एकदम झक्कास माहिती दररोज फक्त तुमच्यासाठी!

‘दे धक्का’ चित्रपटामधील ‘शुक्राची चांदणी’ गाण्यामधील हि बालकलाकार आता झाली आहे इतकी मोठी! दिसते खूपच सुंदर आणि बोल्ड..

१६ मे २००८ ला ‘दे धक्का’ हा मराठी चित्रपट प्रदर्शित झाला. सायली नावाच्या मुलीला मुंबईमधील एका प्रतिष्ठीत नृत्य स्पर्धेत भाग घेण्याचे आमंत्रण मिळते. आधी तिच्या घरचे याला विरोध करतात पण मग सगळेच या प्रवासाला सुरुवात करतात.

या प्रवासाची कथा म्हणजेच ‘दे धक्का’. मकरंद अनासपुरे, शिवाजी साटम, सिद्धार्थ जाधव आणि मेधा मांजरेकर अशी तगडी स्टारकास्ट या चित्रपटात होती. सुदेश मांजरेकर आणि अतुल काळे यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे.

या चित्रपटाने बरीच प्रसिद्धी मिळवली. त्याबरोबरच प्रसिद्ध झाले त्यातले दोन बालकलाकारही. सक्षम कुलकर्णी आणि गौरी वैद्य या दोन बालकलाकारांनी या चित्रपटात काम केले आहे. या चित्रपटानंतर या दोघांनी अजून काही चित्रपटांमध्ये एकत्र काम केले आहे.

‘दे धक्का’ मध्ये सायलीची भूमिका गौरी वैद्य ने साकारली आहे. या चित्रपटानंतर ती बरीच चर्चेत आली. विशेषतः तिने ‘शुक्राची चांदणी’ या गाण्यावर केलेले नृत्य प्रेक्षकांना खूपच पसंत पडले.

‘दे धक्का’ नंतर गौरी वैद्यने २०१० मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘शिक्षणाच्या आईचा घो’ या चित्रपटातही भूमिका केली होती. यामध्ये तिचे पात्र हे भरत जाधव यांच्या मुलीचे होते. २०११ मध्ये तिने ‘एका पेक्षा एक जोडीचा मामला’ या रिऍलिटी शो मध्ये सक्षम बरोबर भाग घेतला होता.

२०१५ मध्ये तिने ‘आवाहन’ या चित्रपटात देखील काम केले होते. ‘आवाहन’ हा २००७ मध्ये आलेल्या चित्रपटाचा मराठी रिमेक आहे. यात तिने रूपा नावाच्या मुलीची भूमिका साकारली होती.

मोजक्याच चित्रपटांमध्ये काम केल्यानंतर मात्र गौरी चित्रपटसृष्टीतून गायब झाली. सध्या तिने शिक्षणावर लक्ष केंद्रीत केले असल्याने चित्रपटांकडे पूर्णपणे पाठ फिरवल्याचे दिसते. ‘दे धक्का’ मधली छोटी सायली आता बरीच मोठी झाली आहे.

ती आता खूपच वेगळी आणि खूपच सुंदर दिसते. गौरी आता २५ वर्षांची झाली आहे. मुंबईच्या डी. जी. रुपारेल महाविद्यालयातून शिक्षण घेतल्यानंतर कॉम्पुटर इंजिनियरिंग टेक्नॉलॉजी मधून पदवी शिक्षण पूर्ण केले.

गौरी चित्रपटसृष्टीतून गायब झाल्याने प्रेक्षक गौरीला खूपच मिस करत आहेत. आता गौरी परत चित्रपटांकडे परतणार की तिच्या शिक्षणातच पुढे करिअर करणार याबाबत प्रेक्षकांमध्ये संभ्रम आहे. तरीदेखील गौरीने परत चंदेरी पडद्यावर काम करावे अशी प्रेक्षकांची अपेक्षा आहे. आता बघू, गौरी नक्की कोणाचे ऐकणार.

You might also like