एकदम झक्कास माहिती दररोज फक्त तुमच्यासाठी!

वयाच्या १४ व्या वर्षी विकत होता दही कचोरी, मदत मागितली! सोशल मीडियावर व्हायरल झाला व्हिडिओ..

सोशल मीडियाने आजपर्यंत खूप साऱ्या लोकांचे आयुष्य बदलले तर काहींना सोशल मीडियामुळे गजाआड व्हावे लागले. पण ही सोशल मीडिया गरीब मुलांना खूप सहायता करताना हल्लीच दिसली आहे त्यामुळे पुन्हा सोशल मीडियामध्ये खूप ताकद आहे असे स्पष्ट झाले आहे.

जर लोक सोशल मीडियावर माध्यमातून वाढत्या प्रमाणात व्हायरल होत असतील तर कलाकारांच्या पोटावर पाय येतच राहणार. हे सर्व असूनही, सोशल मीडियाचा आणखी एक फायदा आहे, तो म्हणजे सोशल मीडियाच्या माध्यमातून अनेक गरजू लोकांना मदतही केली जाते. अलीकडेच बाबांच्या ढाब्याचे नाव तुम्ही ऐकले असेल, ज्याला सोशल मीडियाच्या माध्यमातून चांगलीच लोकप्रियता आणि मदत दोन्ही मिळाली.

असाच एक प्रकार अहमदाबादमध्येही घडला तेव्हा अहमदाबादच्या लोकांनी दाखवले की त्यांचे हृदय किती मोठे आहे. सोशल मीडिया आता सामान्य माणसाच्या जीवनाचा अविभाज्य भाग बनला आहे. राजकारणी असोत किंवा अभिनेते, सर्वजण सोशल मीडियाच्या माध्यमातून सामान्य जनतेशी जोडलेले असतात. सोशल मीडिया लोकांचे मनोरंजन करते याचबरोबर गरजूंना देखील मदत देखील करते. अहमदाबादमध्ये याचे एक मोठे उदाहरण दिसले आहे जेव्हा तेथील लोकांनी १४ वर्षांच्या मुलाला मदत केली.

सध्या एक व्हिडिओ व्हायरल होत आहे एका ट्विटरयूजर @arjunB9591 ने लिहिले, “जर कोणी अहमदाबादचा असेल तर कृपया जा आणि या मुलाला मदत करा. व्हिडिओमध्ये, १४ वर्षांचा मुलगा प्लेट उचलताना आणि कचोरी तयार करून ग्राहकांना देत असल्याचे तुम्हाला दिसत असेल. आजूबाजूला उभे असलेले लोक त्याच्या कचोरीचा आस्वाद घेत आहेत.

कचौरी विकणाऱ्या मुलाचा व्हिडिओ व्हायरल होताच लोकांची प्रचंड गर्दी जमली आणि लोकांनी त्याच्याकडून कचौरी खरेदी करायला सुरुवात केली. ट्विटर युजर @1992_vishesh ने एक व्हिडिओ शेअर केला आहे ज्यात त्या मुलाजवळ प्रचंड गर्दी दिसत आहे आणि तो १४ वर्षाचा मुलगा कचौरी बनवता असताना दिसत आहे.

यूजरने काही काळापूर्वी असे लिहिले होते की कृपया मदत करा, हा मुलगा फक्त दहा रुपयात दही कचौरी खायला देतो. स्थान मणिनगर स्टेशन अहमदाबाद हा याचा पत्ता आहे. या निरागसचा हेतू त्याच्या कुटुंबाला मदत करणे आहे, अशा मुलांचा अभिमान आहे वाटतो त्यामुळे त्याला मदत करा.

You might also like