एकदम झक्कास माहिती दररोज फक्त तुमच्यासाठी!

८० च्या दशकातील हि बाल कलाकार आता झाले एवढी मोठी, जगते आहे आता असे अनामिक जीवन..पाहून थक्क व्हाल

हिंदी चित्रपटसृष्टीत बाल कलाकार देखील एक मुख्य कलाकारांसह आपणास पाहायला मिळतात. अनेक बाल कलाकारांनी वेळोवेळी बॉलिवूडमध्ये एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. बाल कलाकारांनी ७०, ८० आणि ९० च्या दशकात वर्च’स्व राखले. आम्ही आपल्याला ८० च्या दशकामधील असाच एका प्रसिद्ध बाल कलाकाराबद्दल सांगणार आहोत, जी आता खूप मोठी झाली आहे.

या बालकलाकारचे नाव बेबी गुड्डू असे आहे. ८० च्या दशकात बेबी गुड्डूने अनेक चित्रपटांमध्ये बालकलाकारांची भूमिका केली होती. ८० च्या दशकात हिंदी चित्रपटात बाल कलाकार म्हणून बेबी गुड्डूचे व’र्चस्व होते. या काळातल्या अनेक हिट चित्रपटाचा ती एक भाग आहे. तिचे खरे नाव शाहिंदा बेग आहे, ती चित्रपट दिग्दर्शक एम. एम. बेग यांची मुलगी आहे.

शाहिंदा बेगने आपल्या फिल्मी कारकिर्दीत सुमारे ३२ चित्रपटांमध्ये काम केले आहे ज्यामध्ये औ’लाद, समंदर ,परिवार, घर-घर की कहानी, मु’ल्जिम, नगीना आणि गुरू यांचा समावेश आहे. बाल कलाकार म्हणून तिचे बहुतेक चित्रपट हिट झाले आहेत.

१९८० मध्ये मुंबईत जन्मलेल्या बेबी गुड्डूने वयाच्या अवघ्या ३ ऱ्या वर्षांपासून हिंदी चित्रपटसृष्टीत काम करण्यास सुरवात केली. असं म्हणतात की अभिनेत्री किरण जुनेजाने तिला चित्रपटात आणलं.

तिने बाल कलाकार म्हणून बॉलिवूडमध्ये काम केले आणि लवकरच तिने आपल्या अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकली. अगदी कमी वेळातच तिने बाल कलाकार म्हणून आपली मोठी आणि खास ओळख निर्माण केली होती.

हिंदी चित्रपटसृष्टीच्या सुमारे ३२ चित्रपटांमध्ये दिसलेल्या या बालकलाकारने इंडस्ट्रीच्या अनेक दिग्गजांसोबत काम केले. श्रीदेवी, जया प्रदा, अमिताभ बच्चन, जितेंद्र आणि मिथुन चक्रवर्ती यांच्यासह त्या काळातील अनेक कलाकारांसह तिने स्क्रीन सामायिक केली आहे. खास गोष्ट अशी की बर्‍याच चित्रपटांमध्ये तिने मुलाची व्यक्तिरेखासुद्धा साकारली आहे.

शाहिंदा बेगच्या बालपणातील कार्यामुळे सर्वजण प्रभावित झाले होते आणि लोकांना वाटले की शाहिंदा पुढे चित्रपटांमध्ये आपले करिअर करेल पण तसे होऊ शकले नाही. तिने बॉलिवूडमध्ये एक मोठे नाव कमावले होते आणि तिचे वडील देखील एक चित्रपट दिग्दर्शक होते, लीड अभिनेत्री होणे तिला क’ठीण नव्हते.

फिल्मी जगाशी असलेले संबंध तोडून शाहिंदा परदेशात स्थायिक झाले आहे. ती विवाहित असून सध्या ती दुबई मध्ये राहते. ती इमिरेट्स एअरलाइन्स येथे काम करते.

नमस्कार वाचक मित्रांनो, आमचा हा लेख तुम्हला कसा वाटला आम्हला कंमेंट करून नक्की कळवा. मनोरंजन क्षेत्रामधील असेच अधिक लेख आम्ही तुमच्यासाठी घेऊन येत असतो. लेख आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका कारण यामुळे आम्हाला आणखी लेख लिहायला प्रोत्साहन मिळते.

You might also like