एकदम झक्कास माहिती दररोज फक्त तुमच्यासाठी!

मालिकेत येण्याआधी ‘देवमाणूस’ मधील हे कलाकार करायचे येथे नोकरी, सरू आज्जी होत्या सरकारी नोकरीत..

‘देवमाणूस’ मालिका सध्या आपल्या शेवटाकडे प्रवास करत असल्याचे बोलले जात असले तरी या मालिकेचे प्रेक्षकांच्या मनातील स्थान कुठेच जाणार नाहीये. हे स्थान मिळवण्यासाठी यातील कलाकारांनी खूप कष्ट घेतले आहेत. पण मंडळी, अचानक प्रकाशात आलेले हे स्टार्स ‘स्टार’ बनण्याआधी काय करायचे? या लोकांनी लगेच आपले अभिनयातले करिअर सुरू केले की त्याआधी देखील ते कुठे दुसरे काही काम करत होते? या लेखात आम्ही याच काही प्रश्नांची उत्तरे देणार आहोत.

१. किरण गायकवाड
‘देवमाणूस’ मालिकेत मध्यवर्ती भूमिका साकारणारा अभिनेता म्हणजेच किरण गायकवाड. या मालिकेत किरणने डॉ. अजितकुमार देव ही व्यक्तिरेखा साकारली आहे. खलनायकाची भूमिका असली तरी तिच्या लोकप्रिय होण्यामागे अर्थातच किरण गायकवाडचे श्रेय आहे. आपल्या अभिनयातून त्याने ही भूमिका जिवंत केली आहे. किरणला शाळेपासूनच अभिनयाची आवड होती.

शिक्षण पूर्ण झाल्यावर किरण महिंद्रा कंपनीत कामाला लागला. मुळातच अभिनयाची आवड असल्याने आणि नंतर इतरांच्या प्रोत्साहनाने किरण पूर्णवेळ अभिनय क्षेत्राकडे वळला आणि त्याचा परिणाम आपण पाहतोच आहोत. आज किरण त्याच्या अभिनय कौशल्यामुळे प्रेक्षकांच्या गळ्यातील ताईत बनला आहे.

२. रुक्मिणी सुतार
डॉक्टरच्या भूमिकेबरोबरच प्रसिद्ध झालेली अजून एक व्यक्तिरेखा म्हणजे आजीची. टोचणाऱ्या पण प्रेक्षकांच्या मनात पोचणाऱ्या म्हणींनी समोरच्याला गपगार करणाऱ्या आजीच्या कचाट्यातून कोणालाही सुटका नाही. डिंपल आणि टोन्या तर आजीचे नेहमीचे गिऱ्हाईक. या आजीची भूमिका अत्यंत चोखपणे पार पाडणारी अभिनेत्री आहे रुक्मिणी सुतार. रुक्मिणी आधी सरकारी नोकरीत होत्या. नंतर त्या अभिनय क्षेत्राकडे वळल्या. आणि प्रेक्षक यासाठी त्यांचे अत्यंत आभारी आहेत. कारण त्याशिवाय ही फटकेदार म्हणींची आजी आपल्याला मिळालीच नसती!

३. सोनाली पाटील
‘आर्या देशमुख’ ही व्यक्तिरेखा साकारणारी अभिनेत्री आहे सोनाली पाटील. आपलं शिक्षण पूर्ण करत सोनालीने आपली एकांकिका आणि नाटकातली घोडदौड सुरूच ठेवली. शिक्षण पूर्ण झाल्यावर सोनाली सिनिअर कॉलेज मध्ये शिक्षिकेची नोकरी करू लागली. जवळपास तीन वर्षे तिने नोकरी आणि अभिनय ही तारेवरची कसरत केली. त्यानंतर मात्र अभिनयाकडे लक्ष देत सोनालीने आपल्या ‘आर्या देशमुख’ या संधीचं सोनं केलं. लवकरच तिला दुसऱ्या मालिकांमध्ये बघितलं तर आश्चर्य वाटून घेऊ नका.

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Sonali Patil (@sonalipatil_official)

४. गायत्री बनसोडे
बोलके डोळे, उत्तम अभिनय आणि बिनधास्त वागणं यामुळे ‘रेश्मा’ ही व्यक्तिरेखा साकारणारी गायत्री बनसोडे खूप लोकप्रिय झाली आहे. ‘देवमाणूस’ बरोबरच तिची ‘शिव्या देणारी गर्लफ्रेंड’ ही वेब सिरीज देखील तितकीच लोकप्रिय आहे. ‘देवमाणूस’ मधील ‘रेश्मा’ ने तिला एक वेगळी ओळख मिळवून दिली. शिक्षण पूर्ण झाल्यावर गायत्री एक कंपनीत सेल्स विभागात कामाला होती. ओळखीतल्या कुणीतरी तिला नाटकात काम करण्याविषयी सुचवलं आणि मग सुरू झाली तिची अभिनयातली कारकीर्द. अजूनही अनेक मालिका आणि नाटकांत ती आपल्याला दिसेल यात शंकाच नाही.

तर मित्रहो, हे पडद्यावरचे कलाकार आणि त्यांची पडद्यामागची कामे तुम्हाला कशी वाटली ते आम्हाला जरूर कळवा.

You might also like