एकदम झक्कास माहिती दररोज फक्त तुमच्यासाठी!

बॉलिवूडच्या या ४ प्रसिद्ध अभिनेत्री आहेत राजघराण्याशी संबधीत..जाणून घ्या नावे!

बॉलिवूडमध्ये मध्ये असे अनेक स्टार आहेत जे रियल लाइफ मध्ये काहीतरी वेगळेच आहेत.  अभिनेत्रीं चित्रपटात कोणत्याही रोल मध्ये असो पण आपण जर अभिनेत्रींच्या वास्तविक जीवना बद्दल जाणून घेतले तर थक्क होऊ. खरं तर ह्या अभिनेत्री रियल लाइफ मध्ये  राजकन्या आहेत. आपल्याला ह्यांच्याबद्दल वाचून ध’क्का बसेल. आज आम्ही तुम्हाला या अभिनेत्रींबद्दल सांगणार आहोत ज्या राजघराण्यातील आहेत. या यादीमध्ये बरीच नावे आहेत, चला त्यांच्याबद्दल आपण जाणून घेऊया.

किरण राव-

बॉलिवूड अभिनेता आमिर खानची पत्नी किरण राव कदाचित चित्रपट अभिनेत्री नसून ती बी-टाऊनमधील एक प्रसिद्ध नाव आहे. किरण राव एक लेखक, निर्माती आणि दिग्दर्शक आहे. तुम्हाला वाचून आश्चर्य होईल कि किरण राव हि राजघराण्यातील राज कन्या आहे. आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो कि किरण राव तेलंगणाच्या महबूबनगरमधील वानापार्थी राजघराण्यातील आहे. किरणचा जन्म राजघराण्यात झाला आहे.

अदिति राव हैदरी

तुम्ही अदिति राव हैदरीला बर्‍याच चित्रपटांत पाहिले असेल. अदिती सध्या बॉलिवूडमध्ये सक्रिय असून बर्‍याच चित्रपटांमध्ये दिसत आहे. आदिती ही एक अशी अभिनेत्री आहे जी शाही घराण्याशी नाते ठेवते. वास्तविक अदिती ही किरण रावची चुलत बहीण आहे. अदितीहि दोन राजघराण्या मधून येते. अदिती आसामचे माजी राज्यपाल मोहम्मद सलेह अकबर हैदरीची नात आहे.  तर तिचे आजोबा जे. रामेश्वरम वनापर्थीचे राजा होते.

भाग्यश्री-

सलमान खान सोबत  मैंने प्यार किया या चित्रपटातून  रातोंरात फेमस झालेली भाग्यश्री आता बॉलिवूडपासून खूपच दूर आहे. भाग्यश्रीने आपलं एक वेगळं दुनिया बसवली आहे. भाग्यश्रीने फक्त एका चित्रपटातच नाव कमवले.  तसेच ती सुद्धा राजघराण्यातील आहे. भाग्यश्री महाराष्ट्रातील सांगली राजघरान्यातून आहे. भाग्यश्री हि श्रीमंत राजा विजयसिंह राव माधराव पटवर्धन यांची कन्या आहे. इतकेच नाही तर भाग्यश्रीचे पूर्ण नाव श्रीमंत राजकन्या भाग्यश्री राजे पटवर्धन आहे.

सोहा अली खान ;

बॉलिवूड अभिनेत्री सोहा अली खान बद्दल सर्वांनाच माहिती आहे. सोहा हि रॉयल  घरातून बिलॉन्ग  करते. सोहाचे वडील मन्सूर अली खान पटौदी हे क्रिकेटपटू होते आणि ते भोपाळचे नवाब आहेत. सोहाचे आजोबा इफ्तिखार अली खान आठवे पटौदी होते. त्यानंतर सोहाचे वडील नवाब झाले. आता वडिलांनंतर सोहाचा भाऊ आणि बॉलिवूड अभिनेता सैफ अली खान पुढे नवाब होणार आहे.

नमस्कार वाचक मित्रांनो, वरील लेख हा इंटरनेटवर उपलब्ध माहितीवरून संदर्भ घेऊन लिहिण्यात आलेला आहे. या लेखामध्ये वापरलेले फोटो हे google.com वरून घेण्यात आलेले आहेत. जरी आपणास या लेखामध्ये कोणतेही कॉपीराईट कंटेंट आढळले असेल तर कृपया आम्हाला smartmarathi8390@gmail.com या इमेलवर संपर्क करा.

You might also like