एकदम झक्कास माहिती दररोज फक्त तुमच्यासाठी!

बिग बॉस मराठी ३ अपडेट: मीराने सांगितली सुरेखा बरोबरची एक आठवण; सोनाली झाली भावुक..

कलर्स मराठी वाहिनी वर रोज रात्री ९:३० वाजता ‘बिग बॉस मराठी सिझन ३’ प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. मनोरंजनाने भरलेल्या या रिऍलिटी शो ची सगळेच प्रेक्षक आतुरतेने वाट पहात असतात. अनेक कलाकार आणि काही सामाजिक व्यक्तिमत्वं देखील यावेळी बिग बॉस च्या घरात एकाच छताखाली राहणार आहेत. शो च्या पहिल्याच दिवशी बिग बॉस च्या घरात वादाच्या ठिणग्या पडल्या आहेत. आता यातल्या किती ठिणग्या वनव्याचं रूप धारण करतात हे तर आगामी भागांमध्ये कळेलच.

दरम्यान शो च्या दुसऱ्या दिवशी हे स्पर्धक एकमेकांसोबत गप्पा मारताना दिसले. मीराने तिची आणि सुरेखा कुडची यांची एक आठवण सांगितली. मीरा आणि सुरेखा कुडची बोलत असताना मीराने सुरेखा ताईंना सांगितले की त्यांनी या आधी एकमेकींबरोबर काम केले आहे. त्या दोघींनी ‘नकळत सारे घडले’ या मालिकेत एकत्र काम केल्याचे मीराने यावेळी सांगितले. मात्र सुरेखा ताईंना ते आठवत नव्हते.

यावेळी या मालिकेच्या दरम्यान त्या दोघींची भां’ड’णेही झाली होती असे मीराने सांगितले. त्यावेळी सुरेखा ताईंनी मीराची बॅग फेकून दिल्याची आठवण मीराने सांगितली. मात्र यातले काहीच आठवत नसल्याचे सुरेखा ताईंनी सांगितले. मात्र तरीही मीराच्या बोलण्यावर त्यांनी हसून ‘रात गयी बात गयी’ असे उत्तर दिले. मागचे सगळे विसरून बिग बॉस च्या घरात आल्यावर मीराला सुरेखा ताईंकडून चांगल्या व्हाइब्ज मिळाल्याचे यावेळी मीरा त्यांना म्हणाली.

दुसरीकडे सोनाली पाटील आणि शिवलीला पाटील एकमेकींशी गप्पा मारताना दिसल्या. यादरम्यान सोनाली बरीच भावुक झाली होती. तिने सांगितले, की तिची पहिली मालिका सुरू होण्यापूर्वीच तिच्या वडिलांचे निधन झाले. यावेळी शिवलीलाने तिला आधार देत ‘ते जिथे असतील तिथून तुला बघत असतील आणि आनंदी होत असतील’ असं बोलून धीर द्यायचा प्रयत्न केला.

आपल्या वडिलांच्या आठवणीत सोनाली खूपच भावविवश झालेली दिसली. तिने पुढे सांगितले, की त्या दिवशी एकादशी होती आणि द्वादशीलाच तिचे बाबा अचानक त्यांना सोडून निघून गेले. हे सांगताना तिच्या डोळ्यांत पाणी आलं होतं.

कुणाकुणाच्या जुन्या आठवणी जाग्या होणार, कोण कोण भांड’ण करणार, कोण भां’डण मिटवायचा प्रयत्न करणार, कोण आ’गीत तेल ओतणार हे तर येणाऱ्या भागांमध्ये कळेलच. ‘बिग बॉस मराठी सिझन ३’ चे आगामी भाग रंजक होणार आहेत हे तर पहिल्या दिवशीच समजले होते. आता स्पर्धक एकमेकांशी कसे वागणार याबाबत प्रेक्षकांना उत्सुकता लागून राहिली आहे.

Video Source and credit: Rajshri Marathi

You might also like