एकदम झक्कास माहिती दररोज फक्त तुमच्यासाठी!

“देवमाणूस” मालिका अजून रंगणार! मालिकेत आता नव्या पात्राचे स्वागत होणार असून , ही अभिनेत्री घेणार एन्ट्री..

मित्रहो झी मराठीवर अनेक मालिका दिवसेंदिवस रंजक बनत चालल्या आहेत, त्यामुळे रसिक देखील फार उत्सुक झाले आहेत. झी मराठी वरील सर्व मालिका खूप आकर्षून घेतात, तसेच त्यातील कलाकार आणि त्यांचा अभिनय तर अप्रतिम आहे. मनाला गुंतुवून ठेवणारा आहे, त्यांच्या भूमिका आणि त्यांचा अभिनय पाहून प्रेक्षकांना त्यांची खूप सवय झाली आहे.

आपल्याच घरातील पात्र पडद्यावर दिसत असल्यासारखे भासते कारण या मालिकांनी बघता बघता घरचे रूप इतके सुंदर साकारले आहे की सगळं नैसर्गिक वाटते, त्यामुळे मालिका पाहताना एक वेगळाच आनंद मिळतो. रसिक या मालिकांना इतके प्रेम देतात की यांच्याबद्दल असणारी सर्व माहिती वेळोवेळी मिळवत असतात आणि यात असणाऱ्या पात्रांची देखील माहिती जाणून घेत असतात.

सर्व मालिकांचा विचार करता त्यातील “देवमाणूस” मालिका खूप रंगात आली आहे, रात्रीच्या वेळी प्रदर्शित होणारी ही मालिका प्रेक्षकांच्या अंगावरचे काटे उभा करतो. ही मालिका खूप छान आहे, प्रत्येक वेळी एका नव्या वळणावर येऊन ठेपते त्यामुळे पाहणाऱ्यांना या मालिकेचा कधीच कंटाळा वाटत नाही. यातील सर्व अतरंगी पात्रे आणि त्यांचा रंजक अभिनय सतत मनाला उभारी देत असतो.

आता आपण पाहतो आहोत की मालिकेत देवीसिंग उर्फ डॉक्टर अजितकुमार अकरा गुन्ह्यांच्या आरोपातून निर्दोष मुक्त झाला आहे, त्यामुळे आता पुन्हा डिंपी सोबत त्याच्या लग्नाची तयारी सुरू केली आहे. मात्र असे असले तरीही सर्वत्र अशीही चर्चा सुरू होती की मालिका बंद होणार आहे पण असे काहीही नसून मालिका आता पुन्हा जोमाने पडद्यावर झळकणार आहे.

या मालिकेत आता एका नव्या पात्राची एन्ट्री झालेली पाहायला मिळणार आहे, डॉक्टर कडून आपले पैसे घेण्याच्या कारणाने चंदा सरू आजीच्या वाड्यात येऊन राहायला लागली आहे, तिथे राहिल्यामुळे तीला डॉक्टरवर नीट पाळत करता येईल. ती वारंवार डॉक्टरकडे पैशाची मागणी करत असते, पण डॉक्टर पैसे द्यायला उशीर करत असल्याने ती त्याला खूप त्रास देत असल्याचे दिसून येते.

पण आता पुन्हा या मालिकेत आणखीन एक अभिनेत्री दिसून येणार आहे. ही अभिनेत्री दुसरी कोणी नसून संजना काळे ही आहे. संजना ही आपल्या सर्वांच्याच ओळखीची आहे, या मालिकेत येण्याआधी ती खूपशा मालिकांचा चेहरा बनली होती म्हणून तर टेलिव्हिजन वर तीचे अनेकजण चाहते आहेत.

संजना ही एक्टर, डान्सर, कोरियोग्राफर या तीनही कलांची कलाकार आहे, तीचा अभिनय याआधी आपण “बाळूमामाच्या नावानं चांगभलं “, तसेच फक्त मराठी वर “सप्तपदी”, या मालिकेत पाहिला आहेच शिवाय ती “गेट टू गेदर” या चित्रपटात महत्वाच्या भूमिकेत दिसली होती. तीची यातील भूमिका खूप लोकप्रिय झाली होती, सप्तपदी मालिकेतीलही तीचा अभिनय सुरेख वाटतो.

 

View this post on Instagram

 

A post shared by Sanjana Kale (@sanjanaaa_13)

अशी अभिनयाची प्रचंड आवड असणारी संजना आता झी मराठी वरील सर्वोत्कृष्ट मालिका “देवमाणुस” यामध्ये दिसणार आहे त्यामुळे तीची भूमिका पाहण्यासाठी तीचे सर्व चाहते फार उत्सुक आहेत. या मालिकेतील सर्व कलाकार उत्कृष्ट आहेतच आणि त्यात आता संजनाची भर पडल्यामुळे या सगळ्यांची केमिस्ट्री अगदी मनोरम असणार हे नक्की.

संजना या मालिकेत डॉक्टरकडे चेकअप साठी आलेली आहे, डॉक्टर चा व्हिडीओ पाहून ती इथवर आलेली आहे असे तीने सांगितले आहे. आता या मालिकेमुळे संजनाला पुन्हा एकदा विशेष ओळख व लोकप्रियता प्राप्त होणार हे नक्की आहे, कारण ही मालिका आता महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात चांगलीच गाजत आहे त्यामुळे यातील सर्व कलाकार देखील सर्वत्र प्रसिद्ध झाले आहेत.

मालिका निरोप घेणार असल्याच्या चर्चा सुरू असतानाच संजनाची एन्ट्री झाली आहे त्यामुळे या मालिकेने वेगळे वळण घेतले असून अजून तरी ही मालिका आणखीन खुलणार हे पक्के आहे.

या मालिकेत संजना येणार म्हटल्यावर तीच्या चाहत्यांना विशेष आनंद झाला आहे, आता पुन्हा ही मालिका कसे वळण घेणार याचीच उत्सुकता सर्व चाहत्यांच्या मध्ये निर्माण झाली आहे. संजनाच्या अभिनयाची झलक आता पुन्हा पाहायला मिळणार आहे. तर मित्रहो तुम्हीही “देवमाणूस” मालिका नक्कीच पहा आणि त्यातील इतर कालाकारांसह संजनाची भूमिका देखील कशी वाटते ते आम्हाला कमेंट करून सांगा. तसेच आजचा हा लेख तुम्हाला कसा वाटला ते नक्कीच सांगा, जर हा लेख आवडला तर लाईक आणि शेअर देखील जरूर करा.

You might also like