एकदम झक्कास माहिती दररोज फक्त तुमच्यासाठी!

‘देवमाणूस’ मालिकेत येणार मोठा ट्विस्ट, इन्स्पेक्टर शिंदे आता दिव्या सिंगच्या जागी करणार केसचा तपास..

सध्या मराठी मालिकांमध्ये खूपच घडामोडी आपणास पाहायला मिळत आहेत. आजकाल अनेक नवनवीन मालिका चाहत्यांच्या भेटीला येत असतात. त्यामधील काही मालिका एका वेगळ्याच रंजक वळणावरती येऊन उभा आहेत.

झी मराठी वर सुरू असलेली ‘देवमाणूस’ ही मालिका त्यातल्या रहस्यांमुळे प्रेक्षकांना खुर्चीला खिळवून ठेवण्यात यशस्वी झाली आहे. या यशाचे श्रेय मालिकेचे कथानक आणि कलाकारांचे खुसखुशीत संवाद यांना जाते.

मालिका सध्या वेगळ्याच वळणावरती उभा असताना डॉ.अजितकुमार देव उर्फ ​​देवीसिंग विरुद्ध एसीपी दिव्या सिंगने बरेच प्रयत्न करून पुरावे गोळा केले होते. परंतु त्याचा काहीच उपयोग होईल आता वाटत नाही कारण देवीसिंगने आता फेरतपासणीस सुरवात केली आहे.

सरकारी वकील आर्या देशमुख आणि एसीपी दिव्या सिंगने पुरावे गोळा करून डॉ.अजितकुमारला शिक्षा करण्यास अनेक प्रयत्न केले आहेत. एसीपी दिव्या सिंगने डॉक्टरचा खरा चेहरा सरावांसमोर आणण्याचा खूप प्रयत्न केला असला तरी आता या मालिकेत आपणास दिव्या सिंग दिसणार नाही कारण या केसचा तपास आता इन्स्पेक्टर शिंदे यांना देण्यात येणार आहे.

मालिकेत डॉक्टर वेगवेगळे कट रचून सुटण्याचा शोधात आहे आणि यासाठी त्यास डिम्पल हि साथ देत आहे. आता दिव्या सिंगच्या एक्सिटमुळे मालिकांमध्ये खूप बदल होण्याची शकता आहे. महाराष्ट्र टाईम्सने दिलेल्या वृत्तानुसार मालिकेत दिव्या सिंगच्या जागी मालिकेत इन्स्पेक्टर शिंदे येणार आहे.

या मालिकेत दिव्या सिंगची भूमिका अभिनेत्री नेहा खान साकारत आहे तर,  सोनाली पाटील हि अॅड. आर्याची भूमिका करत आहे. अभिनेत्री नेहा खानने शि’कारी,बॅड गर्ल, का’ळे धंदे, हाफ ट्रुथ, गुरुकुल, बियॉन्ड बॉर्डर्स ह्यांसारख्या उत्कृष्ट चित्रपटात काम केलं आहे, परंतु देवमाणूस मध्ये साकारलेली भूमिकेमुळे ती घराघरात पोहचली तिला लोक यामुळे खूप ओळखू लागले.

नमस्कार वाचक मित्रांनो, आमचा हा लेख तुम्हला कसा वाटला आम्हला कंमेंट करून नक्की कळवा, तसेच आमचे फेसबुक पेज हि लाईक करायला विसरू नका. मनोरंजन क्षेत्रामधील असेच अधिक लेख आम्ही तुमच्यासाठी घेऊन येत असतो. लेख आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका कारण यामुळे आम्हाला आणखी लेख लिहायला प्रोत्साहन मिळते.

 

 

You might also like