एकदम झक्कास माहिती दररोज फक्त तुमच्यासाठी!

कधी उपाशी पोटी झोपायचे दोघे बहीण-भाऊ, आज सोशल मीडियामुळे झाले मालामाल..महिन्याला कमावताय लाखो रुपये!

गरिबी माणसाला अनेक गोष्टी करायला भाग पाडते. कधी कधी तरुण मुलं आपल्या गरीब परिस्थितीमुळे वाईट मार्गाकडे वळतात. प्रयत्न करूनही जेव्हा गरिबी हटत नाही, तेव्हा तरुणांकडून अशी पावले उचलली जाऊ शकतात. काही मुले मात्र परिस्थितीला शरण जाण्यापेक्षा वेगळं काहीतरी करतात आणि आपलं नशीब बदलून टाकतात. जिद्द असेल तर कठीणातली कठीण परिस्थितीही बदलता येते. लोक तुम्हाला नावे ठेवतील, पण जर तुमच्यात स्वतःचे नशीब बदलायची इच्छाशक्ती असेल, तर तुम्ही काहीही करू शकता. हेच दाखवून दिले आहे भावा-बहिणीच्या एका जोडीने.

झारखंड मधील धनबाद या ग्रामीण भागातील हे भाऊ-बहीण. सनातन आणि सावित्री अशी यांची नावं. घरची परिस्थिती अत्यंत हलाखीची. सनातनने आपले पदवी शिक्षण पूर्ण केले. मात्र कोठेच नोकरी न मिळाल्याने बेरोजगारीची वेळ आली. वडिलांसोबत राहता यावं म्हणून त्याने वडिलांना शेतीत हातभार लावायला सुरुवात केली. पण त्यांना स्वतःची कला सापडली आणि त्यातून त्यांना नवा मार्ग दिसला.

Third party image reference

दोघांनी आपली डान्सची कला जगासमोर सादर करायची ठरवली. आपल्या डान्सचे, रोजच्या दिनक्रमाचे व्हिडिओ हे दोघे युट्यूब वर टाकू लागले. सुरुवातीला आजूबाजूचे लोक खिल्ली उडवत, त्यांची चेष्टा करत. पण दोघांनीही त्या गोष्टींकडे दुर्लक्ष केले आणि आपले काम सुरू ठेवले. काही दिवसांनी त्यांना प्रसिद्धी मिळायला सुरुवात झाली. त्यांचे व्हिडिओ लोकांना आवडू लागले. काही प्रसार माध्यमांनीही त्यांची दखल घेत त्यांना लोकांसमोर आणायचे काम केले.

मेहनत करून, स्वतःची कला स्वतःच्या हुशारीने वाढवून हे दोघे आपले व्हिडिओ सोशल मीडिया वर टाकत होते. लोक या दोघांच्या मेहनतीने, त्यांच्या कलेने प्रभावित झाले आणि आज बघता बघता त्यांच्या सबस्क्रायबर्सची संख्या लाखाच्या वर पोचली आहे. ‘डान्सर सनातन’ नावाचे त्यांचे युट्यूब चॅनल आहे. अलीकडेच त्यांच्या ‘५२ गज का दामन’ या गाण्यावर त्यांनी केलेल्या डान्सने दोघे अजूनच चर्चेत आले.

Third party image reference

कधीकाळी एक वेळच्या जेवणाचीही भ्रांत असायची. मात्र आज दोघे सोशल मीडिया च्या माध्यमातून लाखो रुपये कमवत आहेत. त्यांच्या कुटुंबावर कर्जाचा बोजा होता. मात्र आज त्यांच्याकडे पैसे आणि प्रसिद्धी दोन्ही आहे. याच कमाईतून ही बहीण-भावाची जोडी त्यांच्या ७ जणांच्या कुटुंबाचे पोट भरत आहेत. सुरुवातीला मोबाईलवरून व्हिडिओ शूट करणाऱ्या सनातनकडे आज स्वतःचा कॅमेरा आणि एडिटिंग सेटअप आहे.

You might also like