एकदम झक्कास माहिती दररोज फक्त तुमच्यासाठी!

‘बिग बॉस मराठी ३’ अपडेट: मीरा आणि तृप्तीचा राडा! महिलांसाठी लढता लढता आता महिलांशीच खडाजंगी…

कलर्स मराठी वाहिनी वरील ‘बिग बॉस मराठी सिझन ३’ मध्ये आता एक नवीनच ट्विस्ट पाहायला मिळाला आहे. अर्थात हे पण एक भां’डणच आहे, पण या भां’डणाचेही एक वैशिष्ट्य आहे. महिलांसाठी भां’डणाऱ्या भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई आता महिलांशीच भां’ड’ताना दिसत आहेत. बिग बॉसच्या घरात एक खेळ खेळताना मीरा जगन्नाथ आणि तृप्ती देसाई यांच्यात चांगलाच वा’द पेटल्याचे दिसून आले. नक्की काय कारण आहे या दोघींच्या भां’डणाचं?

मीरा आणि तृप्ती एकाच गटात आहेत. त्यामुळे त्यांच्यात झालेला हा वा’द अनेकांच्या औत्सुक्याचा विषय बनला आहे. या आधी या दोघींमध्ये कधी भां’डण झालं नव्हतं. मात्र आता ते झालं आहे. कालपर्यंत एकाच टीममध्ये खेळणाऱ्या या दोन स्पर्धक एकमेकींवर आवाज चढवताना दिसत आहेत.

मीराने आपली बाजू मांडताना ‘पलटी’ म्हटल्यावर तृप्ती भडकल्या. हा शब्द मीराने त्यांच्यासाठी वापरला असल्याचे त्यांना वाटले. मात्र त्यांना थांबवत मीराने “पलटी हा शब्द तुमच्यासाठी नव्हता…” असे सांगत आपली बाजू मांडायचा प्रयत्न केला. तिने पुढे काही बोलायचा प्रयत्न केला, मात्र तृप्ती तिला थांबवून म्हणतात, “मी कधीच मोठ्या आवाजात बोलले नाहीये. मी आवाज चढवला नाहीये. मीरा एका आठवड्यात किती शब्द फिरवते. स्वतःलाच बिग बॉस समजते. तिला इथे १४ जण नाही, तर ती एकटीच खेळतेय असं वाटतंय.” यावर मीराने त्यांच्या प्रत्येक वाक्यावर ‘ओके ओके’ असे म्हटले आहे.

यानंतर मीरा एकटी असताना या प्रकरणावर वैतागलेली दिसली आहे. “म्हणे या महिलांसाठी लढतात. इतक्या खालच्या पातळीला ही बाई जाऊ शकते,” असे म्हणत तिने आपल्या रागाला वाट मोकळी करून दिली आहे. तृप्ती आणि मीरामध्ये ही वा’दाची ठिणगी नक्की कोणत्या कारणाने पडली आहे, ते आजच्या भागात कळेल.

या वा’दाच्या ठिणगीला फुंकर मारून कोण मोठं करणार? वा’द मिटवण्यासाठी कोण पुढे येणार? हा वा’द नक्की मिटणार का? की या वा’दातून अजून नव्या वा’दाला तोंड फुटणार? इतर स्पर्धक या भां’डणात उडी घेणार का? असे असंख्य प्रश्न प्रेक्षकांना पुढील भागाचा प्रोमो पाहून पडले आहेत. मात्र आजच्या भागातच या सगळ्या प्रश्नांची उत्तरे मिळू शकतात. त्यासाठी कलर्स मराठी वाहिनी वर रोज रात्री ९:३० वाजता ‘बिग बॉस मराठी सिझन ३’ पाहायला विसरू नका.

You might also like