एकदम झक्कास माहिती दररोज फक्त तुमच्यासाठी!

‘देवमाणूस’ फेम गावरान वंदी आत्या खऱ्या आयुष्यात दिसते अशी! तिचा मॉडर्न लूक पाहून चकित व्हाल…

‘देवमाणूस’ या झी मराठी वाहिनी वरील मालिकेने अनेक नव्या चेहऱ्यांशी प्रेक्षकांची ओळख करून दिली. चेहरे नवीन असले तरी त्यांनी प्रेक्षकांच्या मनात निर्माण केलेली जागा ही अत्यंत भक्कम आहे.

आपल्या अभिनयाने, संवादफेकीच्या शैलीने या कलाकारांनी प्रेक्षकांच्या मनात आपले स्वतंत्र स्थान निर्माण केले आहे. जशी बाकीच्या कलाकारांबद्दल लोकांच्या मनात कुतूहल असते, तसेच या कलाकारांबद्दलही लोकांना उत्सुकता आहे.

हे कलाकार जसे पडद्यावर दिसतात तसेच ते खऱ्या आयुष्यात देखील दिसतात का, पडद्यावरचे पात्र आणि त्यांचा मूळ स्वभाव यात फरक आहे की दोन्ही सारखेच आहेत, कलाकारांच्या वैयक्तिक आयुष्यात सामान्य माणसांच्या आयुष्यापेक्षा काही वेगळं घडत असतं का, असे अनेक प्रश्न प्रेक्षकांच्या मनात उत्पन्न होत असतात. काही प्रश्नांची उत्तरं त्यांना मिळतात, पण काही प्रश्नांची उत्तरं मिळण्यासाठी मात्र त्यांना वाट पाहावी लागते.

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Pushpa Chaudhari (@pushpachaudhari03)

आज आपण ज्या कलाकाराबद्दल जाणून घेणार आहोत, त्यांचं नाव आहे पुष्पा चौधरी. ‘देवमाणूस’ मालिकेतील वंदी आत्या ही व्यक्तिरेखा गावरान, हावरट आणि भांडखोर आहे. खऱ्या आयुष्यात मात्र पुष्पा चौधरी अत्यंत मॉडर्न आहेत.

त्यांच्या सोशल मीडिया वरच्या फोटो वरून हे सिद्ध होतं. पुष्पा एक उत्तम अभिनेत्री, मॉडेल आणि गायिका आहेत. ‘बाबो’ या मराठी चित्रपटात त्या झळकल्या होत्या.

त्यांना गायनाची विशेष आवड असून आपल्या गायनाचे व्हिडिओ त्या सोशल मीडिया वर शेअर करत चाहत्यांसाकडून वाहवा मिळवत असतात. आश्चर्य म्हणजे पुष्पा यांनी अनेक सौंदर्यस्पर्धांमध्ये भाग घेत त्यातल्या बऱ्याचशा स्पर्धा जिंकल्या आहेत.

२०२० मध्ये त्यांना ‘मिसेस कॉन्फिडन्स’ हा किताब मिळाला होता. यावर्षी त्यांनी ‘सुपरवुमन’ किताब जिंकला आहे.

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Pushpa Chaudhari (@pushpachaudhari03)

पुष्पा चौधरी ‘देवमाणूस’ मालिकेमुळे घराघरांत पोचल्या आहेत. आपल्या अभिनयाने त्यांनी प्रेक्षकांच्या मनात आपली एक वेगळी जागा निर्माण केली आहे. अभिनयाशी प्रामाणिक असणाऱ्या या अभिनेत्री सोशल मीडियाशी देखील तेवढंच इमान राखून आहेत.

त्या नेहमी सोशल मीडिया वर ऍक्टिव्ह असतात. नेहमी काही ना काही त्या सोशल मीडिया वरून प्रेक्षकांबरोबर शेअर करत असतात.

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Pushpa Chaudhari (@pushpachaudhari03)

‘देवमाणूस’ मालिकेतील नव्या वळणांनी प्रेक्षकांची उत्सुकता अजूनच ताणली गेली आहे. अजितकुमार ला त्याच्या पापांची शिक्षा मिळणार का, मालिकेत पुढे अजून कोणते ट्विस्ट येणार आहेत याबाबत प्रेक्षकांमध्ये कमालीची उत्सुकता आहे. आता आलेल्या नव्या ट्विस्ट ने मालिकेची कथा पुढे कोणत्या वळणावर जाऊन उभी राहील हे पाहणे मनोरंजक ठरेल.

नमस्कार वाचक मित्रांनो, आमचा हा लेख तुम्हला कसा वाटला आम्हला कंमेंट करून नक्की कळवा, तसेच आमचे फेसबुक पेज हि लाईक करायला विसरू नका. मनोरंजन क्षेत्रामधील असेच अधिक लेख आम्ही तुमच्यासाठी घेऊन येत असतो. लेख आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका कारण यामुळे आम्हाला आणखी लेख लिहायला प्रोत्साहन मिळते.

You might also like