एकदम झक्कास माहिती दररोज फक्त तुमच्यासाठी!

राजेशाही थाट! भारतातील ‘हे’ ८ परिवार अजूनही जगतात राजेरजवाड्यांचे जीवन…

भारतात स्वातंत्र्यानंतरही काही राजघराणी त्यांचा थाट टिकवून आहेत. चला पाहूया ही कोणती राजघराणी आहेत ते..

वाडियार परिवार, मैसूर
मैसूर मधील वाडियार हे एक राजघराणं आहे. यदुवीर राज कृष्णदत्त वाडियार हे या घराण्याचे प्रमुख आहेत. भारतीय स्वातंत्र्यापूर्वी ते १३९९ ते १७६१ आणि १७९९ ते १९४७ या कालखंडामध्ये मैसूरचे शासक होते. त्यांच्याकडे विविध आलिशान गाड्यांचा तसेच महागड्या घड्याळांचा संग्रह आहे.

गायकवाड परिवार, बडोदा
हे घराणे मूळचे पुण्याचे आहे. सयाजीराव गायकवाड हे याच राजघराण्याचे आहेत. सध्या या घराण्याचे प्रमुख समरजित सिंह गायकवाड आहेत. गायकवाड घराणे जगातील सर्वांत मोठे खासगी रेसिडेन्स असलेल्या लक्ष्मी पॅलेस मध्ये राहतात.

राठोड परिवार, जयपूर
या परिवाराला सूर्यवंशी राजपूत म्हटले जाते. राठोड राजपुतांच्या अद्वितीय पराक्रमामुळे त्यांना रणबंका राठोड या नावाने ओळखले जात होते. स्वातंत्र्यापूर्वी या एकमेव घराण्याकडे १० पेक्षा जास्त प्रांत होते. जगातील सर्वांत मोठे किल्ले या घराण्याकडे आहेत.

शाही परिवार, जोधपूर
गज सिंह हे या परिवाराचे प्रमुख आहेत. या परिवाराचं घर हे जगातील सर्वांत मोठं घर समजलं जातं. या घराला तब्बल ३४७ खोल्या आहेत. त्यांनी आपल्या अर्ध्या घराचे हॉटेलमध्ये रूपांतर केले असून त्याचे व्यवस्थापन देखील याच परिवारातर्फे पाहिले जाते. याशिवाय अनेक किल्लेदेखील त्यांच्या नावावर आहेत.

अली सीसर शाही परिवार
१६ वे वंशज अभिमानी सिंह हे या परिवाराचे प्रमुख आहेत. रणथंबोर आणि जयपूर मध्ये त्यांचे महाल असून काही हॉटेल्स देखील यांच्या मालकीची आहेत.

मेवाड राजवंश
प्रसिद्ध लढवय्ये महाराणा प्रताप सिंह याच घराण्याचे होते. परिवाराचे प्रमुख श्रीजी अरविंद सिंह मेवाड आहेत. हा परिवार उदयपूरमध्ये असून त्यांच्याकडे राजस्थानमधील अनेक हॉटेल्स, रिसॉर्ट्स आणि चॅरिटी संस्था आहेत.

शाही परिवार, बिकानेर
२५ व्या पिढीतील महाराजा रवी सिंह हे या घराण्याचे प्रमुख आहेत. त्यांच्याकडे अनेक मोठमोठ्या इमारती आहेत.

पतौडी नवाब परिवार
भारतासह जगभरात हे राजघराणं प्रसिद्ध आहे. या परिवाराचे प्रमुख मन्सूर अली खान पतौडी होते. मन्सूर अली खान एक प्रसिद्ध क्रिकेटपटू होते. त्यांनी अभिनेत्री शर्मिला टागोरशी लग्न केले. यांना तीन मुले आहेत. मुलगा सैफ अली खान अभिनेता, तर मुलगी सोहा अली खान अभिनेत्री आहे. तिसरी मुलगी फॅशन डिझायनर आहे.

You might also like