एकदम झक्कास माहिती दररोज फक्त तुमच्यासाठी!

या बॉलिवूड कलाकारांनी सुरुवातीला फक्त इतक्या पैशात केले होते काम, जाणून व्हाल चकित.

हिंदी चित्रपट सृष्टी मध्ये बाहेरून येउन स्वतःची वेगळी ओळख निर्माण करणे हे काही सोपे काम नाही. कोणत्याही कलाकाराला लोकप्रियता व प्रसिद्धी मिळविण्याकरिता वेळ लागतोच.

बॉलिवूडच्या या मोठ्या  कलाकारांकडे आज मोठे बंगले,कार्स, फार्म हाऊसेस आहेत. मात्र आपल्याला माहिती आहे का यांना कोणतेही गॉडफादर नसताना बॉलिवूडमध्ये स्वतःचे अस्तित्व कशाप्रकारे  निर्माण केले.

शाहरुख खान,अक्षय कुमार,अमिताभ बच्चन या कलाकारांची चित्रपट सृष्टीत कोणतीही पारिवारिक पार्श्वभूमी नव्हती. आपल्याला माहिती आहे का सुरुवातीला यांनी फक्त किती रुपयात काम केले होते? चला जाणून घेऊ या संदर्भात काही माहिती.

शाहरुख खान : बॉलिवूडमध्ये किंग खान म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शाहरुख खान यांची पहिली कमाई मात्र 50 रुपये एवढीच होती, जे त्यांनी पंकज उ’दा’स यांच्या कॉन्सर्ट मध्ये कमावले होते. चित्रपटांमध्ये अभिनय करण्याआधी शाहरुख हे टीव्ही सीरियल्समध्ये काम करत होते.१९८९ साली टीव्ही वर आलेली सिरीयल ‘फौजी’ या मध्ये त्यांना सर्व प्रथम पहिले गेले.

अमिताभ बच्चन : बॉलिवूडचे शहेनशहा व सदी चे महानायक म्हणून ओळखले जाणारे अमिताभ बच्चन यांनी स्वतःच्या अभिनय कौशल्याच्या बळावर व मेहनतीच्या बळावर चित्रपटसृष्टीत नाव कमावले.

त्यांच्या सुप्रसिद्ध टीव्ही शो कोण बनेगा करोडपती या मध्ये ते  म्हणाले होते की चित्रपट सृष्टीत येण्याआधी त्यांनी एका मॅनेजिंग कंपनीमध्ये एक्झिक्युटिव्ह या पदावर काम केले होते व त्या वेळी त्यांना केवळ ५०० रुपये प्रतिमहा एवढाच पगार होता.

अक्षय कुमार : बॉलीवुड चे खीलाडी अक्षय कुमार हे सर्व प्रकारचे पात्र उत्तम प्रकारे साकारत असतात मग कॉमेडी असो,ॲ’क्श’न असो किंवा सुंदर अभिनेत्री सोबत रोमान्स असो अक्षय या सर्व पात्रांमध्ये फिट बसतात. मात्र हे जाऊन आपण थक्क होणार आहात की बँकॉक येथे शेफ व वेटर ची नोकरी करत असताना त्यांची पहिली सॅलरी फक्त १५०० रुपये एवढीच होती.

आमिर खान : बॉलिवूडचे मिस्टर परफेक्शनिस्ट म्हणजे आमिर खान. आमिर खान यांना आपल्या पहिला चित्रपट ‘कयामत से कयामत’ तक या साठी प्रतिमा फक्त १००० रुपये मानधन म्हणून दिले गेले होते. मीडिया रिपोर्ट च्या अनुसार त्यांनी स्वतःच्या पहिल्या कमाईचे पैसे आपल्या आईला दिले होते.

ऋतिक रोशन : रितिक रोशन यांचे वडील बॉलिवूडमधील मोठी हस्थी जरी असले तरी  ऋतिकच्या पहिल्या कमाईचा किस्सा मजेदार आहे. रितिक रोशन यांनी “आशा” या नावाचा एक चित्रपटात बालकलाकार म्हणून अभिनय केला होता व यासाठी त्यांना १०० रुपये मिळाले होते. व या स्वतःच कमावलेल्या या पैशातून त्यांनी टॉय ट्रेन हे खेळणे खरेदी केले होते.

नमस्कार वाचक मित्रांनो, वरील लेख हा इंटरनेटवर उपलब्ध माहितीवरून संदर्भ घेऊन लिहिण्यात आलेला आहे. या लेखामध्ये वापरलेले फोटो हे google.com वरून घेण्यात आलेले आहेत. जरी आपणास या लेखामध्ये कोणतेही कॉपीराईट कंटेंट आढळले असेल तर कृपया आम्हाला smartmarathi8390@gmail.com या इमेलवर संपर्क करा.

You might also like