एकदम झक्कास माहिती दररोज फक्त तुमच्यासाठी!

डॉक्टर नाचणार चंदाच्या तालावर! ‘देवमाणूस’ मालिकेत अजून एक ट्विस्ट…

रात्री साडेदहा ची वेळ झी मराठीच्या प्रेक्षकांनी राखून ठेवली आहे. का ते समजलं असेलच तुम्हाला. रात्री १०:३० ला या वाहिनीवर ‘देवमाणूस’ मालिका लागते. या मालिकेने सगळ्यांनाच खिळवून ठेवले आहे. मालिकेने आजपर्यंत वेळोवेळी रहस्य निर्माण करत प्रेक्षकांना येणाऱ्या नवीन भागाची वाट पाहण्यास भाग पाडले आहे. या मालिकेचे कथानक अचानकच एका नव्या वळणावर येऊन थांबते आणि प्रेक्षकांची उत्सुकता ताणली जाते.

सातारा जिल्ह्यातल्या एका खऱ्या घटनेवर आधारीत ही मालिका आहे. त्यामुळे निर्माते, दिग्दर्शक आणि लेखकांनी ही कथामालिका कशी गुंफली आहे, याबद्दलही प्रेक्षकांमध्ये उत्सुकता लागून राहिलेली असते.

नव्या पात्राबरोबर या मालिकेत नवे ट्विस्ट येत राहतात आणि नवे खुलासे देखील होत राहतात. सध्या अशाच एका पात्राची एन्ट्री या मालिकेत झाली आहे. मात्र हे पात्र डॉ. अजितकुमार उर्फ देवीसिंगच्या कारस्थानांना बळी पडेल असं वाटत नाही.

चंदा नावाच्या बाईची एन्ट्री या मालिकेत झाली आहे. तिला पाहताक्षणीच देवीसिंगची शुद्ध हरपली होती. त्यामुळे ही चंदा नक्की कोण आहे आणि देवीसिंग तिला इतका का घाबरला, हे आधी एक कोडंच होतं. नुकताच झी मराठीने या मालिकेच्या पुढच्या भागाचा एक प्रोमो प्रसारीत केला. यामध्ये चंदा चक्क देवीसिंग ला तिच्या तालावर नाचवत असल्याचे दिसते आहे. हा भाग पाहताना प्रेक्षकांना नक्कीच मजा येणार आहे.

आधी चंदा देवीसिंगला तिचे पाय दाबायला सांगते. त्याने नकार देताच ती तिच्याकडे असलेले पुरावे पोलिसांना देण्याची धमकी देते. नुकताच पोलिसांच्या तावडीतून सुटलेला देवीसिंग नाईलाजाने तिचे पाय दाबायला लागतो. त्यानंतर कहर म्हणजे चंदा चक्क देवीसिंगला एका गाण्यावर डान्स करायला भाग पाडते. आता ही धडाकेबाज चंदा देवीसिंग ला अजून काय काय करायला लावणार आहे, हे येणाऱ्या भागांत कळेलच.

पैशांसाठी लोकांना फसवणारा आणि त्यानंतर त्यांचे खू;न करणाऱ्या देवीसिंगला त्याच्या तोडीस तोड कुणीतरी भेटले आहे, असेच चित्र आहे. लोकांच्या भावनांचा गैरफायदा घेत देवीसिंग त्यांना लुबाडतो. आता मात्र त्याची डाळ शिजेल असे वाटत नाही. चंदापासून स्वतःचा पिच्छा सोडवण्यासाठी आता देवीसिंग कोणती युक्ती करणार हे बघणे मनोरंजक असेल.

तसेच देवीसिंगच्या कृष्णकृत्यांना आळा बसणार का, आता तरी देवीसिंग ला शिक्षा होणार का या प्रश्नांची उत्तरे मिळवण्यासाठी पुढील भाग बघायला प्रेक्षक सरसावून बसले आहेत.

You might also like