एकदम झक्कास माहिती दररोज फक्त तुमच्यासाठी!

५० लाखांची BMW खरेदी करण्यासाठी त्याने चक्क ट्रकमधून आणली ८०० किलोची चिल्लर, त्यानंतर झाले असे काही की ऐकून थक्क व्हाल..

पैसा म्हटलं की आपल्याला आठवतो तो नोटांचा बंडल. पण कोणी जवळ चिल्लर बाळगून श्रीमंत होऊ शकेल का? यावर कुणालाही हसायला येणं साहजिक आहे. पण अशी एक घटना घडली आहे. सर्वसाधारणपणे चिल्लर ला दुकानदार, ग्राहक, व्यापारी, कामगार असे एक ना अनेकजण त्रस्त आहेत. अहो इतकच काय चक्क देवालाही या चिल्लरचा कंटाळा यायला लागलाय.

मंदिरात दानपेटी समोर सरळ सरळ बोर्ड लावलेला असतो की, “कृपया चिल्लर टाकू नका ” काही ठिकाणी तर एखाद्या खरेदीनंतर परत द्यायला चिल्लर नसतील तर त्या बदल्यात वस्तू देतात. असं काहीसं चित्र चिल्लर बाबतीत आपल्याला दिसून येतं.

चिल्लर ने कोण श्रीमंत होईल यावर कुणाचा विश्वासच बसणार नाही. वस्तू विकल्यानंतर ग्राहकांच्या बाजूने बरीच नाणी येत असल्याचे पाहून दुकानदारही चिडचिडे होते. थोडीशी नाणी ठेवली जाते, परंतु जेव्हा दुकानदाराला केवळ नाण्यांसह लाखो रुपये दिले गेले तर काय होईल याची कल्पना करा. पण असं एके ठिकाणी घडलंय.

टोंगरेन इथे राहणाऱ्या व्यक्तीने चक्क ८०० किलो चिल्लर घेऊन BMW च्या खरेदीसाठी आला होता. ही सगळी नानी त्याने ट्रकमधून भरून आणली होती. इतकी सारी चिल्लर बघून शोरूमचे मॅनेजर चक्रावले. पण त्या मातसाने शोरूमच्या मॅनेजरला सांगितले की आपल्याला गाडी खरेदी करायची आहे.

सहसा एखाद्या व्यक्तिला गाडी घ्यायची असते तेव्हा तो शोरूम मध्ये जातो पण तिथला मॅनेजर त्या ग्राहकाची स्वागत करतो. पण इथे मात्र या माणसाने आणलेली इतकी सारी चिल्लर पाहून त्याला रागावले. नंतर प्रत्यक्षात जेव्हा तो नाणी भरलेला ट्रक त्या मॅनेजरने पाहिला तेव्हा तर तो आधिकच संतापला.

शिवाय त्या ग्राहकाला असेही सांगितले की, इतकी सारी नाणी मी कशी मोजू? महत्त्वाचे म्हणजे मी हे सगळे चिल्लर कुठे जमा करू? कोणती बॅंक इतकी सारी चिल्लर घेईल? असे एक ना अनैक प्रश्न त्या शोरूमच्या मॅनेजर समोर उभे राहिले.

मॅनेजरचे इतके सारे बोलणे ऐकून ज्याने चिल्लर आणली होती, तो ग्राहक फारच दुःखी झाला. नंतर त्याने आपल्या मनातली गोष्ट त्या मॅनेजरला सांगितली, तो म्हणाला की, “मी बर्‍याच वर्षांपासून ही कार खरेदी करण्याचे स्वप्न पाहत आहे. यासाठी दिवसरात्र मेहनत केली, पाई जोडली आणि मग मी एवढी मोठी रक्कम जमा करू शकलो.”

इतक्या कळवळीने हे सारं त्यानं सांगितल्यावर मॅनेजरचे ह्रदय वितळले आणि त्याला गाडी विकण्याचे ठरवले. आणि इतक्या वर्षीचे गाडी घेण्याचे त्या व्यक्तीचे स्वप्न साकार झाले.

नंतर त्या मॅनेजरने शोरूममध्ये बॅंकेचे कर्मचारी बोलावून घेऊन त्या सगळ्या नाण्यांची मोजणी केली. तब्बल १० तासांच्या मेहनतीनंतर ती ८०० किलोची नाणी मोजली गेली. आणि जमा करताना स्वत: लाही कळले नाही की त्याच्याकडे 50 लाख रुपयांहून अधिक रुपये कधी जमा झाले.

नाण्यांची मोजणी पूर्ण होताच शोरूमने टाळ्यांचा कडकडाट केला. आणि मॅनेजरने गाडीच्या चाव्या या व्यक्तीकडे दिल्या. गाडी खरेदी करणारी व्यक्ती बसचा चालक होती. लक्झरी कार खरेदी करणे नेहमीच त्याचे स्वप्न होते. ज्यासाठी तो बराच काळ नाणी गोळा करीत होता. पण शेवटी त्या व्यक्तीचे गाडी घेण्याचे स्वप्न साकार झाले.

You might also like