एकदम झक्कास माहिती दररोज फक्त तुमच्यासाठी!

‘सुंदरा मनामध्ये भरली’ या मालिकेतील दौलतची खऱ्या आयुष्यातील ‘कामिनी’ आहे ही…ती सुद्धा आहे अभिनेत्री?

दूरदर्शनवर आपल्याला सर्व भाषांमधील वाहिनी पाहायला मिळतात. या सर्व वाहिनीवर अनेक मालिका चित्रपट प्रदर्शित होत असतात. कलर्स मराठी या वाहिनी वरील ‘सुंदरा मनामध्ये भरली’ ही मालिका आपल्या सर्वांना माहीतच आहे, जी खूप कमी वेळात प्रसिद्ध झाली आहे. या मालिके बरोबरच या मालिकेतील कलाकारांनी सुद्धा प्रसिद्धी मिळवली आहे. या मालिकेत मुख्य भूमिका म्हणजे लतिका आणि अभिमन्यूची आहे. तर नकारात्मक भूमिका दौलतची आहे. ही भूमिका साकारणारा हा कलाकार नक्की कोण आहे बरं…

अभिनेता ‘ऋषिकेश शेलार’ यांनी ही भूमिका साकारली आहे. या भूमिकेमुळे ऋषिकेश यांना प्रसिद्धी मिळाली आहे. तसेच एक नवीन अशी ओळख या भूमिकेने त्यांना दिली आहे. दौलतचा रागडा अंदाज, जबरदस्त असा लूक आणि हटके सवांद अशी ही भूमिका ऋषिकेश यांनी खूप चांगल्या प्रकारे साकारली आहे. तर आपण जाणून घेऊया या दौलतविषयी म्हणजेच ऋषिकेश शेलार यांच्याविषयी.

 

View this post on Instagram

 

A post shared by Hrishikesh. (@hrishishelar)

सुंदरा मनामध्ये भरली या मालिकेत ऋषिकेश यांना नकारात्मक भूमिका साकारण्याची ऑफर आली तेव्हा त्यांनी लगेच होकार दिला. त्यांनी ही संधी लगेच कॅश केली होती. त्यांची भरून अशी इच्छा होती नकारात्मक भूमिका साकारण्याची. म्हणूनच त्यांनी ही संधी मिळाल्यानंतर ती स्वीकारली. मात्र त्यांनी ही भूमिका चांगल्यारितीने साकारून रसिकांचे मन जिंकले आहे. आता या मालिकेत त्यांची गर्लफ्रेंड कामिनी आहे. परंतु त्यांच्या खऱ्या आयुष्यातील कामिनी कोण आहे माहीत आहे का? तर चला पाहूया..

ऋषिकेश हे मूळ सांगली येथील आहे. सांगली मध्येच त्यांचा जन्म झाला आणि त्यांनी त्यांचे शिक्षण सुद्धा येथूनच पूर्ण केले. त्यांच्या पत्नीचे नाव ‘स्नेहा अशोक मंगल’ असे आहे. त्यांची पत्नी स्नेहा सुद्धा एक अभिनेत्री आहे. अनेक नाटकामध्ये सुद्धा तिने काम केले आहे. ‘एक महानायक डॉ बाबासाहेब आंबेडकर’ या मालिकेत अभिनेत्री स्नेहा अशोक मंगल ही जिजाबाईंची भूमिका करत आहे.

‘लक्ष्मी सदैव मंगलम’ या मालिकेतून ऋषिकेश यांच्या करियरला सुरुवात झाली. त्यानंतर त्यांनी स्वराज्य जननी जिजामाता या मालिकेत काम केले. ‘शांतेच कार्ट चालू आहे’ या नाटकात सुद्धा त्यांनी काम केलं. डॉ. तात्या लहाणे, जिंदगी विराट, पॅरिस या चित्रपटातून ऋषिकेश मोठ्या पडद्यावर झळकले आहेत.

नेमकं कथानक काय या मालिकेचं…
जाड परंतु गोड मुलीची जबरदस्त कथा सुंदरा मनामध्ये भरली या मालिकेत दाखवण्यात आली आहे. खेळकर स्वभाव, शाळेपासून अभ्यासात हुशार, उत्तम स्वयंपाक करणारी अशी एक मुलगी म्हणजे लतिका. परंतु जाड असल्याने लहानपापासूनच टोमणे ऐकावे लागले आहेत. यामुळेच तिचे लग्न सुद्धा जमत नव्हते. ३४ स्थळानी तिला नकार दिला होता. पण तिने या गोष्टीचा स्वीकार केला आहे म्हणूनच तिला काही फरक पडत नाही.

याउलट अभिमन्यू जो दिसायला स्मार्ट, अंगाने मजबूत, हुशार आणि सर्वांना मदत करणारा आहे. अभिमन्यू स्वतः तर फिट आहेच तसेच त्याला पूर्ण गावाला फिट ठेवण्यासाठी स्वतःची व्यायामशाळा उघडायची आहे. त्याच्या या प्रवासात योगायोगाने लतिका आणि अभिमन्यू यांचे लग्न जमते. तर अभिनेत्री ‘अक्षया नाईक’ हिने लतिकाची आणि अभिमन्यूची भूमिका अभिनेता ‘समीर परांजपे’ याने साकारली आहे.

ऋषिकेश आणि स्नेहा यांना त्यांच्या भावी जीवनासाठी आणि पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा! तर मित्रहो आजचा हा लेख तुम्हाला कसा वाटला. अश्याच मनोरंजनात्मक लेखासाठी लाईक करत रहा. हा लेख कसा वाटला हे तुम्हाला कमेंट द्वारे सांगण्यास सोपे जाईल म्हणून कमेंट करत रहा. हा लेख आवडल्यास लाईक करा आणि आपल्या मित्रमैत्रिणींना सुद्धा शेअर करत रहा.

You might also like