एकदम झक्कास माहिती दररोज फक्त तुमच्यासाठी!

बिग बॉस मराठी ३ अपडेट: कीर्तनकार शिवलीला पाटील अखेर ‘बिग बॉस’ मधून बाहेर! धक्कादायक कारण आलं समोर…

सध्या सगळीकडे चर्चा चालू आहे ती फक्त ‘बिग बॉस मराठी सिझन ३’ ची. यातले स्पर्धक, रोजची भां’डणं, एलिमिनेशन प्रोसेस, एकमेकांना खुन्नस, तर कधी एकमेकांच्या गळ्यात गळे अशा अनपेक्षित गोष्टी नेहमीच ‘बिग बॉस’ मध्ये घडत आल्या आहेत. यातील टास्क आणि धक्कातंत्रावर या शो चा टीआरपी अवलंबून असतो. आताही अशीच एक धक्कादायक गोष्ट ‘बिग बॉस मराठी सिझन ३’ मध्ये घडली आहे. प्रसिद्ध कीर्तनकार शिवलीला पाटील चक्क बिग बॉसच्या घरातून बाहेर पडल्या आहेत.

मुळात एका कीर्तनकाराने बिग बॉसच्या घरात जाणे हाच मोठा चर्चेचा आणि वादाचा विषय झाला होता. बिग बॉस हा शो कसा चालतो, हे प्रेक्षकांना माहीत आहे. त्यामुळेच अनेक प्रेक्षकांनी शिवलीलाच्या बिग बॉसच्या घरात जाण्याच्या निर्णयाला विरोध दर्शवला होता. बिग बॉसच्या घरात ‘माऊली’ म्हणून प्रसिद्ध असलेल्या कीर्तनकार शिवलीला २९ सप्टेंबर रोजी बिग बॉसच्या घरातून बाहेर पडल्या आहेत.

बिग बॉसच्या घरात ‘नाव मोठे लक्षण खोटे’ हा टास्क झाला. यामध्ये घरातील अपुरे योगदान, घरातील वावर, कार्यातील कामगिरी आणि प्रेक्षकांचे मनोरंजन करण्याची अकार्यक्षमता या निकषांवर स्पर्धकांना नॉमिनेट करण्यात आले होते. यात शिवलीलाही नॉमिनेट झाली होती. नॉमिनेशननंतर आपली बाजू मांडताना तिने सांगितलं, की “मी घरातून बाहेर पडेन त्यादिवशी प्रत्येकाच्या डोळ्यांत माझ्यासाठी पाणी असेल.”

अखेर शिवलीलाला बिग बॉसच्या घरातून बाहेर पडावंच लागलं. मात्र शिवलीला या शो मधून एलिमिनेट झालेली नाही. तर शिवलीलाची तब्येत बिघडल्याने बिग बॉसनी निर्णय घेत काही दिवस शिवलीलाला घरातून बाहेर ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. शिवलीलाला डॉक्टरच्या देखरेखीखाली राहण्याची गरज असल्याचे सांगत बिग बॉसने शिवलीला बिग बॉसच्या घरातून काही दिवसांसाठी बाहेर राहील, असा निर्णय बिग बॉसनी घेतला आहे.

“कीर्तनकार असताना बिग बॉसच्या घरात जाणं हाच एक मोठा टास्क आहे. कारण बिग बॉस म्हटलं के भां’डण आणि भां’डण म्हणजे अध्यात्माची एकदम विरुद्ध बाजू. ‘भले त्यासी देऊ कासेची लंगोटी, नाठाळाचे माथी हाणू काठी’ या तुकोबांच्या अभंगाप्रमाणेच एक सुशिक्षित मुलगी सुसंस्कृत असू शकते, कीर्तनकार असू शकते आणि आपली मतं ठामपणे मांडू शकते हे दाखवून देण्यासाठी, लोकांचं मत बदलण्यासाठी मी बिग बॉसच्या घरात येत आहे,” असे शिवलीलाने शो सुरू होण्यापूर्वी सांगितले होते.

You might also like