एकदम झक्कास माहिती दररोज फक्त तुमच्यासाठी!

भावोजींसोबत बॉलिवूड गाण्यावर थिरकली मेहुणी! जीजा-साली चा व्हिडिओ व्हायरल…

नात्यांची मजाच काही और असते. मग ते कुणाचंही असो. मेहुण्यांना तर आपल्याकडे विशेष महत्त्व आहे. भावोजी आणि मेहुणी यांचं नातं फार मजेशीर असतं. एकमेकांचे पाय खेचण्यात हे दोघेही पुढे असतात.

पण प्रसंगी भावोजी अगदी भावासारखं आपल्या मेहुणीच्या पाठीशी उभे राहतात. तिचं रक्षण करतात. सध्या सोशल मीडिया वर असाच एक भावोजी आणि मेव्हणीचा व्हिडिओ व्हायरल होतो आहे.

या व्हिडिओ मध्ये भावोजी आणि मेव्हणी एका बॉलिवूड गाण्यावर धरताना दिसत आहेत. ‘क्यूँ आगे पिछे डोलते हो भवरों की तरह…’ या हिंदी गाण्यावर या दोघांनी हा ताल धरला आहे. वांगी रंगाची साडी नेसून मेव्हणी या गाण्यावर मस्त नाचताना दिसत आहे.

मेव्हणी चांगले हावभावही करत आहे. चष्मेबद्दूर भावोजी मात्र थोडेसे लाजत आहेत. मात्र त्यांनी आपल्या मेव्हणीला चांगली साथ दिली आहे.

हा व्हिडिओ एका इंस्टाग्राम युजरने तयार केला आहे. या युजरचा युजर आयडी ‘बोल्ड मीरा स्वॅग’ असा आहे. ‘मेरे प्यारे जीजू’ अशी कॅप्शन या पोस्टला टाकण्यात आली आहे. या दोघांचा हा डान्स खूपच व्हायरल होत आहे.

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Bold Meera (@boldmeeraswag)

या इंस्टाग्राम युजरने असे बरेच व्हिडिओ तयार करून शेअर केलेले आपण तिच्या अकाऊंट वर पाहू शकतो. इंस्टाग्राम वर नेहमीच असे काही ना काही तरी लोक शेअर करत असतात. युजर्सना ते आवडले तर लगेच गोष्टी व्हायरल होतात. हा व्हिडिओ देखील असाच व्हायरल झाला आहे.

मित्रांनो, तुम्हाला माहीत आहे का, की या व्हिडीओ मधील गाणे हे कोणत्याही जुन्या चित्रपटातील नसून नवीन चित्रपटातील आहे? ‘क्यूँ आगे पिछे डोलते हो…’ हे गाणं आहे २००६ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘गोलमाल- फन अनलिमिटेड’ या हिंदी चित्रपटातील.

शेखर रावजीयानी आणि स्नेहा पंत या गायकांनी हे गाणे गायले आहे. चित्रपटात हे गाणे अभिनेते परेश रावल आणि अभिनेत्री सुष्मिता मुखर्जी यांच्यावर चित्रित झाले आहे.

मंडळी, आम्हाला माहीत आहे की तुम्हाला वेगवेगळ्या गोष्टी जाणून घ्यायला आवडतात. म्हणूनच आमच्या या वेबसाईटद्वारे आम्ही तुम्हाला ही सगळी माहिती पुरविण्याचा प्रयत्न करत असतो. त्यामुळे तुमच्या आवडत्या लेखांवर प्रतिक्रिया द्यायला विसरू नका. आमचे लेख आवडल्यास जरूर लाईक करा. तुमच्या मित्रमंडळींबरोबर तुमचे आवडते लेख नक्की शेअर करा.

You might also like