एकदम झक्कास माहिती दररोज फक्त तुमच्यासाठी!

सौंदर्यात भाग्यश्री पेक्षा कमी नाही तिची २५ वर्षांची मुलगी, अशी आहे ‘मैने प्यार किया’ ची सुमनची फॅमिल..

३२ वर्षांपूर्वी सलमान सोबत ‘मैंने प्यार किया’ चित्रपटामध्ये काम करणारी अभिनेत्री भाग्यश्री या चित्रपटामुळे रातोरात प्रसिद्ध झाली. २३ फेब्रुवारी १९६९ रोजी मुंबईत जन्मलेल्या भाग्यश्रीने १९८७ मध्ये ‘कच्ची धूप’ या टीवी सीरियल मधून अभिनयाला सुरुवात केली. पण भाग्यश्रीला १९८९ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘मैंने प्यार किया’ या पहिल्या चित्रपटातून ओळख मिळाली. या चित्रपटा नंतर भाग्यश्रीने अनेक चित्रपटामध्ये काम केले पण तिला फारसे यश मिळू शकले नाही. नंतर भाग्यश्रीने आपल्या बालपणातील मित्र हिमालय दासानीशी लग्न केले आणि स्थायिक झाली. तसे, भाग्यश्रीबद्दल लोकांना बरेच काही माहित आहे, परंतु तिच्या कुटुंबाबद्दल, विशेषत: तिच्या मुलीबद्दल फारच कमी लोकांना माहिती आहे.

लग्नांनंतर ती आपल्या वयक्तिक जीवनात व्यस्त झाली. भाग्यश्रीने एक मुलगा अभिमन्यु तर दुसरी मुलगी अवंतिकाला जन्म दिला आहे. २५ वर्षीय अवंतिका तिची आई भाग्यश्रीसारखीच सुंदर आणि ग्लॅ’म’र’स दिसत आहे. सध्या अवंतिका सोशल मीडियावर खूप अ‍ॅक्टिव असते. इन्स्टाग्रामवर तिचे अनेक चाहते आहेत. अवंतिकाने लंडनमधील कॅस बिझिनेस स्कूलमध्ये बिजनेस व मार्केटिंग पदवी घेतली आहे.

भाग्यश्री काही महिन्यांपूर्वी मुलगी अवंतिकासमवेत एका लग्नाला आली होती. अवंतिकाने लग्नाचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. यात आई आणि मुलगी दोघी हि पारंपारिक लूकमध्ये दिसल्या होत्या.

अवंतिकाला प्रवास, नृत्य, फॅशन आणि मित्रांसह मेजवानी या मध्ये आवड आहे. एक काळ असा होता की अवंतिका संगीत दिग्दर्शक अनु मलिक यांचे पुतणे अरमान मलिक यांना डे’ट करायची.

भाग्यश्रीचा मुलगा अभिमन्यू दसानीने २०१९ मध्ये रिलीज झालेल्या ‘मर्द को डर नहीं होता’ या चित्रपटाद्वारे त्याने बॉलिवूडमध्ये डेब्यू केला होता. या चित्रपटात अभिमन्यू व्यतिरिक्त राधिका मदन, गुलशन देवय्या आणि महेश मांजरेकर यांनी भूमिका केल्या आहेत. अभिमन्यू लवकरच ‘निकम्मा’ या दुसर्‍या चित्रपटात दिसणार आहे.

भाग्यश्रीचा जन्म महाराष्ट्रातील सांगली मध्ये एका रॉयल फॅमिलीमध्ये झाला होता. भाग्यश्रीचा जन्म २ फेब्रुवारी १९६९ रोजी महाराष्ट्राच्या श्रीमंत राजा विजय सिंह राव माधोराव पटवर्धन यांच्या राजघराण्यात झाला. भाग्यश्रीचे पूर्ण नाव श्रीमंता प्रिन्सेस भाग्यराजे पटवर्धन असे आहे.

भाग्यश्रीने एका मुलाखतीत सांगितले होते की लग्नानंतर तिला करियरऐवजी कुटुंबाची निवड करणे योग्य वाटले. भाग्यश्रीच्या म्हणण्यानुसार मैंने प्यार किया चित्रपटानंतर लग्नानंतर आई म्हणून माझी सर्वात मोठी जबाबदारी होती.

नमस्कार वाचक मित्रांनो, वरील लेख हा इंटरनेटवर उपलब्ध माहितीवरून संदर्भ घेऊन लिहिण्यात आलेला आहे. या लेखामध्ये वापरलेले फोटो हे google.com वरून घेण्यात आलेले आहेत. जरी आपणास या लेखामध्ये कोणतेही कॉपीराईट कंटेंट आढळले असेल तर कृपया आम्हाला smartmarathi8390@gmail.com या इमेलवर संपर्क करा.

You might also like