एकदम झक्कास माहिती दररोज फक्त तुमच्यासाठी!

‘देवमाणूस’ फेम डिंपलचा ग्लॅ’मरस लूक! पहा अस्मिताचा अनोखा अंदाज…

झी मराठी वाहिनी वरील ‘देवमाणूस’ ही मालिका संपून आता जवळपास महिना होऊन गेला आहे. मात्र या मालिकेतील कलाकारांबद्दलची प्रेक्षकांची उत्सुकता तसूभरही कमी झाली नाहीये. मालिकेतील कलाकार सध्या काय करत आहेत, ते कोणत्या नव्या प्रोजेक्ट मध्ये दिसणार आहेत याबद्दल प्रेक्षकांना कुतूहल वाटत आहे.

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Asmeeta Deshmukh (@asmeetadeshmukh_7official)

या कलाकारांच्या सोशल मीडिया अकाऊंटला हे अपडेट्स मिळवण्यासाठी लोक फॉलो करत असतात. त्यांचे नवीन प्रोजेक्ट, नवीन लूक हे लगेचच व्हायरल होत जातात.

असाच लूक व्हायरल झाला आहे ‘देवमाणूस’ मधील डिंपलचा. केवळ दिसायला सिंपल असलेली ही डिंपल डोक्याने मात्र अजिबात सिंपल नव्हती. हिरॉईन व्हायचं तिचं स्वप्न होतं आणि ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी ती कोणत्याही थराला जाऊ शकत होती.

त्यासाठी तिने अगदी देवीसिंगला खू’न करण्यासाठी देखील मदत केली होती. अशी ही डिंपल मालिकेत अगदीच ‘गाव की छोरी’ लूक मध्ये दाखवली होती. मात्र अलीकडेच तिने केलेल्या फोटोशूटचे फोटो व्हायरल झाले आहेत.

insta: asmeeta deshmukh

‘देवमाणूस’ मालिकेत डिंपलची भूमिका अभिनेत्री अस्मिता देशमुखने साकारली होती. तिच्या नव्या फोटोशूट मध्ये ती अगदीच वेगळी दिसते आहे. मालिकेतील तिचा लूक सगळ्यांच्याच लक्षात आहे. मात्र तिचे हे नवीन फोटोशूट पाहिले असता ही तीच डिंपल आहे यावर विश्वासच बसणार नाही. या नव्या फोटोशूटमध्ये अस्मिता अगदीच ग्लॅ’मरस दिसत आहे. तिचे हे फोटो सोशल मीडिया वर खूपच व्हायरल होत आहेत.

insta: asmeeta deshmukh

तिने या फोटोशूटसाठी बेबी पिंक रंगाचा डिझायनर ड्रेस घातला आहे. यावर तिने अगदी मोजकीच ऍक्सेसरी घातली आहे. मोठे कानातले, घड्याळ आणि कंबरेला मधेच नाजूक फूल असलेला वेस्ट बेल्ट एवढीच ऍक्सेसरी तिने घातली आहे. मात्र तिच्या या ड्रेस वर ती खूप शोभून दिसत आहे. या सगळ्या लूक मध्ये तिच्या पायातील चंदेरी रंगाचे नाजूक चप्पल तिच्या लूकला चार चाँद लावत आहेत. आपल्या ड्रेसला मॅच होईल अशी पिंक कलरची लिपस्टिक आणि साजेसा मेकअप तिने केला आहे. या सगळ्याच गेटअप मुळे ती खूपच लोभस दिसत आहे.

insta: asmeeta deshmukh

अस्मिताच्या सगळ्या चाहत्यांना तिचा हा लूक खूपच आवडून गेला आहे. आता तिला नव्या प्रोजेक्ट मध्ये पाहण्यासाठी तिचे चाहते खूप उत्सुक आहेत. ‘देवमाणूस’ मालिकेचा शेवट पाहून प्रेक्षकांना या मालिकेचा दुसरा भाग येणार अशी खात्री वाटू लागली होती. मात्र अजून या मालिकेच्या दुसऱ्या भागाची घोषणा झालेली नाही.

insta: asmeeta deshmukh

You might also like