एकदम झक्कास माहिती दररोज फक्त तुमच्यासाठी!

देवमाणूस मालिकेतील ‘मंजुळा’ आहे खऱ्या आयुष्यात यशस्वी व्यवसायिका, पुण्यात आहे तिची ही कंपनी..

२०२० ला सुरू झालेल्या झी मराठीवरील ‘देवमाणूस’ या मालिकेने त्यातील कलाकारांना घराघरांत नेऊन पोचवले. पण मंडळी, पडद्यावर आपल्याला उत्तम अभिनय करून प्रभावित करणारे हे कलाकार पडद्यामागे काय करतात, कसे राहतात हा प्रश्न तुम्हाला नक्कीच पडला असेल. प्रत्येक कलाकार हा पडद्यावर आपली आवडती व्यक्तिरेखा असला तरी त्यांच्या व्यक्तिगत आयुष्यातले त्यांचे रोल वेगळे आहेत.

अनेक कलाकार आजकाल अभिनयाबरोबरच इतर अनेक कामे करताना दिसतात. काही लोक छंद म्हणून तर काही कमाईचे साधन म्हणून ही कामे करतात. आपण बऱ्याचदा कल्पनादेखील करू शकत नाही की हे कलाकार साइड बिझनेस म्हणून कोणती कामे करत असतील.

तर मित्रहो, आज आम्ही अशाच एका कलाकाराबद्दलची माहिती तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत. ‘देवमाणूस’ मालिकेतील मंजुळा म्हणजेच प्रसिद्ध अभिनेत्री प्रतिक्षा जाधव ही आपल्या अभिनयाने प्रेक्षकांची वाहवा मिळवते आहे.

प्रतिक्षाने या आधी जरी बऱ्याच चित्रपट आणि नाटकांतून कामे केली असली तरी ‘देवमाणूस’ मधील मंजुळेच्या भूमिकेने तिला लोक ओळखू लागले आहेत. २००७ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘अरे देवा’ या मराठी चित्रपटाद्वारे प्रतिक्षाने चित्रपटसृष्टीत पाऊल ठेवले.

त्यानंतर तिने ‘जखमी पोलीस’ (२००८), ‘चला खेळ खेळूया दोघे’ (२००९), ‘तात्या विंचू लगे रहो’ (२०१३), ‘भुताचा हनिमून’ (२०१३), ‘हे मिलन सौभाग्याचे’ (२०१३) यांसारख्या अनेक मराठी चित्रपटांमध्ये कामं केली. मराठी चित्रपटांबरोबरच प्रतिक्षा ‘डार्लिंग डार्लिंग’ (२००९) आणि ‘करून गेलो गाव’ (२०११) सारख्या नाटकांमध्येही कामं केली आहेत. तिने ‘क्राइम पेट्रोल’ (२०१६) आणि ‘दिल ढूंढता है’ (२०१७) सारख्या हिंदी मालिकाही केल्या.

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Jadhav Pratiksha (@jadhav_pratiksha_official)

तर अशी ही सर्वांची आवडती कलाकार पडद्याबाहेरच्या आयुष्यात एक यशस्वी उद्योजिका आहे. पुण्यातच जन्माला आलेल्या आणि मोठ्या झालेल्या प्रतिक्षाने पुण्यातील मांजरी रोड, हडपसर येथे आपला बिझनेस सुरू केला आहे आणि तो अत्यंत जोमात सुरू आहे. प्रतिक्षाने APPLE नावाचे वुमन सलून सुरू केले आहे. या व्यवसायाद्वारे प्रतिक्षा आपले बिझनेस वुमन होण्याचे स्वप्न देखील पूर्ण करत आहे असे दिसते.

प्रतिक्षाने अनेक मराठी मालिकांमध्ये देखील काम केले आहे. सध्या ती ‘देवमाणूस’, ‘तुझं माझं जमतंय’ आणि ‘तुझ्या इश्काचा नाद खुळा’ या मालिकांमध्ये काम करत प्रेक्षकांची मने जिंकत आहे. सध्या प्रतिक्षा ‘तुझं माझं जमतंय’ मध्ये पम्मीची भूमिका करत आहे.

आधी ही भूमिका अपूर्वा नेमळेकर करत होती. पण तिने ‘रात्रीस खेळ चाले’ मध्ये शेवंताची भूमिका स्वीकारल्यानंतर पम्मीची भूमिका प्रतिक्षा कडे आली आणि ही भूमिका ती अत्यंत मन लावून साकारत आहे हे आपण पाहूच शकतो. मंजुळाला पम्मीच्या रूपात पाहून तुम्हाला काय वाटते ते आम्हाला जरूर कळवा.

You might also like