एकदम झक्कास माहिती दररोज फक्त तुमच्यासाठी!

‘चला हवा येऊ द्या’ शो तील या कलाकारांचे खऱ्या आयुष्यातील जोडीदार आहेत हे, एक शिकवते डान्स तर दुसरी..

टीव्हीवर अस्सल मालिकेत दिसणारे टीव्ही स्टार खऱ्या आयुष्यात कसे असतात हे जाणून घेण्याची प्रत्येकाची इच्छा असते आज आम्ही टीव्हीवरील शोमधून खूप लोकांना दुःखातून बाहेर काढणारे आणि एक डोस हस्याचा देणारा शो म्हणजे चला हवा येऊ द्या हा शो! कित्येक वर्षे तरी या शो ने लोकांच्या मनात अधिराज्य बनवले आहे. निव्वळ मनोरंजन हा यामागचा हेतू आहे मग त्यातून पोस्टमन येतो आणि अरविंद जगताप सरांची पत्रे वाचून डोळे ओले करत असतो. त्यामुळे या शो ने खूप कमी वेळेतच लोकांची मने जिंकून घेतली.

या शो मध्ये आत्तापर्यंत खूप सारे मान्यवर कलाकार येऊन गेले मग ते मराठी मधील दिग्गज कलाकार असो किव्हा बॉलिवूड मधील कलाकार यांनी देखील या शो मध्ये आपली हजेरी लावली. मराठी मातीतल्या जनतेपर्यंत जर एखादा चित्रपट मालिका पोहचवायची असेल ‘चला हवा येऊ द्या’ हा मंच त्यासाठी खूप अनुकूल आहे.

पण छोट्या पासून मोठ्या पर्यंत गरीब किव्हा श्रीमंत या सगळ्यांना हसवणारे चला हवा येऊ द्या मधील कलाकार खऱ्या आयुष्यात काय करतात हे कोणाला माहीत नाही आहे आज आपण तेच जाणून घेणार आहोत खऱ्या आयुष्यात त्यांना सुख दुःखात कोणाचा आधार मिळत असतो याची लिस्ट तुम्हाला आज देणार आहोत.

निलेश साबळे
शो चे अँकर आणि याचबरोबर लेखक दिग्दर्शक असे त्रैमिक भूमिका बजावणारे निलेश साबळे यांचा खूप मोठा परिवार आहे, त्यांच्या पत्नीचे नाव गौरी असे आहे. याचबरोबर दोघांनी हा प्रेमविवाह केला आहे.

भाऊ कदम उर्फ भालचंद्र कदम
प्रत्येक गोष्टीत भाव खाऊन जाणारा चला हवा येऊ द्या चा हिरा असा भाऊ कदम यांचा देखील परिवार तसा मोठा आहे, त्यांच्या घरी आई आणि त्यांचा भाऊ श्याम कदम असे कुटूंब आहे भालचंद्र कदम यांच्या बायकोचे नाव ममता असे आहे याचबरोबर त्यांना तीन मुली आहेत. एक भावाची आणि दोन भाऊ कदम यांची.

कुशल बद्रिके
बाईच्या कपड्यात वेषांतर आणि कोणतेही भूमिका सहज पेलवणारे अभिनेते कुशल बद्रिके यांच्या बायकोचे नाव सुनयना असे आहे ज्या नृत्याचे क्लासेस घेतात. त्यांना एक मुलगा देखील आहे.

श्रेया बुगडे
मालिका क्षेत्रातील कोणत्याही अभिनेत्रीची नक्कल करणारी अभिनेत्री श्रेया बुगडे यांच्या आईचे नाव नूतन बुगडे आणि बाबांचे नाव अरुण बुगडे. याचबरोबर त्यांना एक बहीण देखील आहे जीचे नाव तेजल मुखर्जी असे आहे श्रेयाने प्रेमविवाह केला आहे त्यांच्या पतीचे नाव निखिल शेठ आणि त्या दोघांना एक मुलगा देखील आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Shreya Bugde Sheth🦄 (@shreyabugde)

भारत गणेशपुरे
भारत गणेशपुरे यांच्या देखील कुटूंबात नवरा बायको असा परिवार आहे त्यांना मुलं देखील आहेत.

सागर कारंडे
वेगवेगळ्या प्रकारचे आवाज काढणारे सागर कारंडे यांचाय पत्नीचे नाव सोनाली कारंडे आहे. त्यांना एक मुलगी असून त्यांचे नाव सई ठेवण्यात आले आहे.

अंकुर वाढवे
छोटा पॅकेट बडा धमाका अंकुर वाढवे यांचे देखील लग्न झाले आहे त्यांना एक मुलगी देखील आहे जीचे नाव त्यांनी ख्याती असे ठेवले आहे.

You might also like