एकदम झक्कास माहिती दररोज फक्त तुमच्यासाठी!

‘बिग बॉस मराठी ३’ मुळे उत्कर्षचा भाऊ आदर्श शिंदे होतोय ट्रो’ल! ‘भावाला घेऊन घरी जा…’

कलर्स मराठी वाहिनी वरील ‘बिग बॉस मराठी सिझन ३’ हा रिऍलिटी शो भलताच रंगलाय. ‘बिग बॉसची चावडी’ हे सदर तर प्रेक्षकांच्या विशेष आवडीचं. कारण यात शो चे होस्ट महेश मांजरेकर स्पर्धकांची शाळा घेताना दिसतात. बिग बॉसच्या घरातली स्पर्धकांची हमरीतुमरी कमी होती म्हणून की काय, आता घराबाहेरही रान पेटलेलं दिसत आहे.

बिग बॉसच्या चावडीवर महेश मांजरेकरांनी स्पर्धक उत्कर्ष शिंदेचीही शाळा घेतलेली पाहायला मिळाली. उत्कर्षच्या कॅप्टनसी वर प्रश्नचिन्ह उभं करत त्यांनी ‘उत्कर्ष हा सगळ्यांत वाई’ट आणि पक्षपाती संचालक आहे’ असा आरोप केला आहे. त्यावरून उत्कर्षचा भाऊ गायक आदर्श शिंदेने आपल्या भावाला पाठींबा दर्शवणारी भली मोठी पोस्ट सोशल मीडिया वर लिहिली आहे.

यात केवळ त्याने आपल्या भावाला पाठींबा दिला नसून ‘बिग बॉस’ ला डबल ढोलकी देखील म्हटले आहे. उत्कर्षची बाजू मांडत त्याने बिग बॉसच्या अनेक गोष्टी अन’फेअर असल्याचे म्हटले आहे. “निव्वळ माझा भाऊ आहे म्हणून मी हा कार्यक्रम बघतो. काही गोष्टी खटकल्या आणि आमच्याही मित्रांचे, फॅन्सचे आणि फॉलोवर्सचे सतत कॉल्स आणि मेसेजेस येत आहेत की तुम्ही बोला. तुम्ही शांत का? जे घडतंय ते चुकीचं घडतंय असं प्रेक्षकांनाही वाटतंय. त्यामुळे ठरवलं की काही मुद्दे मांडूया. आणि हे सगळं लिहावंसं वाटलं…” असे देखील या पोस्टच्या शेवटी आदर्शने लिहिले आहे. आपला भाऊ प्रत्येक टीका खूप ग्रेसफुली घेतोय आणि मला त्याचा अभिमान वाटतो, असेही आदर्शने आपल्या या पोस्ट मध्ये म्हटले आहे.

मात्र ‘बिग बॉस’ च्या अस्सल चाहत्यांना आदर्शने बिग बॉस वर केलेला हा हल्लाबोल रुचला नाही. त्यांनी लगेचच आदर्शला ट्रोल करायला सुरुवात केली. अनेक कमेंट्स करत बिग बॉसच्या चाहत्यांनी आदर्शवर हल्ला चढवला आहे. “बिग बॉस पेक्षा तुम्ही मोठे नाही.

एवढा राग येतो तर बिग बॉस मध्ये गेलात कशाला?”, “आम्ही काय आंधळे नाहीत, आम्हाला सगळं दिसतं”, “इतका तिला राग येत असेल तर सरळ भावाला घरी घेऊन जा, त्याची लायकी कळली आहे”, “ह्या अशा डबल ढोलकी पोस्टमुळे आता त्याला जी काय मतं मिळाली असती ती पण बोंबलली!”, “नाचता येईना, अंगण वाकडं, म्हणे डबल ढोलकी” अशा कमेंट्स आदर्शच्या पोस्टवर केलेल्या पाहायला मिळत आहेत.

You might also like