एकदम झक्कास माहिती दररोज फक्त तुमच्यासाठी!

‘बिग बॉस मराठी ३’ मध्ये चढू लागले आहेत प्रेमाचे रंग! गायत्री पडली आहे जयच्या प्रेमात..

सध्या कलर्स मराठी वाहिनी वरील ‘बिग बॉस मराठी सिझन ३’ ने प्रेक्षकांना खिळवून ठेवले आहे. हा शो सुरू होऊन केवळ २ आठवडे झाले आहेत आणि बिग बॉस च्या घरातील भां’डणे जगजाहीर झाली आहेत. अर्थात हा शो टास्क पेक्षा यातील भां’ड’णांमुळे जास्त प्रसिद्ध आहे. त्यामुळे प्रेक्षकांचेही मनोरंजन होत आहे. पण नुकतीच या शो मध्ये एका प्रेमप्रकरणाची चर्चा रंगू लागली आहे.

स्पर्धकांमधले हेवेदावे, मैत्री याबरोबरच बऱ्याचदा या शो मध्ये प्रेमाचे रंग देखील उधळलेले पाहायला मिळतात. अनेकदा हा सगळा पब्लिसिटी स्टंट असल्याचेही बोलले जाते. पण प्रेक्षकांना यातील मनोरंजनाशी जास्त घेणे देणे आहे. या आधीही बिग बॉसच्या घरात काही लव्ह बर्ड्स पाहायला मिळाले होते. त्यांना या शो मुळे खूप प्रसिद्धी मिळाली. आता देखील ‘बिग बॉस मराठी सिझन ३’ मध्ये एक नवीन कपल होऊ घातलेले आहे.

बिग बॉसच्या घरातील गायत्री दातार ही स्पर्धक ‘तुला पाहते रे’ या मालिकेद्वारे प्रसिद्धीझोतात आली होती. बिग बॉसच्या घरातील अजून एक स्पर्धक म्हणजे जय दुधाने. जय आणि गायत्री यांच्यात काहीतरी शिजत असल्याचे बोलले जात आहे. जय एक मॉडेल आणि उद्योगपती आहे. तसेच त्याला महागड्या गाड्यांची आवड असल्याचेही बोलले जाते. या दोघांमध्ये सध्या प्रेमाचे रंग फुलत असल्याचे प्रेक्षक बोलत आहेत.

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Gayatri Datar (@gayatridatarofficial)

स्पर्धकांमध्ये घडणारी प्रेमप्रकरणे बिग बॉसच्या प्रेक्षकांसाठी नवीन नाहीत. या आधीही राजेश श्रुंगारपुरे आणि रेशम टिपणीस, सई लोकूर आणि पुष्कर जोग, शिव ठाकरे आणि वीणा जगताप, पराग कान्हेरे आणि रुपाली भोसले या जोड्यांमध्ये बिग बॉसच्या घरात प्रेम फुलताना दिसले होते. लोकांनी देखील या जोड्यांना विशेष पसंती दर्शवली होती. आता या पर्वात गायत्री दातार आणि जय दुधाने यांची जोडी प्रेक्षकांची आवडती लव्ह बर्ड्स ची जोडी ठरते का, हे बघणे मनोरंजक असणार आहे.

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by J A Y D U D H A N E (@jaydudhaneofficial)

गेल्या भागामध्येच गायत्रीने सांगितले होते, की ती बिग बॉसच्या घराच्या प्रेमात पडली आहे. आता ती नक्की घराच्या प्रेमात पडली आहे, की घरातल्या एका व्यक्तीच्या हे येणाऱ्या भागांमध्ये कळेलच. या नव्या जोडीबद्दल तुम्हाला काय वाटते मंडळी? आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की कळवा. तसेच तुम्हाला आमचे आवडलेले लेख लाईक आणि शेअर करायला विसरू नका.

You might also like