एकदम झक्कास माहिती दररोज फक्त तुमच्यासाठी!

अखेर ती वेळ आली! उतरणार ‘देवमाणूस’ चा मुखवटा…२ तासांचा महाएपिसोड

देवमाणसाचा मुखवटा कायमचा उतरला जाणार. चंदाच्या हातून होणार देवमाणसाचा अं'त..विडिओ आला समोर..

३१ ऑगस्ट २०२० पासून ‘देवमाणूस’ ही मालिका झी मराठी वाहिनीवर सुरू झाली. बघता बघता मालिकेने प्रेक्षकांच्या मनात आपले स्थान पक्के केले. ही मालिका सत्य घटनेवर आधारीत असल्याने प्रेक्षकांमध्ये या मालिकेबद्दल कुतूहल होतेच.

आपल्या कथानकाने आणि कलाकारांच्या उत्तम अभिनयामुळे ही मालिका अल्पावधीतच प्रेक्षकांची लाडकी बनली. यातल्या डिंपल, टोन्या, सरू आजी ही पात्रं तर लोकांना भलतीच आवडून गेली. डिंपलचे संवाद, टोन्याची मस्ती, सरू आजीच्या लांबलचक शिव्या या सर्वांनी प्रेक्षकांना वेड लावलं.

गेले वर्षभर ही मालिका सुरू आहे. रात्री साडेदहाच्या स्लॉटमध्ये ही मालिका नेहमी अव्वल ठरली आहे. आता मात्र ती वेळ आली आहे. आता वेळ आली आहे मालिकेच्या निरोपाची.

वर्षभर लोकांना रात्री साडेदहा ते अकरा टीव्ही वरून नजर ढळू न देणारी मालिका आता शेवटच्या टप्प्यात आली आहे. गेल्या काही दिवसांपासून या मालिकेचा आपल्या शेवटाकडे प्रवास सुरू झाला होता. आता मात्र हा प्रवास कायमचा संपणार आहे .

खोटा डॉक्टर बनून गावातल्या भोळ्या लोकांना फसवणारा, बायकांना आपल्या प्रेमाच्या जाळ्यात अडकवून त्यांचे पैसे लुबाडणारा, जी व्यक्ती त्याच्या मार्गात येईल त्याला कायमचा संपवणारा, एवढे सगळे करूनही आपली चांगली प्रतिमा जपण्याचा प्रयत्न करणारा डॉ. अजितकुमार देव उर्फ देवीसिंग आणि ही त्याची कथा ‘देवमाणूस’. अखेर या दुष्ट प्रवृत्तीला धडा मिळणार. आता देवीसिंगला त्याच्या कुकर्मांची फळं भोगावी लागणार आहेत.

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by ZeeMarathi (@zeemarathiofficial)

झी मराठी वाहिनीवर आता यापुढे ‘देवमाणूस’ ही आवडती मालिका बघायला मिळणार नाही म्हणून प्रेक्षक थोडे खटटू झालेत. हे जरी खरं असलं तरी अखेर गु’न्हेगा’राला शि’क्षा होणार म्हणून ते खूषही आहेत. उद्या म्हणजेच १५ ऑगस्ट २०२१ ला ‘देवमाणूस’ या मालिकेचा शेवट होणार आहे.

उद्या संध्याकाळी ७ वाजता झी मराठीवर या मालिकेचा दोन तासांचा विशेष भाग प्रसारीत होणार आहे. हा महाएपिसोड असल्याने प्रेक्षकांनी आधीच आपली वेळ राखून ठेवली आहे.

झी मराठीने नुकताच या भागाचा प्रोमो रिलीज केला आहे. या प्रोमोमध्ये चंदा आणि देवीसिंगचा वाद होतो. त्यात देवीसिंग चंदाला जीवे मारण्याची ध’म’की देतो. या ध’म’कीला घाबरण्याऐवजी चंदा देवीसिंगला तिला पुढच्या १२ तासांत मा’र’ण्याचे आव्हान देते.

मात्र अखेरीस चंदाच देवीसिंगचा जी’व घेताना दाखवली आहे. अर्थात हा केवळ प्रोमो आहे. त्यावरून काही निष्कर्ष काढण्यापेक्षा उद्या संध्याकाळी ७ वाजता ‘देवमाणूस’ चा विशेष भाग बघा आणि मग तुम्हाला कळेलच की ‘देवमाणूस’ चा मुखवटा कसा उतरतो ते!

You might also like