एकदम झक्कास माहिती दररोज फक्त तुमच्यासाठी!

भरत जाधवने आपल्या आईवडिलांच्या स्मरणार्थ बनवले स्मारक! फोटो झाले व्हायरल…

आजकाल लोक फक्त आपल्यापुरताच विचार करतात. त्यामुळे आपल्या जन्मदात्यांना देखील विसरून जातात. या वृत्तीमुळेच आज वृद्धाश्रमांची संख्या वाढली आहे. गरजेपुरतं वापरून गरज संपली की लोक आपल्या म्हाताऱ्या आईवडिलांची रवानगी वृद्धाश्रमात करतात. अशा या जगात आजही काही व्यक्ती आहेत ज्या आपल्या आईवडिलांना देवासमान मानतात. त्यांचा आदर करतात. ते गेल्यानंतरही त्यांची आठवण ठेवतात.

सही अभिनेते भरत जाधव यांनी केलेले एक सही काम आज सोशल मीडिया वर व्हायरल होताना दिसत आहे. आजकालच्या या स्वार्थी जगात त्यांनी आपल्या आईवडिलांसाठी असे काहीतरी केले आहे, ज्याने आजच्या पिढीच्या डोळ्यांत अंजन पडेल. भरत जाधव यांनी आपली आई शांताबाई जाधव आणि वडील गणपतराव जाधव यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ स्मारक उभारले आहे. कोल्हापूरच्या आपल्या शेतात त्यांनी आपल्या स्वर्गवासी आईवडिलांचे स्मारक उभे केले आहे. याचे फोटो सध्या सोशल मीडिया वर व्हायरल होताना दिसत आहेत.

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Bharat Jadhav (@sahibharat)

लोकांनी हे फोटो पाहून भरत यांचे खूप कौतुक केले आहे. कलियुगात मुले हयात आणि कमावती असूनही आईवडील रस्त्यावर भीक मागत फिरतात. जी मुले आपल्या आईवडिलांचा आदर करत नाहीत, त्यांचा सांभाळ करत नाहीत, त्यांच्यासाठी भरत जाधव यांची ही कृती खूप मोठी शिकवण आहे. काही लोक पैशाने मोठे झाल्यानंतर आपल्या आईवडिलांना वाऱ्यावर सोडून देतात. त्यांच्यासाठी हा एक धडा आहे.

आपली ही पोस्ट शेअर करताना भरत जाधव लिहितात, “आई वडिलांच्या स्मरणार्थ आज कोल्हापूर येथील आमच्या शेतात त्यांचं स्मारक उभारलं. मी सर्व मुला मुलींना सांगू इच्छितो की आपले आई वडील सदेह आपल्यात आहेत तोपर्यंत त्यांची भरपूर सेवा करून घ्या. त्यांना आदराने- सन्मानाने वागवा. त्यांच्या नजरेत आपल्यामुळे आनंद आणि अभिमान दिसावा यासाठी प्रामाणिक कष्ट करा. आई वडिलांच्या मुखातून मनापासून आलेल्या आशीर्वादाची तुलना कशाशीच होऊ शकत नाही.”

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Bharat Jadhav (@sahibharat)

भरत जाधव यांची ही कृती नव्या पिढीसाठी एक संदेश आहे. आईवडील काबाडकष्ट करून आपल्या मुलांना मोठं करतात. मुलांच्या सुखासाठी ते आपल्या सुखाचा त्याग करतात. अशावेळी त्यांच्या या मुलांनी त्यांना वाऱ्यावर सोडणं ही अत्यंत अमानुष आणि निंदनीय गोष्ट आहे. सगळ्यांनीच जर भरत जाधव यांच्यासारखा विचार केला, तर वृद्धाश्रमांची संख्या कमी होऊन अनेक कुटुंबं सुखी होतील. काय मंडळी, पटतंय ना?

You might also like