एकदम झक्कास माहिती दररोज फक्त तुमच्यासाठी!

महाराष्ट्राचे सुपरस्टार दादा कोंडके यांच्या घराची दयनीय अवस्था! सोशल मीडिया वर फोटो होतोय व्हायरल..

ज्यांनी महाराष्ट्राला हसवलं त्यांच्या घराचं त्यांच्या मृ’त्युपश्चात हसं व्हावं हा नियतीचा कोणता क्रूर योगायोग आहे? दादा कोंडके. केवळ नाव घेतलं तरी लोकांना त्यांचे विनोदी चित्रपट आठवतात आणि आजही लोक ते आठवून पोट धरून हसतात. इतक्या वर्षांनंतरही दादा कोंडकेंची जादू मराठी मनावर कायम आहे.

दादा कोंडके नावाच्या या अवलियाने आपल्या अतरंगी विनोदांनी उभा महाराष्ट्र हसवत ठेवला. प्रत्येक मराठी माणसाच्या आठवणीत दादा कोंडके जिवंत आहेत. मात्र त्यांच्या घराची मात्र कोणालाच आठवण राहिलेली दिसत नाही.

नुकताच अभिनेता प्रथमेश परब याने त्याच्या सोशल मीडिया अकाऊंट वर एक फोटो शेअर केला, ज्यामुळे दादा कोंडकेंच्या आठवणींना पुन्हा उजाळा मिळाला आहे. हा फोटो सोशल मीडिया वर प्रचंड व्हायरल होत आहे.

मात्र या फोटोमागचे विदारक सत्य पाहून अनेकांनी हळहळ व्यक्त केली आहे. या फोटो मध्ये प्रथमेश दादा कोंडके यांच्या घरासमोर हात जोडून उभा आहे. फोटो नीट पाहिला असता लक्षात येईल, की या घराची बरीच पडझड झाली आहे.

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Prathamesh Parab (@prathameshparab)

आपल्या या फोटो च्या कॅप्शन मध्ये प्रथमेश म्हणतो, “विस्तीर्ण निळ्या नभाखाली दिसत असलेलं, मोडकळीस आलेलं घरं दुसरं तिसरं कोणाचं नसून, आपल्या महाराष्ट्राचे लाडके सुपरस्टार, दादा कोंडके यांचं आहे. हे दादांचं रहातं घरं! हा फोटो झूम करून पाहिल्यास तुमच्या लक्षात येईल की या घराची किती दयनीय अवस्था झाली आहे ते!

आयुष्यभर इतरांना हसवणारे दादा, आपल्याच घराला अशा अवस्थेत पाहून हसत असतील?? ज्या व्यक्तीने, हाऊसफुल च्या बोर्ड्स ने चित्रपटगृहाची शोभा वाढविली, आपल्या अभिनयाने, प्रेक्षकांच्या मनात हक्काचं घर निर्माण केलं, खरंच, आज त्याच व्यक्तीच्या घराचं संवर्धन करणं, इतकं अवघड आहे का????? प्रश्न अनेक आहेत!! काही सुन्न करणारे तर काही अनुत्तरित….!!”

दादा कोंडकेंच्या संपत्तीबाबत वारसा हक्कावरून वाद सुरू आहेत. आपली संपत्ती गरजू कलावंतांच्या उपयोगी पडावी, म्हणून दादांच्या इच्छेनुसार ‘दादा कोंडके प्रतिष्ठान’ ची निर्मिती झाली. त्यांच्या मृ’त्युपत्रात सांगितल्याप्रमाणे उषा चव्हाण, डॉ अनिल वाकणकर, साबीर शेख, गजानन शिर्के आणि वसंत भालेकर यांना विश्वस्थ म्हणून नेमण्यात आले. मात्र या संस्थेच्या पाच विश्वस्थांपैकी चार जण नि’धन पावले असल्याने आता अनेक जण गैरमार्गाने या संपत्तीवर ताबा मिळवण्यासाठी धडपडत आहेत. या मृ’त्युपत्राला कोर्टात आव्हान दिल्याने दादांच्या घराच्या संवर्धनाकडे कोणाचेच लक्ष नसल्याचे दिसते.

You might also like