फसवल्याने मनाविरुद्ध चंदा दारूच्या धंद्यात फसली गेली.

या गोष्टीचा सूड उगवण्यासाठी चंदा आता देवीसिंगपर्यंत पोचली आहे आणि त्याला आपल्या तालावर नाचवत आहे. चंदाकडे डॉ. अजितकुमारच देवीसिंग असल्याचे पुरावे आहेत. त्यामुळे इतरांना आपल्या तालावर नाचवणारा देवीसिंग चंदाच्या ताटाखालचं मांजर झाल्याचं दिसत आहे.

मालिका आता एका अत्यंत मनोरंजक वळणावर येऊन पोचली आहे. जाता जाता मालिका प्रेक्षकांचे खूप मनोरंजन करून जाणार यात शंका नाही. मालिकेत पुढे काय घडणार आणि कसे घडणार याबाबत जरी प्रेक्षकांमध्ये कमालीची उत्सुकता असली, तरी त्यांची आवडती मालिका त्यांचा निरोप घेणार असल्याने प्रेक्षकांमध्ये थोडी निराशादेखील आहे.

You might also like