एकदम झक्कास माहिती दररोज फक्त तुमच्यासाठी!

‘देवमाणूस’ मधील बाबू खऱ्या आयुष्यात कोण आहे? उच्चशिक्षण घेऊन केली पुण्यात नोकरी…

अभिनय क्षेत्रात काम करणाऱ्या कलाकारांच्या पडद्यावर दिसणाऱ्या भूमिका आणि खऱ्या आयुष्यातल्या भूमिका वेगवेगळ्या असतात. प्रेक्षकांना फक्त त्यांच्या पडद्यावरच्या व्यक्तिरेखेबद्दल माहिती असते.

प्रत्यक्षात मात्र हे कलाकार कसे आहेत हे सामान्य प्रेक्षकांना माहीत नसते. कलाकारांच्या अशाच काही माहीत नसलेल्या गोष्टी आम्ही तुमच्यासाठी घेऊन येत असतो. आज जाणून घेऊया ‘देवमाणूस’ या मालिकेत ‘बाबू’ ही भूमिका साकारणाऱ्या कलाकाराबद्दल.

झी मराठी वाहिनीवर सुरू असलेल्या ‘देवमाणूस’ मालिकेची चर्चा घराघरात आहे. या मालिकेत काम करणारे कलाकार आणि त्यांनी साकारलेल्या व्यक्तिरेखा खूप लोकप्रिय आहेत.

या मालिकेत ‘बाबू’ नावाची एक व्यक्तिरेखा आहे. बाबू किंवा बाबू दादा हे मालिकेत डिंपलचे वडील आहेत. ही भूमिका साकारली आहे अंकुश मांडेकर या अभिनेत्याने. अतिशय कठीण परिस्थितीतून वर येत आपलं स्वप्न पूर्ण करणाऱ्या कलाकारांपैकी एक म्हणजे अंकुश मांडेकर.

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Ankush Mandekar (@ankush.mandekar)

लहानपणी अंकुश यांनी भारूडांमध्ये काम केले आहे. त्यामुळे त्यांचा अभिनयाचा पिंड तयार झाला. बी. कॉम. पर्यंत शिक्षण पूर्ण करून अंकुश नोकरीसाठी पुण्यात आले. मात्र अभिनयाची आवड त्यांना गप्प बसू देत नव्हती.

योगेश सोमण यांनी सर्वप्रथम त्यांना त्यांच्या ‘सावकाराची जन्मठेप’ या नाटकात काम करायची संधी दिली होती. या नाटकात त्यांनी आपल्या अभिनय कौशल्याने प्रेक्षकांच्या मनावर छाप टाकली. इथून सुरू झाला त्यांचा अभिनयाचा प्रवास.

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Ankush Mandekar (@ankush.mandekar)

सुरेश पाटोळे यांच्या ‘मला जगायचंय’ या चित्रपटाने अंकुश यांच्या चित्रपट कारकिर्दीची सुरुवात झाली. पुढे झेंडा, स्वाभिमान, लादेन आला रे आला यांसारख्या चित्रपटांमधून त्यांनी आपल्या अभिनयाची चुणूक दाखवून दिली.

अंकुश मांडेकर यांनी आजपर्यंत जवळपास ४७ चित्रपट आणि सात नाटकांमध्ये काम केले आहे. आपल्या कामाबद्दल प्रेम असेल तर माणूस कोणत्याही परिस्थितीत ते काम पूर्ण करून दाखवतोच, या उक्तीचे चालते-बोलते उदाहरण म्हणजे अंकुश मांडेकर.

सध्या ते ‘देवमाणूस’ या मालिकेतून रोज आपल्या भेटीला येत असतात. या मालिकेत ते बाबू नावाची भूमिका करत आहेत. या ‘बाबू’ व्यक्तिरेखेची बोलण्याची स्टाईल प्रेक्षकांना जाम आवडून गेली आहे. मालिकेत त्यांची ‘आरे देवा’ म्हणण्याची पद्धत प्रेक्षकांना खूप भावली आहे.

अंकुश मांडेकर यांच्यासारखे मुरलेले कलाकार छोट्या छोट्या गोष्टी सुद्धा आपल्या अभिनयाने नव्या उंचीवर नेऊन ठेवतात. त्यामुळे ते प्रेक्षकांचे लाडके असतात. मित्रहो, तुम्हाला कसा वाटतो अंकुश मांडेकर यांचा अभिनय? आम्हाला कमेंट्स मध्ये जरूर कळवा.

You might also like