एकदम झक्कास माहिती दररोज फक्त तुमच्यासाठी!

भाग्यश्री मोटे होतेय तिच्या टॅटू मुळे ट्रो’ल! ‘या’ भागावर गोंदवला टॅटू…

आजकाल कलाकार नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे ट्रो’ल होत राहतात. कधी त्यांच्या कपड्यांवरून, तर कधी हेअर स्टाईल वरून. नेटकरी अशा कलाकारांना ट्रो’ल करायची एकही संधी सोडत नाहीत. आता अभिनेत्री भाग्यश्री मोटे नेटकऱ्यांच्या रडार वर आली आहे. ‘देवयानी’ (२०१४) मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला आलेली भाग्यश्री सध्या तिच्या टॅटू मुळे चर्चेत आली आहे.

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Bhagyashree (@bhagyashreemote)

भाग्यश्री आपल्या मराठी, हिंदी आणि दाक्षिणात्य मनोरंजन सृष्टीतील कामांसाठी प्रसिद्ध आहे. मराठी मध्ये तिने ‘देवयानी’ बरोबरच ‘प्रेम हे’ (२०१६) आणि ‘देवा श्री गणेशा’ (२०२०) या मालिकांमध्ये कामे केली आहेत. देवों के देव… महादेव (२०१३), सिया के राम (२०१५) आणि जोधा अकबर (२०१५) सारख्या हिंदी मालिकांमध्येही ती झळकली आहे. शोधू कुठे (२०११), काय रे रास्कला (२०१७), माझ्या बायकोचा प्रियकर (२०१८), श्री कामदेव प्रसन्न (२०१९) यांसारख्या अनेक मराठी चित्रपटांमध्ये भाग्यश्रीने काम केले आहे. याशिवाय काही दाक्षिणात्य चित्रपटांमध्येही ती झळकली आहे.

सध्या भाग्यश्री तिच्या टॅटू मुळे नेटकऱ्यांच्या टीकेला बळी पडली आहे. भाग्यश्रीने आपल्या सोशल मीडिया अकाऊंट वर नुकताच या टॅटूचा फोटो आणि व्हिडिओ शेअर केला होता. टॅटू काढून घेण्याची ही तिची पहिलीच वेळ असल्याचेही तिने यावेळी सांगितले. भाग्यश्री नेहमीच सोशल मीडिया वर सक्रिय राहिली आहे. आपल्या वेगवेगळ्या फोटोशूटचे फोटो ती सोशल मीडिया वर शेअर करत राहते. यातल्या बऱ्याच फोटोंमध्ये ती खूपच हॉट दिसत असते. तिच्या फोटोंवर खूप सारे लाईक्स आणि कमेंट्स येत राहतात.

यावेळी मात्र तिला ट्रो’ल केलं जातंय. तिने आपल्या शरीरावर महामृत्युंजय मंत्राचा टॅटू बनवून घेतला आहे. मात्र तो टॅटू तिने जिथे गोंदवून घेतला आहे, त्यावरून नेटकरी तिला ट्रो’ल करत आहेत. भाग्यश्रीने हा टॅटू कमरेच्या थोडा वर आणि ब्रेस्ट्सच्या थोडा खाली असा गोंदवून घेतला आहे. त्यावर तिच्या या पोस्ट वर अनेक कमेंट्स आल्या. काहींनी तिचे या टॅटूवरून कौतुक केले आहे. मात्र काहींनी तिने टॅटू साठी निवडलेली जागा पाहून तिला ट्रो’ल करायला सुरुवात केली.

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Bhagyashree (@bhagyashreemote)

‘महामृत्युंजय मंत्रासारखा मंत्र अंगावर गोंदवून घेताना लाज वाटली पाहिजे,’ अशा शब्दांत नेटकऱ्यांनी तिला फटकारले आहे. यावर भाग्यश्रीची प्रतिक्रिया अजून आलेली नाही. मात्र तिची प्रतिक्रिया पाहणे खूपच रंजक असणार आहे.

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Gaddam Kiran (@inkindia_)

You might also like