एकदम झक्कास माहिती दररोज फक्त तुमच्यासाठी!

‘देवमाणूस’ मालिकेतील बज्या खऱ्या आयुष्यात अजूनही चालवतो रिक्षा..स्वतः केला खु’लासा..

खूपदा सामान्य माणसांचा असा गैरसमज असतो, की सिनेसृष्टीत नाव कमावलं की अभिनेते किंवा अभिनेत्री खूप मोठे होतात. पण आपण हे लक्षात घेतलं पाहिजे की ओळख मिळण्यापूर्वी, स्टार होण्यापूर्वी हे कलाकार सुद्धा सामान्य माणसांसारखेच जगत असतात. जेव्हा हे कलाकार ही गोष्ट लक्षात ठेवून इंडस्ट्रीत वावरतात, तेव्हाच भरपूर प्रसिद्धी मिळूनही त्यांचे पाय जमिनीवर राहतात.

‘देवमाणूस’ मालिकेतला एक कलाकार देखील असाच आहे. सध्या ‘देवमाणूस’ ही मालिका प्रेक्षकांना खिळवून ठेवत आहे. या मालिकेतले अनेक नवे ट्विस्ट लोकांना आश्चर्याचे धक्के देत राहतात. या मालिकेतले कलाकार काही दिवसांपूर्वी ‘चला हवा येऊ द्या’ या कार्यक्रमात आले होते. त्यावेळी त्यांनी आपल्या खऱ्या आयुष्याबद्दलच्या काही गोष्टी शेअर केल्या.

या कलाकारांमध्ये एक कलाकार आहे अभिनेता किरण डांगे. किरण या मालिकेत ‘बज्या’ नावाचे पात्र साकारत आहेत. जेव्हा किरणने त्याच्या खऱ्या आयुष्याबद्दल काही गोष्टी शेअर केल्या, तेव्हा बऱ्याच जणांच्या डोळ्यांत पाणी आले. मालिकेत काम करण्यापूर्वी किरण पोट भरण्यासाठी कल्याणमध्ये रिक्षा चालवत. आज एक अभिनेता म्हणून नाव कमवूनही आज देखील ते रिक्षा चालवतात.

काही लोकांना थोडी जरी प्रसिद्धी मिळाली तरी त्यांना लगेच गर्व चढतो आणि छोटी छोटी कामे करणे त्यांना लाजिरवाणे वाटू लागते. काही लोक मात्र आपल्या परिस्थितीची जाण ठेवून असतात आणि नेहमी जमिनीवर पाय ठेवून वागतात. इंडस्ट्रीत आज किरण डांगे सारखी देखील माणसे आहेत जी आपली मुळे विसरली नाहीयेत. आणि त्यांना त्याची लाजदेखील वाटत नाही.

कोणतेही काम कधीच छोटे किंवा क्षुल्लक नसते. अशी कामे केल्याने माणूस कधी लहान होत नाही. उलट कामांमध्ये कोणताही भेदभाव न करता जे लोक काम करतात, तेच आयुष्यात यशस्वी होतात. किरण डांगे यांच्या मेहनतीला फळ मिळत राहो, हीच त्यांना सदिच्छा! किरण डांगेचा अभिनय आणि त्याचा आयुष्याकडे बघण्याचा दृष्टीकोन याबद्दल तुम्हाला काय वाटते ते आम्हाला जरूर कळवा.

काय मग मंडळी, आमच्या वेबसाइट मुळे तुमचे मनोरंजन होत आहे ना? आमचे इतर लेख कसे वाटले हेदेखील आम्हाला वेळोवेळी कळवत चला. तुमच्या अभिप्रायाची आम्ही वाट पहात असतो. कमेंट्स मधून आम्हाला तुमची मते कळू द्या. आमचे लेख आवडल्यास ते लगेच लाईक करा आणि आपल्या मित्रमंडळींबरोबर शेअर करा.

You might also like