एकदम झक्कास माहिती दररोज फक्त तुमच्यासाठी!

‘बिग बॉस मराठी ३’ अपडेट: विशाल चिडलाय सोनालीवर! ‘हे’ आहे कारण…

कलर्स मराठी वाहिनी वरील ‘बिग बॉस मराठी सिझन ३’ मध्ये रोजच काही ना काही घडामोडी चालू राहतात. आता विशाल निकम आणि सोनाली पाटील मध्ये काहीतरी बिनसलंय असं दिसतंय. खरंतर या दोघांमध्ये मागच्या काही भागांमध्ये चांगली मैत्री झालेली दिसून आली. त्यामुळे हे दोघे बरेच चर्चेत होते. मात्र आता दोघांमध्ये काहीतरी असं घडलंय ज्यामुळे विशाल सोनालीवर चिडला आहे. काय झालंय नक्की? चला पाहूया.

विकास गार्डन एरिया मध्ये होता. तेव्हा विशालने नुकतीच आपली सोनालीवर असलेली नाराजी विकासकडे व्यक्त केली. विशाल म्हणाला, “आमच्यात जर अंडरस्टँडिंग नसेल, तर उपयोग नाही बोलण्याचा. मी काय त्रास घेत बसणार नाही. मला होतोय त्रास त्या गोष्टीचा. ती ज्या पद्धतीने वागते ना… मी जे बोलण्याचा प्रयत्न करतो ते ती इग्नोर करतेय. मला फरक नाही पडणार आहे. स्वतःहून आली तर मी बोलेन, नाहीतर मी नाही जाणार आता बोलायला तिच्याशी. मी गेलोय चार वेळा तिच्याकडे.”

विशाल हे विकासला सांगत असतानाच मीनल तिथे आली. त्यावेळी विशालला पाहून तिने ‘काय झाले’ असे विचारले. त्यावर विशालने तिच्याजवळ आपला सोनालीवर असलेला राग व्यक्त केला. तो मीनलला म्हणाला, “काय नाय! तुमची मैत्रीण सोना… माझी मैत्रीण नाहीये ती बस झालं! सोन्याचा भाव आल्यासारखा ऍटिट्युड दाखवते. मी किती बोलण्याचा प्रयत्न करतोय, ती इग्नोर करतेय गोष्ट प्रत्येक वेळी. ती मला टाळतेय. मला माहीत नाही का करतेय ती अशी… मी प्रयत्न केला तिच्याशी १० वेळा बोलायचा. एका लिमिटपर्यंत मी समजू शकतो. त्यानंतर मला नाही फरक पडणार.”

यावर मीनलने विशालला विचारले, “मी बोलून बघू का तिच्याशी?” मीनलने असे विचारताच विशालने आपली बाजू समजावून सांगितली. तो तिला म्हणाला, “तिला सांग की मी तिला काही बोललो असेन, तर त्यामागचा उद्देश समजून घे. इग्नोर करतेय सरळ ती मला. हे करायला नाही आलोय इथे. तिला कामात त्रास होत असेल, तर मी मदत करायला रेडी आहे. माझी काहीतरी किंमत आहे या घरात. मग मला नाही फरक पडत ती आहे की नाही या घरात.”

आता सोनाली विशालला का टाळतेय? विशाल नक्की याच गोष्टीमुळे चिडला आहे की अजून काही कारण आहे? सोनाली आणि विशाल मध्ये नक्की कोणते गैरसमज आहेत? हे येणाऱ्या भागांमध्ये कळेलच. सोंली आणि विशाल मधील हे गैरसमज दूर होऊन दोघांमधील मैत्री पुन्हा जुळेल का, असा प्रश्न सध्या प्रेक्षकांना पडला आहे.

You might also like