एकदम झक्कास माहिती दररोज फक्त तुमच्यासाठी!

‘बिग बॉस मराठी सिझन ३’ च्या या स्पर्धकांवर प्रेक्षक आहेत नाराज! थोडी नाराजी बिग बॉसवरही…

कलर्स मराठी वाहिनी वर ‘बिग बॉस मराठी सिझन ३’ या रिऍलिटी शो ची धमाकेदार सुरुवात झाली आहे. या कार्यक्रमात भांडण, वाद, हमरी-तुमरीवर येणं, कधी गळ्यात गळे घालून फिरणं असे प्रकार सर्रास घडत असतात. या शो मध्ये खेळले जाणारे टास्क आणि त्यातून स्पर्धकांमध्ये वाढलेली तेढ हे प्रकरण देखील काही नवीन नाही. मात्र कधी कधी गोष्टी प्रेक्षकांच्या सहनशक्तीपलीकडे जातात आणि मग सुरू होतो त्या शो बद्दल तक्रारीचा सूर.

‘बिग बॉस मराठी सिझन ३’ च्या बाबतीतही काहीसे असेच झाले आहे. नुकत्याच झालेल्या टास्क मध्ये विशाल निकम आणि विकास पाटील यांनी छान खेळत प्रेक्षकांची मने जिंकून घेतली होती. विकास आणि विशाल या दोघांना टास्क मध्ये हरवण्यासाठी गायत्री दातार, मीरा जगन्नाथ आणि जय दुधाने यांनी आटोकाट प्रयत्न केले होते. पण हाच टास्क खेळायची वेळ जेव्हा गायत्री आणि जय वर आली, तेव्हा त्यांनी आपले चेहरे पूर्ण झाकून घेतले होते.

कहर म्हणजे बिग बॉसने जय आणि गायत्री यांनी आपला टास्क योग्य पद्धतीने खेळल्याचा निर्णय दिला. त्यामुळे या भेदभावामुळे प्रेक्षक नाराज झाले आहेत. ‘बिग बॉसने हल्लाबोल टास्क मध्ये भेदभाव केला आहे का?’ असा सवाल प्रेक्षक विचारत आहेत. यामध्ये एका टीममध्ये ६ तर दुसऱ्या टीममध्ये ८ स्पर्धक होते. याशिवाय संचालक देखील आपल्या टीमची बाजू घेणाराच आहे, हे बघून प्रेक्षकांनी आपली नाराजी व्यक्त करायला सुरुवात केली आहे. याच कारणामुळे प्रेक्षक जय आणि गायत्री यांच्या वागण्यावर चिडले आहेत.

‘विशाल आणि विकास फेअर गेम खेळले आहेत, मग निकाल जय आणि गायत्रीच्या बाजूने कसा लागला?’ असा प्रश्न प्रेक्षकांकडून विचारला जातोय. काही प्रेक्षकांनी गायत्रीला स्वतःचे मत नसल्याबद्दल नाराजीचा सूर लावला आहे. ‘गायत्री दातार नेहमी मीराच्या हो ला हो करत असते, तिला स्वतःची बुद्धी वापरता येत नाही का?’ असा प्रश्न प्रेक्षक विचारत आहेत. या एकंदर टास्क प्रकरणामुळे ‘बिग बॉस पक्षपातीपणा करून निर्णय घेतात का?’ असा रोष प्रेक्षकांकडून बिग बॉस वरही काढण्यात येत आहे.

दरम्यान शिवलीला पाटीलला तब्येतीच्या कारणामुळे बिग बॉसच्या घरातून बाहेर ठेवण्यात आले आहे. त्यामुळे तिच्या वोटींग लाईन्स बंद आहेत. पण तिच्या बाहेर राहण्याचे कारण हे नक्की आजारपणच आहे, की अजून काही, याबद्दल मात्र प्रेक्षकांमध्ये संभ्रम आहे.

You might also like