एकदम झक्कास माहिती दररोज फक्त तुमच्यासाठी!

औरंगजेबाचे सध्याचे वंशज करतात ‘हे’ काम! लोकांनी केले असे हाल…

आलमगीर बादशहा म्हणून ओळखला जाणारा मुघल सत्ताधीश होता औरंगजेब. भारतावर राज्य करणाऱ्या मुघलांपैकी तो सर्वांत शेवटचा शक्तिशाली मुघल होता. त्याच्या वंशजांनी त्याच्यानंतर भारतावर सत्ता गाजवली, पण त्यांना औरंगजेबासारखी ती वाढवता आली नाही. औरंगजेब जरी महत्वाकांक्षी असला तरी तो तितकाच भित्रा देखील होता. तो स्वतः कधीच युद्ध लढायला जात नसे.

मात्र त्याच्या खेळी या खूप विचारपूर्वक रचलेल्या असायच्या. राजकारणात भल्याभल्यांना धूळ चारणारा हा बादशहा तितकाच क्रू’र होता. गादी मिळवण्यासाठी त्याने आपल्या बापाला कैद करून ठेवलं होतं, तर भावाची चक्क ह’त्या केली होती.

औरंजेबानंतर भारतातली मुघल सत्ता संपुष्टात आली. त्यानंतर औरंगजेबाचे वंशज कुठे गेले असा प्रश्न काहींना पडला असेल. भारतावर राज्य करणारा बहादूर शाह जफर हा शेवटचा मुघल बादशहा होता. १८५७ च्या उठावानंतर इंग्रजांनी त्याची रवानगी सध्या ब्रह्मदेश मध्ये असलेल्या रंगून या ठिकाणी केली होती.

बहादूर शाह जफर एक कवी होता आणि त्याच्या शायरी कुलिया-ए-जफर नावाने प्रसिद्ध आहेत. त्याची इच्छा होती की त्याचा मृत्यू हिंदुस्थानात व्हावा आणि तिथेच आपली कबर असावी. मात्र त्याची ही इच्छा अपूर्ण राहिली जेव्हा त्याचा मृ’त्यू रंगूनमध्येच झाला.

मुघलांची सत्ता नष्ट झाल्यावर बहादूर शाह जफर चे कुटुंब म्हणजे मुले आणि नातवंडे वेगवेगळ्या देशात स्थलांतरीत झाली. कुणी अमेरिकेत, तर कुणी बांगलादेश मध्ये स्थायिक झाले. त्याचा एक नातू भारताच्या कलकत्ता शहरात स्थलांतरीत झाला. बहादूर शाह जफर च्या पणतूची बातमी २०१३ मध्ये वर्तमानपत्रांमध्ये छापून आली. पण त्यावेळी त्याचे नि’ध’न झाले होते. मात्र त्यावेळी लोकांना समजले की ते मुघलांचे वंशज आहेत.

या पणतूला सुलताना बेगम नावाची बायको होती. तिला ४ मुली आणि एक मुलगा आहे. हे सगळे कलकत्त्याचा थोडा बाहेरचा भाग शांती वसाहतीतल्या झोपडपट्टीत रहात होते, तेव्हा तिच्या नवऱ्याने तिला सांगितले, की काहीही झाले तरी भीक मागू नको, कारण आपण कधीतरी उत्तर भारतावर राज्य करणाऱ्या मुघलांचे वंशज आहोत.

मात्र हीच गोष्ट लोकांच्या रोषाला कारणीभूत ठरली आहे. सर्वजण त्यांना वाळीत टाकल्यासारखे वागतात. सध्या ते दोन खोल्या आणि कॉमन किचन असलेल्या झोपडपट्टीत राहतात. त्यामुळे रस्त्यावर भांडी घासावी लागतात. त्यांना समाजात कुणी मान देत नाही. याचे त्यांना दुःख वाटते. त्यांच्या पूर्वजांनी जे केले आहे, त्याची शिक्षा त्यांना भोगावी लागत आहे.

You might also like