एकदम झक्कास माहिती दररोज फक्त तुमच्यासाठी!

‘येऊ कशी तशी मी नांदायला’ मधील चिन्याच्या वडिलांबद्दल ‘ही’ गोष्ट तुम्हाला माहीत आहे का?

झी मराठी वाहिनी वरील ‘येऊ कशी तशी मी नांदायला’ मालिका संपली असली तरी मालिकेतल्या व्यक्तिरेखांना प्रेक्षक अजून विसरले नाहीयेत. यातल्या कलाकारांबद्दल जाणून घेण्यात प्रेक्षकांना फार रस आहे. मालिकेच्या शेवटाने प्रेक्षकांचा काहीसा हिरमोड झालेला असला तरी हेही तितकेच खरे आहे की या मालिकेतील सगळ्या पात्रांवर प्रेक्षकांनी भरभरून प्रेम केले आहे.

ओम, स्वीटू, शकू, मालविका, मोहित, नलू, दादा या व्यक्तिरेखा प्रेक्षकांना भावल्या आहेत. यातलेच प्रेक्षकांच्या आवडीचे एक पात्र म्हणजे चिन्या. ओम आणि स्वीटूला नेहमी मदत करणारा हा चिन्या प्रेक्षकांना अल्पावधीतच आपलासा वाटू लागला.

‘येऊ कशी तशी मी नांदायला’ मालिकेत अभिनेता अर्णव राजे याने चिन्याची व्यक्तिरेखा साकारली होती. तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल, पण अभिनेता म्हणून अर्णवची ‘येऊ कशी तशी मी नांदायला’ ही पहिलीच मालिका आहे. लहानपणापासून अभिनयाची आवड जोपासणाऱ्या अर्णवचा नेहमीच एक आदर्श राहिला आहे. तो म्हणजे त्याचे बाबा. अर्णवचे बाबा देखील अभिनय क्षेत्रात आहेत. त्यांचे नाव जयेश राजे आहे.

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Arnav (@arnnaaavvvv)

जयेश राजे त्यांच्या शॉर्ट फिल्म्स मधील भूमिकांसाठी प्रसिद्ध आहेत. त्यांनी आजपर्यंत अनेक लघुपटांमध्ये काम केले आहे. ‘रेस्ट इन पीस’ या सिरीज मध्ये देखील ते झळकले आहेत. अर्णवसाठी त्याचे बाबा हे त्याचे अभिनयातील पहिले गुरू आहेत. त्यांना बघत बघतच अर्णव लहानाचा मोठा झाला आहे. त्याच्या बाबांचे या क्षेत्रातले मार्गदर्शन आजही त्याच्यासाठी फार मोलाचे आहे.

अर्णवने आपल्या बाबांचा आदर्श डोळ्यांसमोर ठेवत लहानपणी नाट्य अभिनय कार्यशाळेत भाग घेतला होता. त्यातून त्याने अभिनयातील बारकावे शिकण्यास सुरुवात केली. “अभिनयातील माझे पहिले गुरू माझे वडीलच आहेत. त्यांनी दिलेलं प्रोत्साहन माझ्यासाठी खूप मोलाचं आहे,” असं अर्णव सांगतो. त्याचे वडील त्याला नेहमीच या गोष्टीसाठी प्रोत्साहन देत आले आहेत.

अर्णवने देवेंद्र पेम यांच्या कार्यशाळेत भाग घेत अभिनयाचे धडे गिरवायला सुरुवात केली. रुपारेल कॉलेज मध्ये त्याने विविध नाट्यस्पर्धांमध्ये भाग घेतला. ‘भाग धन्नो भाग’ या एककांकिकेतील त्याच्या भूमिकेने त्याला छोट्या पडद्यावर झळकण्याची संधी मिळाली. ‘येऊ कशी तशी मी नांदायला’ मालिकेच्या क्रिएटिव्ह प्रोड्युसर सुवर्णा राणे यांनी हा हिरा हेरला आणि मालिकेत अर्णवला चिन्याची भूमिका मिळाली. अर्णवने या संधीचं सोनं केलं. अर्णवने आपल्या अभिनयाच्या जोरावर चिन्या ही व्यक्तिरेखा घराघरांत पोचवली.

You might also like