एकदम झक्कास माहिती दररोज फक्त तुमच्यासाठी!

बाई वाड्यावर या डायलॉगने एक दशक गाजवणारे अभिनेते निळू फुले यांची मुलगी आहे ‘ही’ सुप्रसिद्ध अभिनेत्री नाव ऐकून थक्क व्हाल..

तब्बल चाळीस वर्ष आपल्या अभिनयाने जनामनावर वर्चस्व गाजवणारे मराठी चित्रपटसृष्टीतले खलनायक अर्थात निळू फुले यांना कुणीच विसरू शकणार नाही. त्यांचा “बाई वाड्यावर या” हा डायलॉग आजही सुप्रसिद्ध आहे. त्यांनी अनेक मराठी चित्रपटांत खलनायकाची भूमिका साकारून चाहत्यांना खूश केलं आहे.

चित्रपट असो वा नाटक, निळू फुले यांनी त्यांच्या पात्रात अक्षरशः जीव ओतला. आज आपण त्यांच्या मुलीबद्दल जाणून घेणार आहोत. त्यांची मुलगी गार्गी फुले हीसुद्धा प्रसिद्ध अभिनेत्री आहे. पण तिच्या या यशामागचे रहस्य म्हणजेच तिचे वडील अर्थातच निळू फुले यांनी तिला दिलेला कानमंत्र होय.

निळू फुले यांच्या कन्येचं नाव गार्गी फुले असे आहे. “राजा राणीची गं जोडी” या मालिकेत त्या सध्या बेबी मावशीची भूमिका करताना दिसून येत आहेत. “तुला पाहते रे” या मालिकेत त्यांनी इशाच्या आईची भूमिका केली होती. त्या त्यांच्या अभिनयात अत्यंत जीव ओतताना दिसतात.

त्यांचा हळवेपणा, लाघवी आवाज आणि विनोदाचा टायमिंग अत्यंत सुंदर आहे. गार्गी यांचा २००७ साली ओंकार थत्ते याच्यासोबत विवाह झाला आहे. त्यांना एक मुलगासुद्धा आहे आणि त्याचे नाव अनय असे आहे.

गार्गी फुले या चित्रपटांमधेही छोट्या मोठ्या भूमिका निभावताना दिसून आल्या. एका चित्रपटाच्या शूटींगमुळे त्यांनी तुला पाहते रे मालिकेत काम करण्यास नकार दिला होता पण दिग्दर्शकाने चक्क शूटींग संपेपर्यंत त्यांची वाट बघितली. शेवटी गार्गी यांनाच इशाच्या आईचे पात्र देण्यात आले. गार्गी यांच्या या सुरेख अभिनयामागचे रहस्य अर्थातच निळू फुले यांचा कानमंत्र आहे. ते तिचे वडील तर होतेच गुरूसुद्धा होते.

निळू फुले यांनी गार्गीला सांगितले आहे की, तू जेंव्हा अभिनय करत असशील तेंव्हा स्वतःला अमिताभ बच्चन समज. तुझ्या पात्राला तू योग्य न्याय दे. समोरचा नट कितीही मोठा असला तरी आपला ठसा तू उमटव. या गुरूमंत्रामुळेच गार्गीचा आत्मविश्वास वाढला. त्यानंतरचा त्यांचा प्रवास आपल्याला माहितीच आहे. गार्गीने परवाच इन्स्टाग्रामवर पोस्ट टाकून सगळ्यांना आनंदी राहण्याचा सल्ला दिला आहे.

“एक गाव बारा भानगडी” या चित्रपटातून निळू फुले यांनी चित्रपटसृष्टीत आगमन केले होते. २००९ साली त्यांनी वयाच्या ७९ व्या वर्षी शेवटचा श्वास घेतला आणि दुनियेच्या रंगमंचालाही अलविदा केला.

त्यांचा देदीप्यमान प्रवास आणि सल्ला येणाऱ्या पिढ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे. जशी गार्गी त्यांच्या विचारांवर चालत आहे तसेच इतर होतकरू अभिनेत्यांनीही चालावं किंवा त्या दिशेने विचार करावा म्हणून हा लेख जास्तीत जास्त शेअर करा.

You might also like