एकदम झक्कास माहिती दररोज फक्त तुमच्यासाठी!

देवमाणूस या मालिकेतील डॉक्टरला लवकरच होणार कठोर शिक्षा, होणार डॉक्टरचे असे काही की ऐकून थक्क व्हाल..

डॉक्टर हा समाजाच्या स्वास्थ्याचा मजबूत आधारस्तंभ असतो. डॉक्टर हे लोकांसाठी देवदूत असतात. ते लोकांना मृ त्यू च्या घशातून बाहेर आणतात. पण ज्यांच्याकडे आपण सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून पाहतो तेच डॉक्टर जर आपला कर्दनकाळ ठरत असतील तर काय होईल? अगदी ही कल्पना करूनसुद्धा अंगावर काटा येतो. पण सध्या चर्चेत असलेल्या देवमाणूस या मालिकेतल्या देवी सिंग नावाच्या डॉक्टरांचे वर्तन काहीसे अशाच प्रकारचे आहे. पण आता या डॉक्टरांचा लवकरच पर्दाफाश होणार आहे आणि तो गजांआड जाणार आहे.

या मालिकेत डॉक्टरांची भूमिका किरण गायकवाड हा गुणी अभिनेता साकारतो आहे. तुम्हाला हे ऐकून आश्चर्याचा धक्का बसेल की देवमाणूस ही मालिका एका सत्यघटनेवर आधारीत आहे. हो.. ही घटना आधीच घडून गेलेली आहे.

पण अशा लोकांचा खरा चेहरा जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचावा व लोकांनी सतर्क राहावे असे या मालिकेच्या निर्मात्यांचे आणि सर्व कलाकारांचे ध्येय्य आहे. ते त्या दृष्टीने सर्वतोपरी प्रयत्नही करत आहेत. पण ही मालिका आता शेवटच्या टप्प्यावर येऊन पोहोचली आहे. तुमच्या उत्सुकतेला आम्ही आज पूर्णविराम देणार आहोत.

सध्या मालिकेत डॉ. अजित कुमार यांचा विवाह डिंपल हिच्याशी होणार आहे. डॉ. अजित कुमार अर्थातच देवी सिंग हे आहेत. एसिपी दिव्या सिंग हीला नुकतेच डॉक्टरांचे सत्य कळले आहे. तिने ठोस पुरावे गोळा करुन डॉक्टरांना कोर्टाची पायरी देखील चढायला लावली आहे.

सध्या खटला चालू असून अद्याप मालिका निकालापर्यंत गेलेली नाही. पण किरण गायकवाड याने त्याच्या सोशल मिडीयावर गजांआड गेलेल्या डॉक्टरांचा फोओ शेअर केला आहे. याचाच अर्थ असा की निकाल हा शेवटी डॉक्टरांच्या विरोधात लागणार आहे आणि सत्याचा विजय होणार आहे. अशाप्रकारे मालिका संपणार आहे.

ज्या सत्य घटनेवर ही मालिका आधारीत आहे ती घटना २००३ ते २०१६ दरम्यान घडून गेली आहे. या काळात वाई क्षेत्रातील अनेक लोक बेपत्ता होत होते आणि पोलीसांना साधी चाहूलही लागत नव्हती. सर्व लोक भयभीत झाले होते. या सर्वांमागचा सूत्रधार डॉ. संतोष पोळ हा होता. खरेतर मालिकेतील डॉ. अजित म्हणजेच खऱ्या घटनेतील संतोष पोळ होय.

अनेक जणांना या डॉक्टरांवर शंका होती पण कुणाकडेच तसे ठोस पुरावे नव्हते. २०१६ मधे अंगणवाडी शिक्षिका मंगल जेधे ही अचानक गायब झाली आणि तिच्या घरच्यांना डॉक्टर पोळ यांच्यावर शंका आली. शंका येताच त्यांनी पोलीस ठाणे गाठले आणि यावेळी तपासादरम्यान डॉक्टर पोळ याचा खेळ खलास झाला.

डॉ. संतोष पोळ याने दिलेल्या कबुलीजबाबातून सर्व सत्य २०१६ साली उघडकीस आले. त्याने या कबुलीत असेही स्पष्ट केले की ज्यादेखील इसमाला तो गायब करायचा त्याच्या तो दोन महिन्यांपासून मागावर असायचा.

त्याची संपूर्ण माहिती काढायचा. प्लॅन आखायचा. त्या इसमाला दफन करायची जागा शोधून ठेवायचा आणि मग कुणाला कानोकान खबर न होऊ देता त्याला मारून टाकायचा. तब्बल सोळा वर्ष डॉ पोळ हा पोलिसांच्या हातावर तुरी देत राहिला.

याच पोळची कहाणी मालिकेत जरा वेगळ्या स्वरुपात दाखवली जात आहे. त्यामुळे याचा शेवट आम्ही तुम्हाला सांगून टाकला आहे. पण आम्ही शेवट सांगून आणि तुम्ही वाचून तो थरार अनुभवू शकणार नाही. त्यामुळे नक्कीच तुम्ही ही मालिका बघत राहा आणि तुमचे या संपूर्ण घटनेवरील मत आम्हाला कळवा.

You might also like