एकदम झक्कास माहिती दररोज फक्त तुमच्यासाठी!

रिंकी भाभी करणार का ‘देवमाणूस’ चा शेवट? पोलिसांची नवीन चाल..!

‘देवमाणूस’ मालिका लोकांच्या खूप आवडीची होती. मात्र डॉ. अजितकुमार देव उर्फ देवीसिंगच्या सुटकेनंतर मालिकेत नव्या पात्रांची एन्ट्री झाली आणि प्रेक्षकांचा या मालिकेतला रस कमी होऊ लागला.

सोशल मीडिया वर मालिका उगीचच ताणली जात आहे असे आरोप होऊ लागले आहेत. त्यामुळे प्रेक्षकांनी या मालिकेकडे पाठ फिरवायला सुरुवात केली आहे. देवीसिंगच्या सुटकेनंतर दोन नवीन पात्रांची एन्ट्री या मालिकेत झालेली पाहायला मिळते.

देवीसिंग या गावात येण्यापूर्वी एका महिलेला आपल्या प्रेमाच्या जाळ्यात अडकवून फसवतो आणि तिचे पैसे घेऊन या गावात पळून येतो. ती महिला म्हणजे चंदा. सध्या चंदा देवीसिंगचा शोध घेत त्याच्यापर्यंत पोचली आहे आणि त्याला ब्लॅ’क’मेल करत आहे. ती सतत पैशांचा तगादा लावत असल्याने देवीसिंगच्या मनात सतत तिचा काटा काढण्याचे विचार सुरू असतात. डॉ. अजितकुमार आणि डिंपल चंदाचा काटा काढणार की चंदामुळे दोघेही अडकणार हे येणाऱ्या भागांमध्ये कळेलच.

या मालिकेत अजून एक नवीन पात्र दाखल झाले आहे ते म्हणजे रिंकी भाभी. रिंकी भाभीचे हे पात्र साकारले आहे संजना काळे या अभिनेत्रीने. रिंकी भाभी देखील डॉ. अजितकुमारच्या खोट्या प्रेमाच्या जाळ्यात अडकणार असं दिसतंय.

ती सतत चेकअपसाठी डॉ. अजितकुमारकडे येत असते. हे पात्र गुजराती कुटुंबातील असून तिच्याकडे खूप पैसे आहे हेदेखील आता देवीसिंगला समजले आहे. मात्र प्रेक्षकांचा अंदाज आहे की रिंकी भाभीचे हे पात्र हा एक दिखावा देखील असू शकतो. हे पात्र पोलीस किंवा पोलिसांचा खबरी असू शकतं, असा काही प्रेक्षकांचा अंदाज आहे. आता हे अंदाज किती खरे आहेत हे ये

णाऱ्या भागांमध्ये कळेलच.

 

संजना काळे या अभिनेत्रीने या आधीही अनेक मालिका आणि चित्रपटांमध्ये काम केले आहे. संजना केवळ एक अभिनेत्रीच नाही, तर ती एक उत्तम नृत्यदिग्दर्शिका आणि डान्सर देखील आहे. तिने ‘तू माझी दिलबारा गं’ या गाण्याच्या म्युझिक व्हिडिओ मध्ये काम केले आहे.

कलर्स मराठी वाहिनी वरील ‘बाळूमामाच्या नावानं चांगभलं’ या मालिकेतील नर्मदा या भूमिकेने संजनाला ओळख मिळवून दिली. फक्त मराठी वाहिनी वरील ‘सप्तपदी’ या मालिकेत तिने आस्था नावाची भूमिका साकारली होती. ‘गेट टू गेदर’ या चित्रपटात देखील ती आपल्याला दिसली होती.

संजनाचे ‘देवमाणूस’ मधील पात्र मालिकेला अजून कोणते नवीन वळण देणार की मालिकेचा शेवट घडवून आणणार हे बघणे मनोरंजक असणार आहे. झी मराठी वर सध्या नवीन मालिका येत आहेत, त्यामुळे रिंकी भाभी हे पात्र ‘देवमाणूस’ मालिकेचा शेवट घडवून आणेल असेही बोलले जात आहे.

You might also like