एकदम झक्कास माहिती दररोज फक्त तुमच्यासाठी!

‘देवमाणूस’ मालिकेतले कलाकार परतले घरी! बंद होणार का मालिका?

झी मराठी वर चालू असलेली ‘देवमाणूस’ ही मालिका सध्या प्रेक्षकांना टीव्ही समोरून हलू देत नाहीये. त्यातल्या रहस्यांनी कायमच प्रेक्षकांना खुर्चीला खिळवून ठेवले आहे. नुकतेच यातल्या कलाकारांनी घरी परतल्याचे फोटो सोशल मीडिया वर शेअर केले आहेत. त्यामुळे या मालिकेचं शूटींग संपलं असून लवकरच ती प्रेक्षकांचा निरोप घेणार असल्याच्या बातम्या पसरू लागल्या आहेत. पण हे खरं आहे का? खरंच ‘देवमाणूस’ मालिका बंद होणार आहे का? असे बरेच प्रश्न प्रेक्षकांना पडले असून त्याचे उत्तरही आम्ही तुम्हाला लवकरच देणार आहोत.

‘देवमाणूस’ ची कथा खऱ्या घटनेवर आधारीत असून यातल्या पात्रांनी प्रेक्षकांना आपल्या कथेत गुंतवून ठेवले आहे. एका खोट्या डॉक्टरने सगळ्या गावाला फसवले आणि पैशांसाठी तेरा वर्षांत तब्बल सहा खून केले, अशी या मालिकेची साधारण कथा आहे. डॉ. अजितकुमार देव असे या मालिकेतल्या खोट्या डॉक्टरचे नाव असून ही भूमिका केली आहे किरण गायकवाड या अभिनेत्याने. या मालिकेतल्या बऱ्याच व्यक्तिरेखा प्रेक्षकांच्या पसंतीच्या आहेत.

या मालिकेतल्या सर्व कलाकारांनी सध्या सोशल मीडिया वर शेअर केलेल्या फोटोज् मुळे सध्या प्रेक्षकांमध्ये खळबळ माजली आहे. यामध्ये कलाकारांनी घरी परतल्याचा आनंद व्यक्त केला आहे. त्यामुळे आता मालिका बंद होते की काय अशी हुरहूर प्रेक्षकांना लागून राहिली आहे. तर मंडळी, असे अजिबात नाहीये. मालिका बंद होणार असल्याच्या सध्या तरी या अ’फवा असून कलाकारांनी शेअर केलेले फोटोज् हे वेगळ्या कारणासाठी आहेत.

लॉ क डाऊन मुळे महाराष्ट्र राज्यात सगळ्याच मालिकांचे शूटींग बंद होते. काही मालिकांच्या निर्मात्यांनी मात्र यावर शक्कल लढवत दुसऱ्या राज्यांमध्ये जाऊन शूटींग करणे पसंत केले. ‘देवमाणूस’ ची सगळी टीम देखील शूटींग निमित्त राज्याबाहेर होती. आता मात्र शूटींगला परवानगी मिळाल्याने सर्व टीम परत महाराष्ट्रात परतली असून कलाकार देखील आता आपापल्या घरी परतले आहेत.

बऱ्याच दिवसांपासून या मालिकेतले सेट बदललेले दिसत होते ते याच कारणांमुळे. आता मात्र मालिका आपल्या मूळ सेटवर चित्रित होणार असून प्रेक्षकांना पुन्हा एकदा तो जुन्या सेट चा फील घेता येणार आहे. आपल्या मूळ सेटवर परतून कलाकारही खूप खूष असतील याची आपण कल्पना करूच शकतो. त्यामुळे मालिका बंद होणार असल्याची बातमी ही अ’फवा ठरली असून प्रेक्षकांना त्याचा सुखद ध’क्का बसला आहे.

You might also like