एकदम झक्कास माहिती दररोज फक्त तुमच्यासाठी!

सगळ्यांचा लाडका दादूस विनायक माळी आता झळकणार चित्रपटात! सोबत असणार हि प्रसिद्ध अभिनेत्री..

सोशल मीडिया ने अनेकांना स्टार बनवले आहे. तशी कला या कलाकारांमध्ये असते म्हणूनच ते सोशल मीडिया द्वारे लोकप्रिय होतात. असाच एक कलाकार सध्या सोशल मीडिया वर धुडगूस घालत आहे. ‘दादूस’ या टोपणनावाने प्रसिद्ध असलेला हा कलाकार आहे विनायक माळी. आपल्या अतरंगी विनोदाने या कलाकाराने सोशल मीडिया वर धमाल उडवून दिली आहे. त्याचे आगरी भाषेतले व्हिडिओ सध्या खूपच व्हायरल होत आहेत.

आता अशीच धमाल करायला विनायक मोठ्या पडद्यावर येतोय. विनायक एका मराठी चित्रपटात झळकणार आहे. त्याच्याबरोबर रितिका श्रोत्री ही अभिनेत्री असणार आहे. या फ्रेश जोडीचा हा सिनेमा आहे ‘मॅड’. बेधडक विनायक आणि चुलबुली रितिका अशा या अनोख्या जोडीचा मॅडनेस प्रेक्षकांना या नव्या चित्रपटाद्वारे अनुभवता येणार आहे. हा चित्रपट तरुणाईवर केंद्रीत आहे. तरुण असणं म्हणजेच मॅडनेस करणं हे तर अगदी समीकरणच बनून गेलं आहे. अशा या तरुणाईकडून नक्की कोणता मॅडनेस घडणार आहे, हे तर चित्रपट प्रदर्शित झाल्यावरच कळेल.

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Vinayak Mali (@iam_vinayakmali)

नुकतंच या चित्रपटाचं मोशन पोस्टर लाँच करण्यात आलं. या पोस्टर मधून या चित्रपटाच्या मॅडनेसची कल्पना येत आहे. कधी कधी हा मॅडनेस प्रचंड धमाल आणतो, तर कधी कधी गोत्यातही आणतो. ‘मॅड’ चित्रपटातील मॅडनेस नक्की धमाल करणार की पात्रांना गोत्यात आणणार, हे चित्रपट पाहूनच कळेल. हा चित्रपट २०२२ मध्ये प्रदर्शित होणार आहे. तरुणाईचा बेफामपणा, जल्लोष, अतरंगीपणा आणि मॅडनेस या चित्रपटातून अनुभवता येईल. या चित्रपटाचे लेखन समीर आशा पाटील यांनी केले असून दिग्दर्शनाची जबाबदारी निखिल वि. खजिनदार यांनी सांभाळली आहे.

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Ritika Shrotri (@shrotriritikaofficial)

विनायक माळी आपल्या विनोदी व्हिडिओ मधून प्रेक्षकांचे मनोरंजन करत असतो. आता या चित्रपटात त्याचा एक वेगळाच अंदाज आपल्याला पाहायला मिळणार आहे. रितिकाने ‘गुंतता हृदय हे’ या मालिकेतून बालकलाकार म्हणून मनोरंजन सृष्टीत पदार्पण केले होते.

सध्या युथफूल चित्रपटांतील रितिका श्रोत्री हे एक आघाडीचे नाव आहे. तिने अनेक मराठी मालिका आणि चित्रपटांमध्ये काम केलं आहे. विनायक आणि रितिकाची ही हटके जोडी मोठ्या पडद्यावर रोमान्स करताना दिसणार आहे. फ्रेश जोडी बघायला मिळणार म्हणून प्रेक्षकही या चित्रपटाच्या प्रतीक्षेत आहेत. चित्रपट प्रदर्शित झाल्यावर ही जोडी नक्की काय काय धमाल करते हे आपल्याला कळेलच.

You might also like