एकदम झक्कास माहिती दररोज फक्त तुमच्यासाठी!

BHUJ: भारताच्या स्वाभिमानासाठी लढणाऱ्या नागपूरच्या मराठमोळ्या जवानाची कहाणी..

पाकिस्तानने भुजचा एअरबेस बेचिराख केला होता, गावातील ३०० महिलांना घेऊन बनवला ७२ तासात नवीन एअरबेस..

१३ ऑगस्ट ला प्रदर्शित होणाऱ्या ‘भुज: द प्राईड ऑफ इंडिया’ या हिंदी चित्रपटाची चर्चा सध्या सगळीकडे होत आहे. १९७१ च्या भारत-पाकिस्तान यु’द्धावर आधारीत या चित्रपटामध्ये अजय देवगण, सोनाक्षी सिन्हा, संजय दत्त, नोरा फतेही, शरद केळकर, प्रणिता सुभाष यांसारखे कलाकार आहेत.

चित्रपटगृहे बंद असल्याने हा चित्रपट ‘हॉटस्टार सिनेप्लेक्स’ या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होत आहे. या चित्रपटाचा प्रोमो नुकताच रिलीज करण्यात आला.

३ डिसेंबर १९७१ ला पाकिस्तानी एअरफोर्सने ‘ऑपरेशन चंगेज खान’ सुरू करत भारतीय वायुसेनेच्या ११ एअरफिल्ड्सवर ह’ल्ला करायला सुरुवात केली. अमृतसर, अंबाला, आग्रा, अवंतीपूर, बिकानेर, हलवारा, जोधपूर, जैसलमेर, पठणकोट, भुज, श्रीनगर आणि उत्तरलाई या ठिकाणी असलेल्या भारतीय एअरबेसवर हा ह’ल्ला करण्यात आला होता.

भारताच्या तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी या ह’ल्ल्यानंतर यु’द्धाची घोषणा केली होती. गुजरातच्या कच्छमधील एअरबेसवर पाकिस्तानने १४ दिवसांत ३५ वेळा ह’ल्ला करत ९२ बॉ’म्ब आणि २२ रॉ’केट’सह भुजचा एअरबेस बे’चिराख केला होता.

अशा कठीण प्रसंगामध्ये धैर्य दाखवत स्क्वाड्रन लिडर विजय कर्णिक यांनी ७२ तासांमध्ये हा एअरबेस तयार करवून घेतला. सतत ए’अरस्ट्रा’ईक होत असूनदेखील त्यांच्या या निर्णयामुळे जवानांना बेसवर घेऊन येणाऱ्या लढाऊ विमानांची गैरसोय झाली नाही.

त्यांचा हा जलदगतीने घेतलेला निर्णय भारताला यु’द्ध जिंकून देण्यात कामी आला. विशेष म्हणजे त्यांनी तिथल्याच माधोपूर गावच्या ३०० महिलांचे योगदान घेत हा एअरबेस तयार केला होता. या ३०० महिलांना सरकारकडून ५० हजार रुपयांच्या रोख रकमेचे बक्षीसही देण्यात आले.

नक्की कोण आहेत हे विजय कर्णिक? मराठी मातीचा हा पुत्र मूळचा नागपूरचा आहे. त्यांचा भाऊदेखील सैन्यात असल्याने देशभक्तीचे बाळकडू त्यांना घरातूनच मिळाले. नागपूरमध्ये आपले शिक्षण पूर्ण झाल्यावर १९६२ मध्ये त्यांची भारतीय वायुसैन्यात भरती झाली.

१९६२ ते १९८६ अशी तब्बल २४ वर्षे त्यांनी सैन्यात राहून मातृभूमीची सेवा केली. १९८६ मध्ये जेव्हा ते निवृत्त झाले तेव्हा ते ‘विंग कमांडर’ या पदावर होते. १९७१ च्या यु’द्धादरम्यान ते भुजच्या एअरबेसवर तैनात होते. त्यामुळे बेचिराख झालेला एअरबेस पुन्हा उभारण्याची जबाबदारी त्यांच्यावर सोपवण्यात आली. स्क्वाड्रन लिडर विजय कर्णिक यांनी त्यावेळी आपले दोन सहकारी ऑफिसर्स आणि ५० वायुसैनिक यांना हाताशी घेत या एअरबेसच्या पुनर्बांधणीचे काम पूर्ण केले.

अशा या निडर जवानाच्या कामगिरीची कथा सांगणारा चित्रपट म्हणजे ‘भुज: द प्राईड ऑफ इंडिया’. आपल्या मायभूमीत असे लढवय्ये आहेत त्यामुळे भारतीय जनता रात्री सुखाने झोपू शकते. अशा या शूर जवानांना आमचा सलाम!

You might also like