एकदम झक्कास माहिती दररोज फक्त तुमच्यासाठी!

बिग बॉस मराठी ३ अपडेट: ‘महिला महिला अन् भांडायला नंबर पहिला’ सोनाली आणि तृप्तीमध्ये पडली वादाची ठिणगी..

कलर्स मराठी वाहिनी वरील ‘बिग बॉस मराठी सिझन ३’ भलताच रंगात आलाय. शो सुरू झाल्यानंतर पहिल्याच आठवड्यात स्पर्धकांमध्ये चुरशीची स्पर्धा पाहायला मिळाली आहे. त्यांना दिलेल्या टास्क मध्ये खूप हिरीरीने सहभागी होत त्यांनी हे टास्क पूर्ण केले आहेत. विशेष म्हणजे या सगळ्या स्पर्धकांना टक्कर देत उत्कर्ष शिंदे तिसऱ्या पर्वाचा पहिला कॅप्टन बनला आहे. त्याला कॅप्टनसी मिळाल्यावर बिग बॉस च्या घरातील कामांचे वाटप झाले. मात्र याच कामांवरून स्पर्धकांमध्ये वादाची ठिणगी पडली आहे.

मीनल आणि जयमध्ये भांड’ण झालेलं नुकतंच प्रेक्षकांना पाहायला मिळालं. आता सोनाली पाटील आणि तृप्ती देसाई यांच्यात वाद पेटला आहे. येणाऱ्या भागात या वादाचं नक्की कारण समजेल. मात्र या येणाऱ्या भागाचा प्रोमो सोशल मीडिया वर भलताच व्हायरल झाला आहे. या प्रोमोमध्ये सोनाली आणि तृप्तीमध्ये शाब्दिक बाचाबाची झालेली दिसून येते. त्यावरून सोनालीने तृप्ती यांच्या कार्यावरून त्यांच्यावर निशाणा साधल्याचे दिसत आहे.

घरातील कामे करण्यावरून तृप्ती आणि सोनालीमध्ये शाब्दिक युद्ध पेटलं असताना तृप्ती देसाईंनी सोनालीवर आवाज चढवत तिला दम भरला आहे. “मी ऐकते म्हणून काहीही बोलायचं नाही. मी बोलते त्याची नीट उत्तरं द्यायची. पुरुष जर काम करू शकतात, तर महिलांनी का करू नये?” असा सवाल तृप्ती देसाईंनी सोनालीला विचारला. त्यावेळी त्यांनी तिला शांत राहण्याची ताकीदही दिली.

तृप्ती देसाईंनी रुद्रावतार धारण केला असला तरी सोनाली देखील शांत राहणाऱ्यातली नाहीये. सोनालीने देखील आपल्या भाषेत उत्तर दिलं. “महिलांनाच विरोध करायला या कायम पुढे… महिला, महिला आणि महिला… आणि भांडायला नंबर पहिला!” असे सोनालीने म्हणताच तृप्ती यांच्या चेहऱ्यावरचे भाव बघण्यासारखे झाले होते. येणाऱ्या भागात या भां’डणाचा काय शेवट होतो, ते कळेलच. आता या भां’डणाचा शेवट होणार की या भां’डणातून नव्या वादाला तोंड फुटणार हे येणाऱ्या भागात बघणे रंजक असणार आहे.

प्रेक्षकांना आता येणाऱ्या भागांची खूप उत्सुकता लागून राहिली आहे. या भां’डणात कोणी मध्ये पडायची हिंमत करेल का, असाही प्रश्न प्रेक्षकांना पडला आहे. या भां’डणाचा बिग बॉस च्या घरातील वातावरणावर काय परिणाम होतो, यावरही प्रेक्षक लक्ष ठेवून आहेत. बिग बॉस च्या घरात घडणाऱ्या या वादांमुळे ‘बिग बॉसच्या चावडीवर’ होस्ट महेश मांजरेकर कोणाची शाळा घेणार, याचीही प्रेक्षकांना उत्सुकता लागली आहे.

You might also like